फ्रेश मॉर्निंग बुलेटीनचे संघनायक ना.सा . येवतीकर यांचा स्तुत्य उपक्रम.
-डॉ हनुमंत भोपाळे
-
सोशल मीडियाचा चांगला उपयोग करता येते हे ना.सा.येवतीकर आणि त्यांच्या मित्रांनी फ्रेश बुलेटिनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. इतरांना काही तरी उपयुक्त दिले पाहिजे, अशी भूमिका घेऊन या बुलेटिनचा दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी जन्म झाला. सुरूवातीला फक्त नांदेड जिल्ह्यातील काही शाळासाठी सुरू करण्यात आलेली ही सेवा आज संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे.
या बुलेटीनचे प्रसारण रविवार आणि सुट्टी वगळून रोज सकाळी 06:50 ते 07:00 या वेळेत नियमितपणे केले जाते.
या बुलेटीनचे एकूण सहा व्हाट्सअप्प समूह असून बहुतांश मंडळी ही पोस्ट इतर समूहात पोस्ट करत असतात. अवघ्या काही मिनिटात फ्रेश मॉर्निंग बुलेटीन हजारो लोकांच्या मोबाईलवर पोस्ट होते. याचा फायदा शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह अनेकांना होत असतो.
शिक्षकांनी शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेली आणि शालेय परिपाठासाठी अत्यंत उपयुक्त अशी पोस्ट म्हणजे फ्रेश मॉर्निंग बुलेटीन होय. या बुलेटीनसाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे. वसमतच्या महात्मा गांधी विद्यालयातील सहशिक्षिका सौ. संगीता देशमुख, संजय माचेवार, रायगडचे सौ. भरती कुंभार, औरंगाबादचे रवींद्र महाजन, सेलूचे कवी शरद ठाकर, उमरीचे सुनील रेगुलवाड, नांदेडचे मारुती गुंडेवार यांचे सहकार्य नोंद घेण्यासारखे आहे.
या टीमने स्वतःचे अँप विकसित केले असून ब्लॉगची निर्मिती ही केलेली आहे. फ्रेश मॉर्निंग बुलेटीन नावाचे फेसबुक पेजदेखील तयार करण्यात आले आहे. दिनविशेष , ठळक घडामोडी, जन्म आणि मृत्यू यांची माहिती संकलन करण्याचे काम गोंदिया जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक संतोष रहांगडाले हे करतात.
ठळक बातम्या संकलन करण्याचे काम कुंडलवाडी येथील दैनिक सामनाचे पत्रकार तथा के. एम. पाटील विद्यालय ,पाटोदा बु. ता. धर्माबाद जि. नांदेड येथील शिक्षक कुणाल पवारे हे करतात. बातम्या निवड करताना शाळेतील विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून बातमीची निवड केली जाते. विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे आणि माहिती मिळावी या उद्देशाने बातम्या संकलित केल्या जातात. या बातम्यांचे निवेदन टीमचे मुख्य संयोजक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली ता. बिलोली जि. नांदेड येथील चिंतनशील शिक्षक तथा स्तंभलेखक ना.सा .येवतीकर करतात. तसेच गुगलयान सदरातून रोज एका वेगळ्या विषयावर आपले विचार मांडतात.
पुणे जिल्ह्यातील प्रयोगशील शिक्षक श्याम बसप्पा ठाणेदार हे विज्ञान आणि इतर बाबींची विशेष माहिती देऊन उपक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिठ्ठी
ता. पाटोदा जि. बीड येथील मुख्याध्यापिका सौ. सुभद्रा खेडकर ह्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेश सुविचार देतात. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भोसा जि. गोंदिया येथील प्रयोगशील शिक्षक जैपाल ठाकूर हे प्रश्नमंजुषा सदर चालवतात.
'माझा वाढदिवस 'या सदरातून अनेकांना शुभेच्छा देण्याचे काम केल्या जाते.
मुंबईचे संजय नलावडे हे विचारधन माध्यमातून जीवनविषयक विचार मांडत असतात. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक अशोक कुमावत विद्यार्थ्यांना आपल्या प्रेरणादायी विचारद्वारे नेहमी प्रोत्साहित करत असतात. नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश काटकर हे विचारवेध या सदरातून विचाराची पेरणी करतात. बोधकथेचे संकलन कवयित्री तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. गोजेगाव ता. हदगाव, जि. नांदेड येथील उपक्रमशील शिक्षिका प्रमिलाताई सेनकुडे ह्या करतात.
या सर्व बाबींना एकत्र आणण्याचे
महत्त्वाचे काम नासा येवतीकर हे करतात. खरंच हा उपक्रम अनुकरणीय, प्रेरणादायी असून या टीममध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नासा येवतीकर यांच्याशी जोडून (9423625769) घेऊन हा उपक्रम अधिक गतिमान केला पाहिजे, असे मला वाटते.
पाचव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या फ्रेश मॉर्निंग बुलेटीन या टीममध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे मनापासून अभिनंदन
आणि भावी कार्यास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
डॉ. हनुमंत भोपाळे
शंकरराव चव्हाण महाविद्यालय,
अर्धापूर जि. नांदेड
9767704604

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें