✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 19/10/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मनुष्य गौरव दिन*
💥 जन्म :-
◆१९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार.
◆१९१० - चंद्रशेखर सुब्रमण्यम - नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
◆ १९२० - पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक.
◆ १९२५ - डॉ. वा.द. वर्तक, वनस्पतिशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक.
◆ १९५४ - प्राची चिकटे, बाल साहित्यिक.
◆१९५९ - प्रिया तेंडुलकर. अभिनेत्री आणि मराठी कथालेखिका.
💥 मृत्यू :-
◆१९३४ - विश्वनाथ कार, उडिया लेखक व समाजसुधारक. १८९६ मध्ये त्यांनी एक छापखाना काढून उत्कल साहित्य नावाचे नियतकालिक काढले.
◆१९९५- बेबी नाझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
◆ २००६- श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *सरन्यायाधीशपदासाठी मराठमोळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांचं नाव आघाडीवर, 17 नोव्हेंबरला निवृत्त होणाऱ्या रंजन गोगोईंकडून सरकारला शिफारस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पीएमसी बँकेच्या ग्राहकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, खातेदारांना हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याचा घेतला मोठा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पुणे: पाली भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक, बौद्ध संस्कृतीचे लेखक आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव मो. गो. धडफळे यांचे प्रदीर्घ आजाराने झाले निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दोन दिवसांपासून नानावटी रुग्णालयात, रुटिन चेकअपसाठी अॅडमिट असल्याची रुग्णालयातील सूत्रांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *रांचीच्या मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाच्या चिंतेत झाली वाढ, संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या डाव्या खांद्याला दुखापत, शाहबाज नदीमचा भारतीय संघात समावेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मनुष्य गौरव दिन*
जगात सर्वत्र पापं वाढली, अत्याचार वाढले, कोणाला कशाचे भय नव्हते, जो तो आपल्या मनाप्रमाणे वागू लागला, जगातील माणुसकी संपली होती निर्मात्याला याची काळजी लागली होती. या जगास सन्मार्गाला नेण्यासाठी अनेक संत, महात्मे यांनी जन्म घेतले. त्यांनी जगाला योग्य दिशा सुद्धा दिली. तरीही लोकं हा मार्ग विसरल्यासारखे वाटतांना दिनांक 19 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील रोहा या गावात एका सत्पुरुषाचा जन्म झाला..................
पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवरक्लीक करावे.
https://sharechat.com/post/jROJWkj
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *निर्मलक (डिटर्जंट - Detergent) कसे काम करते ?* 📙
भारतात निर्मलकांचा वापर १९६० च्या दशकात सुरू झाला. त्यांचे मुख्य काम म्हणजे पाण्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा मळ व तेलकटपणा मोकळा करून धुण्याच्या मिश्रणात उतरवणे. थोडक्यात पाण्याची पदार्थ 'विरघळवण्या'ची ताकद निर्मलक वाढवतो. मळलेले कपडे, तेलकट भांडी, तेलाचे मातीचे हात धुण्याची वेळ येते, तेव्हा त्याची हमखास आठवण येते. थोडासा विचार केला, तर निर्मलक आपल्या जीवनात किती व्यापक रीतीने शिरला आहे, हे लक्षात येईल. तो उपलब्ध नाही असे चार दिवस जरी गेले तरी आपले सगळे व्यवहार अडून बसतील. प्रक्षालक व निर्मलक म्हणजे व्यवहारात 'डिटर्जंट' हाच शब्द जास्त सहज वापरला जातो.
पहिला डिटर्जंट बनवला गेला, त्याला आता किमान ७५ वर्षे झाली. फ्रिट्झ गुंथर या जर्मन संशोधकाने हा डिटर्जंट क्रूड ऑईलपासून बनवला होता. पण त्यानंतर कित्येक वर्षे त्याचा व्यावहारिक उपयोग केलाच गेला नाही. सुमारे १९५० च्या दशकात याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सध्या ढोबळमानाने असे म्हणता येईल की, अल्फिलबेंझीन व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या साह्याने तयार झालेल्या संयुगातील अॅसिडचा भाग सोडा अॅश वापरून काढला जातो. राहतो तो डिटर्जंट.
डिटर्जंट तयार झाला तरी त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणखी काही खास प्रक्रिया केल्या जातात. फेस आल्याशिवाय 'साबण' वापरला असल्याचे समाधान मिळत नाही म्हणून फेसाळणारे काही घटक त्यात मिसळले जातात. रक्त, घाम, तेल यांचे डाग निघावेत म्हणून खास वितंचके (Enzymes) त्यात घालतात. याखेरीज कपडे अधिक शुभ्र दिसून चकाकी यावी, यासाठी ऑप्टिकल व्हाइट्नर घालण्याची पद्धत आहे. डिटर्जंटची पावडर जितकी हलकी, जितकी तिची लाही मोठी, तितकी ती लवकर काम करते. यासाठी तयार डिटर्जंट मोठाल्या ढवळून काढणाऱ्या मिक्सरमधून काढला जातो. त्यात आकर्षक दिसण्यासाठी हलकासा रंग व छान सुगंधी वास मिसळला जातो.
याच वेळी काम करणाऱ्या हातांची कातडी, कपडे, भांडी, धुण्याच्या वापरातील बादल्या यांवर रासायनिक अपायकारक प्रक्रिया होऊ नये, ही पण काळजी डिटर्जंट घेत असतो. डिटर्जंटच्या आधी काम करणारा साबण व कॉस्टिक सोडा हा काम करणाऱ्याला त्रासदायक तर ठरेच, पण त्याची चिकट लगदास्वरूपी लुकणे कपड्याला चिकटून राहत असत. डिटर्जंट वापरायलाही खूपच सोपा असतो. पाण्यात झटकन विरघळवुन त्या मिश्रणात कपडे बुडवतात येतात. त्यामुळे अनेक कपडे एकदम धुवुन निघू शकतात.
डिटर्जेंटचा वापर सुरू झाला आणि जवळपास दशकभराने नवीनच समस्या समोर उद्भवताना आढळू लागल्या. आज या समस्यांनी समोर थोडेसे आव्हान व थोडेसे गंभीर स्वरूप धारण केले आहे. सगळ्या वापरातला डिटर्जंट गटारावाटे जेव्हा एकत्र होतो, तेव्हा पाण्यातील जंतू त्याचे विघटन करू शकत नाहीतच; पण या डिटर्जंटमुळे पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावर परिणाम होऊ लागतो. हे पाणी नदीत गेल्यास तेथील जलचरांवर त्याचा दुष्परिणाम दिसून त्यांची संख्या रोडावू लागते.
यावर उपाय शोधणे चालू आहे. प्रयोग चालू आहेत; पण अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. डिटर्जंट तयार करणे फारसे अवघड नाही. अगदी घरगुती स्वरूपातही तो तयार करता येतो. कच्चा माल आपल्या देशात सहज उपलब्ध आहे. पावडर स्वरूपातील, वडी स्वरूपातील किंवा द्रव स्वरूपातील डिटर्जंट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डिटर्जेंट तयार करणारी एक भारतीय कंपनी कसलीही आधुनिक यंत्रणा, वीज यंत्रे न वापरता डिटर्जंट तयार करते, विकते व तिची आज भारतीय डिटर्जंटच्या विक्री मध्ये निम्म्यापेक्षा जास्त टक्केवारी आहे. या उत्पादनासाठी फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणींचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आहे. 'निरमा' हे तिचे नाव.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *'जागतिक रंगभूमी दिन' केव्हा साजरा केला जातो ?*
24 मार्च
2) *तिबेटचे धर्मगुरू कोण ?*
दलाई लामा
3) *'आर्य समाजा'ची स्थापना कोणी केली ?*
महर्षी दयानंद सरस्वती
4) *राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली ?*
28 एप्रिल 1919
5) *'जागतिक वसुंधरा दिन' केव्हा साजरा करतात ?*
22 एप्रिल
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● सौ. शामला पंडित ( दीक्षित )
पूर्णानगर, चिंचवड
● साई रामोड
● निलेश दारमोड
● योगेश कंदुरके
● श्रीनिवास बेंकट
● विशाल शेपाळकर
● लतिका चौधरी
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*झोका काय नि पाळणा काय. स्वप्नात नेणारी ही जादूभरी दुनिया. चंद्र दिसतो आकाशात. हाती येणार नसतो बाळाच्या. पण हात उंच करून धरू पाहणारे हात थांबत नाहीत. आनंद, दु:ख, भीती, ग्लानी, नीज. झोका थांबला की बाळ रडते. झोका दिला की गुंग होते. वास्तवापासून दूर नेतो झोका. विसरायला लावतो जे नको असते. देह आणि मनाचा खेळ सगळा.*
*जत्रा भरते तेव्हा उंच उंच रहाटपाळणे असतात तिथे. लहानपणी नव्हते एवढे उंच पाहण्यात. चार पाळण्याचे, कमी उंचीचे गावच्या जत्रेत असायचे..त्यात बसण्याची ओढ आणि उतरण्याची घाई असायची. एकेक पाळणा हाताच्या साह्याने फिरवत, पाळणा उंच जाई., खाली येई, गती वाढत जाई. उंच जाताना उचलण्याचा गोळा पोटात आणि खाली येताना भीतीचा खड्डा पोटात. उच्च आनंद आणि प्राणस्पर्श होणारी भीती. आयुष्यात येणा-या अशा अनेक प्रसंगाच्यावेळी हे भान ठेवावंच लागतं. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट व्हायलाच हवी. नाहीतर साधी गोष्टसुद्धा प्राणस्पर्शापर्यंत घेऊन जाते आपल्याला.*
*दोन दोरांच्या हातांनी*
*झोका देहास वेढतो*
*मनालाही वेटाळून*
*झोका प्राणास छेडतो.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*आमचे एक चांदवडचे कवी मित्र आहेत ,प्रा. ऐश्वर्य पाटेकर.*
*कुणब्याच्या अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबात जन्मलेला अवलिया.त्यांची भूक नावाची कविता* *खूप गाजली.तिला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले.*
*ते म्हणतात --मास्तर ती भूक नावाची कविता अजिबात शिकवू नका,सांगूंही* *नका.भूक काय असते हे मरणाची भूक लागलेल्या व* *व्याकुळ झालेल्या जीवलाच कळते.पण अस असलं तरी भाकरीचा* *चंद्र शोधन टाळू नये.*
*दोन पायांवर उभं राहून काटेरी* *बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही?* *समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या* *दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड* *मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी* *पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या* *आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या* *अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या* *कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या* *बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या* *जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !**
*भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.*
*"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."*
*त्यामुळे भूक लागलीच तर ती ज्ञानाची लागू द्या,बघा तुमचं व्यक्तिमत्त्व किती सुंदर आणि साजेसे दिसते ते.*
*अशोक कुमावत, नासिक,*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
माणसाच्या डोक्यात कितीही अनंत विचार असले तरी प्रत्यक्ष काम करताना किंवा अमलात आणताना फक्त एकच विचार आणतो तेव्हा कुठे तो त्या कामात यशस्वी होतो.कारण एकाच कृतीवर त्याचे लक्ष केंद्रीत करावे लागते.जर काम करत असताना अनेक विचार डोक्यात ठेवून हातात असलेले कितीही चांगले काम असले तरी त्या अनेक विचारांमुळे काम बिघडून जाते.अशावेळी आपली मानसिकता चांगली असणे आवश्यक आहे.मानसिकताही बिघडवण्याचे काम डोक्यातले अनेक विचार असतात.अशावेळी शांत संयमी रहावे आणि आपल्याला नेमके कोणते काम पार पाडावयाचे आहे याचाच फक्त विचार करावा आणि त्याच विचाराने कृती करावी मगच त्यानंतर एखादा महत्त्वाच्या विचाराला प्राधान्य देऊन कृती करावी म्हणजे कामे व्यवस्थित पार पाडता येतात.यामध्ये कोणतेही काम लवकर संपविण्याची घाई करु नये.मग विचार कितीही डोक्यात असलेतरी...!
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/
८०८७९१७०६३
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आईचे प्रेम*
एकदा एका परीने जाहीर केले,
"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात जास्त सुंदर असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."
ते एकूण सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."
परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."
तात्पर्यः 'आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.' आईची महती जगात महान आहे.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें