✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 06/08/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
💥 जन्म :-
◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.
💥 मृत्यू :-
◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *अखेर जम्मू काश्मीर, लडाख यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला, 370 कलम रद्द*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *इजिप्तमध्ये वाहनांचा भीषण अपघात; स्फोटामुळे हॉस्पिटलला लागली आग; 20 ठार, अपघातानंतर स्फोट झाल्याने हॉस्पिटलला बसल्या झळा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मुंबई - राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याचा पहिला फटका बसला होमगार्ड विभागाला, तब्बल ५७ पदे करण्यात आली रद्द, वित्त विभागाने काटकसरीबाबत सुचविलेल्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *श्रीनगर - कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठ्या कारवाईला झाली सुरुवात, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली असून महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी करण्यात आली कारवाई*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ * येत्या ७ व ८ ऑगस्टला कोल्हापूर, सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाने दिला इशारा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *अॅशेस मालिका : इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला नॅथन लिऑनने सहा विकेट्स घेत खिंडार पाडले आणि ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी हा सामना जिंकला, स्टीव्हन स्मिथ ठरला शिल्पकार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फलंदाजांचा कर्दनकाळ समजला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, स्टेनने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 बळी मिळवले होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*
स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............
पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.........
https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞
सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.
सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.
हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल.
स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *जगातील सर्वात उंच पर्वत कोणते ?*
हिमालय
2) *जगाचे नंदनवन कोणते ?*
स्वित्झर्लंड
3) *इंग्रजीत स्वर किती आहेत ?*
5
4) *कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
रायगड
5) *बिहार राज्याची राजधानी कोणती ?*
पाटणा
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● नरसिंह पावडे देशमुख
● सुदर्शन पा. जोगदंड
● शंकरलाल जैस्वाल
● राजेंद्र पोकलवार
● गंगाधर दगडे
● दीपक पा. हिवराळे
● हर्ष पाटील
● इरेश वंचेवाड
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.*
*दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे।*
*आणि या मनाला सुद्धा सुंदर स्वप्न* *पडूंदया.जे मन सतत काहीतरी* *नाविन्याचा शोध घेते तेच* *नाविन्याची निर्मिती सुद्धा करते.*
*"ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते*
*आणि*
*उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..*
*म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे."*
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
*जि. प.शाळा--माणिकखांब,* *ता.इगतपुरी, जि. नाशिक*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मासा आणि हंस*
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.
*तात्पर्य :-*
मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें