सोमवार, 5 अगस्त 2019

24 जुलै 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 24/07/2019 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१९९७- माजी हंगामी प्रधानमंत्री गुलजारीलाल नंदा व स्वातंत्र सैनिक अरुणा असफ अली यांना 'भारतरत्न'
हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान.
१९४३ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
१९६५ - व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.

💥 जन्म :-
१९१७ - जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९४५ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.

💥 मृत्यू :-
१९७० - पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
१९८० - पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आंध्रप्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रात 75% आरक्षण, जगनमोहन रेड्डी सरकारचा निर्णय, देशातील पहिली घटना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं, यामुळे काँग्रेस, जेडीएसला बसला मोठा धक्का, कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *आता महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2 सप्टेंबरपासून सातवा वेतन आयोग होणार लागू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *सोलापुरात कृत्रिम पावसासाठी पहिलं विमान झेपावलं, पावसासाठी अनुकूल ढगांचा शोध सुरु, पुढचे काही दिवस विमानाद्वारे निरीक्षण सुरुच राहणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पुन्हा मिलिंद देवरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता, तर दोन कार्याध्यक्ष म्हणून हुसेन दलवाई आणि एकनाथ गायकवाडांची चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी सरकारकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, केंद्र सरकारने आयकर कायद्यात २३४ F या नव्या नियमाची घातली भर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पांढऱ्या जर्सीवर खेळाडूंची नावं आणि क्रमांक पाहायला मिळणार, इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियांच्या अ‍ॅशेस मालिकेपासून सुरुवात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...

   *लघुकथा - भिजवणारा पाऊस*
https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detail

वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙

कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात.  या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो.
एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते !

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन    

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*Confidence is a key to success.*
*( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?*
      डॉ बाबासाहेब आंबेडकर

2)  *विदर्भातील एकूण जिल्हे किती ?*
      11

3)  *संत ज्ञानेश्वर महाराज यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला ?*
      नेवासे ( अहमदनगर )

4)  *'चंदीगड' ही कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे ?*
      पंजाब व हरियाणा

5)  *P M चे विस्तारित रूप सांगा ?*
      Prime Minister

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  गोविंद तुळशीराम कोकुलवार
●  सचिन सुरेश टेकाळे
●  विष्णू रामोड
●  संतोष लवांडे
●  राजेश पाटील मनूरकर
●  संतोष मुलकोड
●  धीरजसिंह चौहान
●  मारोती गुंटूकवार

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.*

*प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.*

              *॥ रामकृष्णहरी ॥*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
        *श्री संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 🌟! !  *कबिराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   
प्रेमभाव  एक  चाहिए , 
भेष  अनेक  बनाय  |
चाहे  घर  में  वास  कर , 
चाहे  बन  को  जाए  ||

  अर्थ
       मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ?  भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा .   विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत  किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य  व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते  म्हणून माणसाने  अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला  विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.
    
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा  ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती  सामावलेली असेल.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद..9421839590.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *मदतीचा हात*

भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.
ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.
तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.
आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. 

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱  9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें