शुक्रवार, 30 अगस्त 2019

31-08-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 31/08/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१९२० - डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरुन बातम्या प्रसारित झाल्या.
१९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले

💥 जन्म :-
१५६९ - जहांगीरमुघल सम्राट
१९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
१९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटीश राजकुमारी

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दहा सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची पत्रकार परिषदेत केली घोषणा, 27 बँकाऐवजी आता राहतील.12 सरकारी बँका.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *आगामी दोन वर्षात भारत बनणार प्रमुख डिजीटल सोसायटी असणारा देश – पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारोहात मुकेश अंबानी बोलत होते*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासह पाऊसही राज्यभरात विविध भागात दमदार हजेरी लावणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आय टी रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत आहे, हा मेसेज अफवा आहे, असे केंद्रीय आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असून रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *यंदा बजेट जुलै महिन्यात सादर झाल्याने काही नियम हे 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. हे नियम टीडीएस, पॅनकार्ड आणि आधारकार्डाशी संबंधीत असल्याने सामान्य लोकांवर याचा परिणाम होणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *आर्थिक वर्षातील पहिल्या त्रैमासिकात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *वेस्ट विंडीजचा बाहुबली रहकीम कॉर्नवॉलचे कसोटी सामन्यात पदार्पण, दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकत वेस्ट विंडीजची प्रथम गोलंदाजी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुलेटीन audioमध्ये ऐका खालील लिंकवर

https://b.sharechat.com/y83PmqLzAZ

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *नजर हटी, दुर्घटना घटी*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *सिद्धेश्वर मंदीर - बारामती*
बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.
इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो.
या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते.
औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.
सन 1723  मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.

मंदिराची वैभवशाली परंपरा...
बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती.           

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  रत्नाकर कदम चोळखेकर
●  सुभाष जाधव
●  संतोष पाटील साखरे
●  सचिन वाघ
●  उदय मोहिते
●  अशोक जायवाड
●  साईनाथ वाघमारे
●  अशोक मुदलोड
●  प्रकाश कल्याणकर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.*

*माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.*

*"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."*

*~~‼॥ रामकृष्णहरी  ॥‼~~*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
    *श्री. संजय नलावडे, मुंबई*
    *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*जो हात हालवणार नाही तो पाण्यात* *कधीच पोहू शकणार नाही.*
*जो पाय उचलू शकत नाही तो कधीच* *चालू शकणार नाही.*
*ज्याच्या डोक्यात नाही हा शब्द घर* *करतो तो कधीच कुठलंही आव्हानात्मक काम करूच शकत नाही.*
*चुकी त्यांच्या हातूनच होते*
      *जे काम करतात*
*बिना कामाचे लोकांचे जीवन तर*
     *दुसऱ्यांच्या चुका*
*काढण्यातच संपून जातात....!*
*एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,*
*आणि जास्त वापरली तर झिजते..*
*काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..*
*मग कोणाच्याही उपयोगात न येता,*
*गंजण्यापेक्षा*,
*इतरांच्या सुखासाठी झिजणे*
*केव्हाही उत्तमच…!!*
*तर मग उठा आणि कामाला लागा।*

     *अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*   
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
वाहत जाणा-या  पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *माणुसकीचे फळ*

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.
कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.
तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.
त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,
“तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा…
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, 29 अगस्त 2019

30-08-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 30/08/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.

💥 जन्म :-
१९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
१९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
१९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी'
१४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
१६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 *9604481084*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. येत्या काळात पोटखराबा आणि जिरायत असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आता बागायती खाली येणार, राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'फिट इंडिया' मोहिमेचा शुभारंभ; दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर पार पडला सोहळा, 'फिट इंडिया' अभियानात उद्योग, चित्रपटसृष्टी आणि क्रीडाविश्वासह इतर क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामींनी सुचवला उपाय, म्हणाले- 'पाककडे जाणारी जहाजं थांबवून, व्यापार बंद करावा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे करणार भाजपमध्ये प्रवेश, तसेच ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलिन करणार असल्याची माहिती खुद्द स्वत: राणे यांनीच दिली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पॅरालिम्पियन दीपा मलिकला राजीव गांधी खेलरत्न तर क्रिकेटर रवींद्र जडेजा आणि रेसलर पुजा ढांडालासहित 19 जणांना अर्जुन अवॉर्ड पुरस्कार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मुंबई :  15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिके आणि भारत यांच्यात सुरू होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची करण्यात आली घोषणा,  महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश नाही.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *बैलांचा सण : पोळा*
बैलाच्या ताकदीवर तो शेतातील सर्व कामे करून घेतो. शेताची नांगरणी, वखरणी, पेरणी किंवा शेतातून घराकडे मालाची ने-आण करण्यासाठी या बैलांचा वापर केला जातो. पूर्वी दळणवळणाची सुविधा एवढी विकसीत झाली नव्हती तेव्हा शहरात जाण्या-येण्यासाठी बैलगाडीतून प्रवास करावा लागायचा. सायकल नावाची........

पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....!
https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_29.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙

कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ?
कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.
आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो.
आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते.
शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते.
आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *भारताचे कृषिमंत्री कोण आहेत ?*
       मा. राधामोहन सिंह

2)  *'देवीची लस' कोणी शोधून काढली ?*
       एडवर्ड जेन्नर

3)  *रक्तगट कोणी शोधून काढले ?*
       कार्ल लँडस्टेनर

4)  *भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ?*
       लोकमान्य टिळक

5)  *पी व्ही सिंधू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
        बॅडमिंटन

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  नागभूषण मॅकावाड
●  अरुण चव्हाण
●  गणेश बोळसेकर
●  दिलीप झरेकर
●  कृष्णा श्याम दाभडकर
●  माधुरी हातनुरे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?*

*आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?*

*"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."*
 
         ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
          *श्री संजय नलावडे, मुंबई*
         *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*सज्जनहो,*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
*काय होत या माणसाकडे,*
*फक्त वाटणे,देण्यापलीकडे काहीच* *नव्हतं.* *म्हणून ते राष्ट्रसंत* *झाले.*
*ते म्हणत*
* *राजा सजी महाली,सौख्य कधी* *मिळाली।*
*ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत* *माझ्या।*
*जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे* *या।*
*कोणावरी ना बोझा,  या झोपडीत* *माझ्या।*
*अरे बाबांनो आलोच ना भूमीवर ,मग* *सगळं तिचच आहे,सांभाळून काय करता, वाटून बघा किती पटीने वाढत ते* *सांगा,मोजदाद करता येणार नाही.*
*या सृष्टीने एक नियम केला आहे, अलिखित आणि चिरंतन---*
*जे वाटले ते शेकडो पटीने पुन्हा परत मिळत, मग वाटायला काय हरकत आहे.*
*अन्न द्या ,कधी भुकेले राहणार नाही.*
*सन्मान करा, कधी मान खाली घालायची वेळ येणार नाही.*
*तिरस्कार करा,आयुष्यात कधी कुणी जवळ येणार नाही.*
*अपमान करा,करोडो रुपये खर्चूनही कुणी चांगलं म्हणणार नाही.*
*धन वाटा, कधी कुणाकडे हात पसरावा लागणार नाही, सदैव मदत तयारच.*
*ज्ञान वाटा, जगात तुमच्यासारखा ज्ञानीच प्रत्येकाच्या मनात घर करून* *बसेल,व तुम्ही किर्तीवंत व्हाल*
*प्रेम करा,अवघी सृष्टी तुमचीच* *असेल, जगण्याची मजा काही औरच मिळेल.*
🤝🏻 *चला मग वाटताय ना ,शक्य होईल ते तरी

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*    
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
          8087917063.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *भेटवस्तू न स्वीकारणे*

अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण
स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’
काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.
कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.
ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’
अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~