रविवार, 25 अगस्त 2019

26-08-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 26/08/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर

💥 जन्म :-
१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित
१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ
१९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते

💥 मृत्यू :-
१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक
१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू
१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते
२०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक

संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मुंबई : मध्य महाराष्ट्राला झोडपून काढल्यानंतर विश्रांतीवर गेलेला मान्सून आजपासून पुन्हा सक्रिय होणार आहे. २६ ते ३० आॅगस्टदरम्यान मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, अहमदाबाद, केरळच्या काही भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *फ्रान्स- जी-7 ची बैठक कालपासून सुरू, सर्व सदस्य देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *नवी दिल्ली :- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *चिखलदरा (अमरावती) : मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळी 10 वाजता सेमाडोह ते माखला मार्गावर मोठ्या दगडासह दरड कोसळल्याने सहा गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळताना वाहतूक नसल्याने मोठा अनर्थ टळला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट, वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दूसरा डाव अखेर 7 बाद 343 धावांवर घोषित केला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *अ‍ॅशेस 2019 : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंग्लंडने एक विकेटने जिंकला. बेन स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीत तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पी व्ही सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *माझा फळा-माझी लेखणी*

हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. .........

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग*
--------------------------------------

सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते.
चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत.
गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.
*या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.*
ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत.
ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते.
मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता.
रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

*त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :*
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.

----------------------------------
*त्र्यंबकेश्वरला कसे जाल?*
-----------------------------------
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग  - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात.
तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *उडीसा या राज्याचा राज्यपक्षी कोणता ?*
       मोर

2)  *शिवाजी महाराजाची समाधी स्थळ कोठे आहे ?*
       रायगड

3)  *तापमापकामध्ये कशाचा वापर करतात ?*
       पारा

4)  *तंबाखूमध्ये सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणता ?*
       निकोटिन

5)  *भारतीय खेळातील सर्वात मोठा पुरस्कार कोणता ?*
       राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  दिगंबर खपाटे बन्नाळीकर
●  प्रशांत इबितवार येवती
●  संदीप आवरे चिकना
●  विशाल कन्हेरकर अमरावती
●  नारायण शिंदे, रत्नागिरी
●  प्रशांत कोकणे
●  मधुकर बोईनवाड
●  संदीप सोनकांबळे
●  सुमेध वाघमारे
●  मारोती ताकलोर
●  दत्ता बोंदलवाड
●  अभय रन्नावरे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.*

*माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!*

        ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
     ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀
        *श्री. संजय नलावडे,मुंबई*
           *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*लहान मुले खरच निरागस असतात.*
*आईला म्हणतात,*
*रोज चांगली बुद्धी दे,*
*सांगतो आपण ज्याला।*
*सांग ना ग आई,*
*कुणी पाहिलंय का देवाला.*
*अशा वेळी निरागस बाळाला असे* *सांगा की--*
*देवाने तर पहिलेच सांगून ठेवले* *आहे. माझ्याकडे मागून* *मिळालं असतं.*
       *तर, भिकाऱ्याला "भिक" आणि*
       *शेतकऱ्याला "पीक"*
         *कधीच कमी पडू दिलं नसतं.* *आणि बेरोजगाराना "नोकऱ्या" कमी पडू दिल्या नसत्या.* *निसर्गाचा नियम आहे जे पेरणार तेच उगवणार*
     *त्यासाठी माणसाने श्रमाने कष्ट करणे हेच कर्म आहे..!*
       *फक्त निवडलेला "रस्ता" जर "इमानदारीचा" व सुंदर विचाराने मंतरलेला असेल*
          *तर,"थकुन" जाण्याचा प्रश्नच "उरत" नाही.*
    *भले "सोबत" कुणी असो वा नसो..!*
    **पण... एक नक्की मनापासून* *कुठलही काम* *करण्यापूर्वी, आपल्या चांगल्या* " *कर्माची" आठवण काढा, प्रत्यक्षात* *निसर्ग तुमच्या पाठीशी** *असेल...!*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
*जि.प.शाळा--माणिकखांब,*
*ता.इगतपुरी, जि. नासिक*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो .

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद - ९४२१८३९५९०
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *क्रोधाला संयमाने जिंका*

एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’

तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें