✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 28/06/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••U•••••
💥 ठळक घडामोडी :-
१९४० - रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.
१९५० - कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.
2005 -कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा
💥 जन्म :-
१९२१ - माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव
१९२६ - मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
१९३० - इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
💥 मृत्यू :-
१९१३ - मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
१९१४ - आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
१९१४ - काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
*जि प शाळा बिरसी*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे मान्य करत केले आरक्षण मान्य, मात्र १६ टक्के आरक्षणाची टक्केवारी कमी करत शिक्षणात १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण केले मान्य.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *एअर इंडिया आणि पाच संबंधीत उपकंपन्यांमधून गुंतवणूक काढून घेण्यास अर्थ खात्याची मंजुरी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावरून खडाजंगी, सत्ताधारी, विरोधक आमने-सामने*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू करण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल विधानसभेत दिली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *एसटी प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीत कपात, एका वर्षात फक्त चार हजार किमी एसटीचा प्रवास सवलतीत करता येणार आहे. राज्य सरकारचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला घातली गवसणी, आंतरराष्ट्रीय वीस हजार धावा करताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना टाकले मागे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर मिळविला दिमाखदार विजय.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...
स्टोरी मिरर च्या लघुकथा स्पर्धेत विजेती ठरलेली कथा
*लघुकथा - अपेक्षाभंग*
https://storymirror.com/read/story/marathi/u55819bp/apekssaabhng/detail
वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *माणूस का घोरतो ?* 📙
नातेवाईक, मित्र, शेजारी यांना आपल्या घोरण्याने त्रस्त करणारी व्यक्ती स्वतः मात्र सुखाने घोरत झोपलेली असते आणि अशा व्यक्तींचा आपण घोरतच नाही, असा पक्का विश्वास असतो.
घोरण्याची अनेक कारणे आहेत. घोरण्याची सवय प्रौढ पुरुषांमध्ये अधिक आढळते. त्यातही लठ्ठ व्यक्ती जास्त घोरतात. झोपल्यावर स्वरयंत्रामधील आणि घशातील स्नायू शिथिल झाल्याने श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो आणि अशा अडथळ्यामुळे व्यक्ती घोरावयास लागते.
वरील कारणांशिवाय घशातील टाॅन्सील, लहान मुलातील नाकाच्या मागच्या बाजूचे टॉन्सिल (अॅडेनॉइड्स) वाढलेले असणे, पडजीभ मोठी होणे, घशातील स्वरयंत्रातील ट्यूमर, नाकातील हाड वाकडे असणे; यांमुळेही माणूस घोरतो. तसेच काही झोपेची औषधे, झटक्यांवरची औषधे यांच्यामुळेही माणूस घोरू शकतो. खूप दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्येही घोरण्याची सवय आढळून येते.
अशा या घोरण्यावर उपाय करता येतो. नाकाच्या, घशाच्या व्याधी असतील तर त्यावर उपचार करणे; दारूचे व्यसन बंद करणे, लठ्ठपणा कमी करणे, ज्या औषधांमुळे घोरतो ती औषधे बंद करणे; असे उपाय केले जातात. तसेच गरज पडल्यास औषधे दिली जातात. घोरण्यावर उपाय करून घेणे चांगले ; कारण घोरण्यामुळे फुप्फुसाचे, हृदयाचे आजार होऊ शकतात. काही घोरणाऱ्या व्यक्तींना झोपेत श्वास बंद होण्याची सवय असते. यामुळेही हृदयावर घातक परिणाम होतो.
म्हणून घोरणे जसे दुसऱ्याला त्रासदायक ठरते तसे घोरणाऱ्या व्यक्तीलाही हानी पोहोचवू शकते.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
ज्याच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *भारतातील लोकसंख्येने सर्वात लहान राज्य कोणते ?*
सिक्कीम
2) *भारतात ताजमहाल कोठे आहे ?*
आग्रा
3) *'मिसाईल मॅन' असे कोणाला म्हणतात ?*
डॉ ए पी जे अब्दुल कलाम
4) *'वाचन प्रेरणा दिन' केव्हा साजरा करतात ?*
15 ऑक्टोबर
5) *डॉ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय आहे?*
डॉ अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● मार्तंड भुताळे, देगलूर
● प्रभाकर लखपत्रेवार, नायगाव
● दीपक ईबीतवार
● रामदास कदम
● शुभम पाटील
● अभिषेक लकडे
● सय्यद खदीर पटेल
● रवी जयंते
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !*
*भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.*
*"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🦆🦆🦆🦆🦆🦆संजय नलावडे, चांदीवली, मुंबई
9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
पाहन पूजै हरि मिलै
तो मै पूजूँ पहार ।
ताते तो चक्की भली
पीसि खाय संसार ।
सारांश :
दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते.
श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल.
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०.
💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*प्राप्त परिस्थितीत समाधान मानने.*
एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा तो पक्षी बघ यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?
तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'
तात्पर्य:- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.
प्राप्त परिस्थितीत समाधानी राहणे हेच उत्तम.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें