शुक्रवार, 18 अक्टूबर 2019

18-10-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 18/10/2019 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१८७९ - थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.
१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
२००७ - आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले.

💥 जन्म :-
१९२७ - बक दिवेचा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९२८ - दीपक शोधन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९५० - ओम पुरी, भारतीय अभिनेता.
१९६८ - नरेंद्र हिरवाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९८० - रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
१९९३ - मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री.
१९९८ - शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार.
२००५ - वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *बांगलादेशच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला. पश्चिम बंगालमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर गुरुवारी फ्लॅग मीटिंग दरम्यान ही घटना घडली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या सहावीच्या अभ्यासक्रमात शिवरायांचा इतिहास, शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण, अभ्यासक्रम वगळल्याचा आरोप फेटाळला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *विधानसभा निवडणुकांमुळे सरकारी शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 21 ऐवजी 24 ऑक्टोबरपासून*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबईत 73 कोटींच्या भूजलाची चोरी अकरा वर्षांनंतर उघड, पाणी चोरीप्रकरणी आझाद मैदान पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *इस्रोच्या चांद्रयान - 2 ने चंद्राच्या पृष्ठभागाचं पहिलंवहिलं प्रकाशमान छायाचित्र पाठवलं आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सी ई ओ सत्या नाडेला यांच्या पगारीत 66 टक्के वाढ, आर्थिक वर्ष 2019 साठी कंपनी त्यांना 300 कोटी रुपये वार्षिक पगार देणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *पुढील वर्षी रोड सेफ्टी वर्ल्ड ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक वीरेंद्र सेहवाग सलामीला उतरणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     *संस्कारी संतती हीच संपत्ती*

बापाने मुलांसाठी खुप संपत्ती कमाविली पण मुलगा निघाला बेअक्कली तर या संपत्तीचे करायचे काय ? नुकतेच एका बातमीमध्ये वाचण्यात आलेली ही घटना आहे. खरंच माणूस सुखी जीवन जगण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करतो. आपली मुलंबाळ सुखात राहावीत त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून दिवसरात्र काम करतात. संपत्ती जमविण्याचा मूळ हेतू एकच असतो ते म्हणजे आपल्या नंतरची पिढी सुखात नांदावी त्यांना कसलाही त्रास होऊ नये. पण आपली संतती जर चांगली, संस्कारी निघाले नाही तर जमवलेली संपत्ती संपून जायला किती वेळ लागेल ? ........

पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.

https://www.facebook.com/100003503492582/posts/2287930671333694/

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *'निऑन साइन्स' म्हणजे काय ?* 📙

निआॅन म्हणजे नवीन. हा मूळ ग्रीक शब्द आहे. निआॅन, अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे अगदी विरळ अवस्थेत असलेले वायु सुमारे १८९४ ते १९०० सालांदरम्यान ज्ञात होत गेले. यातील निआॅनचा वापर सर्वप्रथम केला जाऊन लाल रंगाची चमकदार निऑन चिन्हे वा निऑनसाइन्स बनवली गेली. निर्वात काचेच्या पोकळीत निऑन वायू कमी दाबाने भरला जाऊन त्यातुन विद्युतभार पाठवला असता हा वायू चमकदार लाल प्रकाश बाहेर टाकतो. या प्रकाराचा वापर केला जाऊन अत्यंत आकर्षक निआॅन चिन्हांचा वापर जगभर सुरू झाला. नंतर हे अन्य वायू वापरले असता इतर काही रंगांचा प्रकाश मिळू शकतो. हेही लक्षात आले. पण या प्रकारच्या चिन्हांचे नाव मात्र तेच कायम राहिले. या सर्व प्रकारच्या चिन्हांना निआॅन साइन्स म्हणूनच ओळखतात.
निअाॅन साइन्सचा प्रकाश हा धुक्यातुनही लक्षात येतो. या गुणामुळे त्याचा फार मोठा व्यावहारिक उपयोग विमानतळावरील दिव्यांसाठी केला जातो. विमानांना मार्गदर्शक म्हणून हे दिवे वापरले जातात. धुक्यामध्ये विमाने हरवण्याचा धोका त्यामुळे टळतो.
या विविध वायूंचे मिश्रण अनेक प्रकारे वापरले जाते. क्रिप्टॉन व अरगाॅनचे मिश्रण वापरले असता हिरवट पिवळा प्रकाश मिळतो. प्रकाशमान उजेडासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक फ्लुअोरेसंट दिव्यांत हे मिश्रण वापरतात. मात्र हल्ली डिस्प्लेबोर्डसाठी एलईडीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या सर्व वायूंना ना वास, ना रंग, ना चन. यांना काही जण 'नोबेल गॅसेस' असेही म्हणतात. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वायू रेणूस्वरूपातच वातावरणात आढळतो. मोजक्याच वायूंबरोबर यांची संयुगे बनू शकतात. अन्य अनेक मुलद्रव्यांशी यांचा संयोग होऊ शकत नाही. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्ट्या अस्थिर वस्तूभोवती अन्य कशाचा संबंध टाळण्यासाठी यांचे आच्छादन घालण्याची पद्धत वापरली जाते. या आच्छादनाखाली (ब्लॅंकेट) मूळ पदार्थ पाहिजे तसा जतनही करता येतो.
अरगाॅन व नायट्रोजनचे मिश्रण विजेच्या दिव्यांमध्ये वापरले जाते. यामुळे दिव्यांचे आयुष्य वाढते. झेनाॅनचा वापर मुख्यतः फोटो काढायला वापरल्या जाणाऱ्या फ्लॅशबल्बमध्ये केला जातो. दूरवर प्रकाश टाकणाऱ्या झोतांसाठी (सर्चलाईट) झेनाॅनचा वापर केला जातो. काही संशोधनांमध्ये अणुसमुच्चय निरीक्षणातही झेनाॅनचा वापर करतात.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*         

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी ही वाया घालवू नये "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *भारतात पहिले आशियाई सामने केव्हा सुरू झाले ?*
       1951

2)  *'श्रीमान योगी' या पुस्तकाचे लेखक कोण ?*
        रणजित देसाई

3)  *'जागतिक महिला दिन' कोणत्या वर्षांपासून साजरा केला जातो ?*
       1975

4)  *दिवस-रात्र समान कोणत्या दिवशी असते ?*
       21 मार्च

5)  *'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन' केव्हा साजरा केला जातो ?*
       15 मार्च

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  श्रेणीक रणभीरकर
●  विकास जाकापूरे
●  शशिकांत संगम
●  विकास टेकाळे
●  गणेश कावळे
●  सार्थक राम वाघमारे
●  चिं अथर्व निरंजन डांगे
( पहिला वाढदिवस )

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.*

*समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.*
*"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*

    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*एक फिल्मी गीत आहे,*
*ये जीवन है,इस जीवनका ,यही है, यही है,यही है रूप रंग।*
*थोडे गम है, थोडी खुशीया। बस यही है।*
*जीवन हे एक कधी एकपात्री तर कधी बहुपात्री असा रंगमंच आहे.*
*ज्याला जेवढा उत्कृष्ट अभिनय करता येईल तो यात यशस्वी होतो.*
*एक मात्र नक्की की हे जीवनाचे चित्र ज्याने त्याने आपल्या कर्तव्यरूपी ब्रशने व कलेने रंगवावे.*
*कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे  हे ज्याने त्याने आपल्या* *कल्पकतेने ठरवून ते चित्र उठावदार करायचे.पण जीवनाचे* *बेहतरीन चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग द्यावे, हे* *लवकर लक्षात येत नाही.* *जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर* *परिश्रमाचीही,निष्ठेची,जिद्दीची आवश्यकता लागते.   परिस्थितीनुसार*  *कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली* *तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या  रंगाचा* *बेरंगही होऊन जातो. परिस्थितीनुसार* *रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी,पण ते* *सरड्यासारखे नाही तर पाणी तेरा रंग कैसा ,जिसमे मिलाया उस जैसा अस* *असावं.* *समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले* *पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून* *जाईल. खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला* *अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी* *छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि  ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या* *जीवनाचे खरे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र नक्की .*
*हे चित्र रंगवण्यात यशस्वी झाले ते म्हणजे चार्ली चॅप्लिन,मार्टिन ल्युथर* *किंग,महात्मा गांधी,बाबा आमटे,फ्रँकलिन,सॉक्रेटिस, अब्राहम लिंकन अशी बरीच मोठी यादी आहे.*
*बघा आपलं चित्र कस वठवायचं ते.*

*अशोक कुमावत, नासिक.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*   
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

    जीवनात आपण केलेल्या कर्माला विशेष असे स्थान आहे.आपण आपल्या चांगल्या कर्माने यशाकडे जातो आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटते तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कार्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात अर्थात तुमचा चाहता वर्ग अधिक वाढतो.त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे निर्माण होते आणि तुमचे अनुकरण करायला लागतील.हे केवळ तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मामुळेच.
जर तुमचेच कर्म चांगले नसतील तर तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी ठरताल.एवढेच नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत अपमानही सहन करावा लागेल.लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील आणि तुम्ही एकाकीपणे नैराश्यमय जीवन जगायला लागाल.मग तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन कोणतेही ध्येय साध्य होणार नाही.
    मग असे जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे असे नकारात्मक जीवन जगणे जणू यम यातनाच नाहीत का ?
यापेक्षा चांगले कर्म करुन जीवनाला एक नवा अर्थ निर्माण करावे आणि स्वाभिमानाने जीवन जगावे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
               *उपयुक्त जीवन*

कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.

*तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें