✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 18/06/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
१९८३ - सॅली राइड पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री झाली.
२०१३ - भारताच्या उत्तराखंड राज्यात मुसळधार पाउस पडून मंदाकिनी व अलकनंदा नद्यांना महापूर. शेकडो मृत्युमुखी, हजारो बेघर.
💥 जन्म :-
१८१८ - जेरोम कार्ल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
१९३२ - डडली आर. हर्शबाख, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
१९६४ - उदय हुसेन, इराकी नेता.
💥 मृत्यू :-
१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार या मासिकाचे संपादक.
१९७१ - पॉल कारर, स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे, मराठी साहित्यिक
२००३ - जानकीदास, भारतीय चरित्र अभिनेता.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *पंतप्रधान शेतकरी पेन्शन योजना होणार सुरू, प्रतिमाह 100 रुपये भरणाऱ्या शेतकऱ्याला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिना 3 हजार रुपये मासिक पेन्शन होणार सुरु*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *जम्मू काश्मीर - काल अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर केतन शर्मा शहीद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कोलकाता - पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप अखेर मागे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *जे पी नड्डा होणार भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष ; 15 जुलैला घेणार शपथ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पाटणा - बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर, मृतांची संख्या पोहोचली १०४ वर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात कालपासून शाळांना झाली सुरुवात, वेगवेगळ्या पद्धतीने नवीन मुलांचे करण्यात आले स्वागत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *world cup 2019 - बांगलादेशने वेस्ट इंडिजला सात विकेट राखून केली मात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...
*लघुकथा - मेहंदी*
https://storymirror.com/read/story/marathi/8s7gn6p0/mehndii/detail
वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*भूतान देश*
भूतान जगातील पहिला देश आहे ज्याने १६ जुन 2010 रोजी त्याच्या तंबाखू कायदा [30] अंतर्गत तंबाखू विक्री बंदी घालण्यात आली आहे आहे
भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे. भूतानमधील 94% लोकसंख्या बौद्ध धर्मीय असून बौद्ध धर्म (वज्रयान) हा या देशाचा राजधर्म (राष्ट्रिय धर्म) आहे विविध सुंदर व भव्य बौद्ध मठ व बुद्ध विहारे आहेत. येथील केवळ 6% लोकसंख्या ही हिंदू आहे. बौद्ध संस्कृती व सुंदर निसर्ग यांचा अद्भूत संगम या देशाने केलेला आहे. भूतान हा शब्द संस्कृत भाषेतील भू-उत्तान (उंच प्रदेश) ह्य नावावरुन तयार झाला असावा. दुसर्या एका अंदाजानुसार भूतान हा शब्द भोता-अंता (तिबेटच्या शेवटी) ह्या संस्कृत शब्दावरुन घेतला असावा. भूतानी लोक आपल्या देशाला द्रुक युल ह्या नावाने संबोधतात.
*संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ*
📱09403407550
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला
*संकलन :- सौ.खेडकर एस.टी. बीड*
*मुख्याध्यापिका प्रा.शा. पिठ्ठी ता.पाटोदा*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?*
4
2) *'मेरा भारत महान' ही घोषणा कोणी दिली ?*
मा राजीव गांधी
3) *'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत कोणी लिहिले ?*
कवी प्रदीप
4) *'ऐ मेरे वतन के लोगो' हे गीत प्रथम कोणी गायिले ?*
लता मंगेशकर
5) *महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?*
आशिष शेलार
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● उद्धव भैयावल
● अनंत उत्तरवार
● गजानन सुरकार
● व्यंकटराव वारे
● वैभव कुमारे
● सुनील लोखंडे
● गंगाधर हरणे
● महताब शेख
● जयदीप वाघमारे
● भीमराव रुद्रावाड
● पुरुषोत्तम झवर
● योगेश संगेपवाड
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.*
*जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*संजय नलावडे, चांदिवली,मुंबई*
*मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *महात्मा फुले यांची अखंड * ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
सर्वांचा निर्मीक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||
धर्मराज्य भेद मानवा नसावें || सत्याने वर्तावे || ईशासाठी ||३||
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतों || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||
संकलन :- एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*यशस्वी क्रियाशीलता*
ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.
पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .
शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'
प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.
एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !
उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें