बुधवार, 9 अक्टूबर 2019

09-10-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 09/10/2019 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*जागतिक पोस्ट दिन*
*आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निवारण दिन*

💥 ठळक घडामोडी :-

◆२००१ - ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली.
◆१९८१-फ्रान्समध्ये मृत्यू दंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.

💥 जन्म :-
★ १९६६-डेविड कॅमरून-इंग्लंड चे माजी पंतप्रधान.

💥 मृत्यू :-
◆१९८७ - गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल विमान भारताच्या ताफ्यात, फ्रान्समध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची उपस्थिती, हवाई दलाची ताकद वाढणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसागर लोटला, तर मुंबईतल्या चेंबूरमध्ये देखाव्याद्वारे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं दर्शन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, अंतराळ संशोधनासाठी जेम्स पीबल, मिशेल मेयर, डिडीयर केलोज यांना विभागून नोबेल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *शेवटच्या दिवशी राज्यभरात 288 मतदारसंघातून एकूण 1504 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 4739 वैध उमेदवारांपैकी आता 3239 उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक उमेदवार तर सर्वात कमी चिपळूणमध्ये*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *नवी दिल्ली: मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमामी गंगे मोहीमेच्या खर्चामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये तब्बल १५ पटींनी वाढ झाल्याची माहिती समोर आली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *देशभर कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाईन मतपत्रिकेचा केला जाणार वापर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारताची फुलराणी बॅडमिंटपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर आधारित सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर ऐवजी परिणिती चोप्रा पात्र साकारताना दिसणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *कृतिशील सीमोल्लंघन*
       
समाजात काही महत्त्वाच्या समस्या आहेत. त्या समस्यांना आपल्या विचारसरणीत योग्य बदल आणून आपण सगळे मिळून नक्कीच सोडवू शकतो. अर्थातच कोणतीही गोष्ट इतरांनी करावी असे वाटत असेल तर त्याप्रमाणे आपण स्वतः कृती करायला हवी किंवा आचरणात आणली असायला हवी.
त्यासाठी हवी इच्छाशक्ती! आम्ही त्या गोष्टी आचरणात आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोतच !

चला तर आपणही या 10 गोष्टी आचरणात आणू या ! अधिक माहितीसाठी खालील लिंक उघडून पहाच एकदा .......!

https://saadmanuski.blogspot.com/2019/10/blog-post.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~

*हरीश बुटले*
*संस्थापक  व अध्यक्ष
साद माणुसकीची सामाजिकता अभियान
9422001560 ( only whatsapp )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *जीपीएस म्हणजे काय ?*  📙

हल्ली पर्यटन करण्याची एक चांगली सवय सर्वसामान्यांना लागलेली आहे. पर्यटनाचा फार मोठा फायदा आपणाला होत असतो. त्या ठिकाणचं राहणीमान, भौगोलिक संपन्नता, सामान्यांचे प्रश्न या निमित्ताने समजण्यास मदत होते. अर्थात तसा दृष्टीकोन ठेवून पर्यटन केले तरच बरं का ! असे पर्यटनाला गेलो तर रस्ते सापडणे किंवा ठिकाण मिळणे काहीवेळा अवघड होते. प्रत्येक वेळी कोणाला तरी पत्ता विचारत राहणं सुद्धा नकोसं वाटतं. पण आता एक नवी प्रणाली आपल्या हातात आलेली आहे. जीपीएस त्याचं नाव. मोबाइलमध्ये असलेल्या या सिस्टीममध्ये नुसतं ठिकाण टाइप केलं किंवा आवाजाच्या माध्यमातून जरी सांगितलं तरी आपणाला त्या ठिकाणी सहीसलामत पोहोचवण्याचं काम ही जीपीएस यंत्रणा करते.
एखाद्या गावाचं किंवा ठिकाणाचं स्थान आपण त्याच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरवू शकतो. पण एव्हरेस्टचं ठिकाण निश्चित करण्यासाठी एवढीच माहिती पुरेशी नाही. कारण लांबी, रुंदी बरोबरच उंचीचीही जोड त्यासाठी आवश्यक आहे. तीन मितीतील म्हणजे थ्री डायमेन्शनमधील माहिती मिळाली तरच आपण कोणत्याही ठिकाणचा पत्ता निश्चित करू शकतो. आता प्रश्न एवढाच उरतो की, या तीन मितींची माहिती मिळवायची कशी ? ती माहिती मिळवायची असेल तर उपग्रहांची मदत घेतली पाहिजे. आणि तेही भूस्थिर उपग्रह. हे उपग्रह जवळपास छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर असतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरत आहे त्याच वेगाने ते पृथ्वीबरोबर फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीच्या दृष्टीने ते स्थिर वाटतात. म्हणूनच त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. कमीत कमी तीन भूस्थिर उपग्रह एकमेकाला एकशे वीस अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने अवकाशात ठेवले तर आपणाला जगातील कोणत्याही ठिकाणची माहिती तरंग लहरींच्या माध्यमातून समजते. तीनपेक्षा जास्त उपग्रह ठेवले तर माहितीची अचूकता वाढू शकते.
दिशादर्शक प्रणाली म्हणजे ठिकाणांची माहिती देणाऱ्या उपग्रहांचा समूह. सध्या सर्वात लोकप्रिय असणारी दिशादर्शक प्रणाली ही अमेरिकेची आहे. तिला जीपीएस म्हणजे 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' म्हणतात. वापरण्यास अत्यंत सोपी असल्यामुळे ती सध्या सर्वमान्य झालेली आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सुद्धा दिशादर्शक प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रशियाची ग्लोनास किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम, युरोपीय समुदायाची गॅलिलिओ, चीनची बेंड्डु, जपानची रक्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम कार्यरत आहेत.
भारताचीही स्वतःची दिशादर्शक प्रणाली आहे. तीचे नाव आहे आयआरएनएसएस (Indian Regional Navigation Satellite System)
ही दिशादर्शक प्रणाली केवळ स्मार्टफोन पुरतीच मर्यादित न राहता तिचे अनेकविध उपयोग आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, मोबाइल फोन यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटक आणि गिर्यारोहकांना दिशादर्शनासाठी, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनींसह दिशा सांगण्याबरोबरच लष्करासाठी ती उपयुक्त असल्यामुळे काहीवेळा धोकासुद्धा संभवतो. भारताच्या या दिशादर्शक प्रणालीचा एकूण खर्च एक हजार चारशे वीस कोटी रुपये आहे. जीपीएसवर सध्या अवलंबून असणाऱ्यांनी आणि विकासाचे फायदे घेणाऱ्यांनी तरी अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. ज्या उपेक्षित घटकांना या विकासाचे फायदे मिळत नाहीत त्यांचा विचार करणं आवश्यक आहे.

*- नितीन शिंदे*
*'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *श्रीलंकेचे चलन कोणते ?*
       श्रीलंका रुपया

2)  *'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       स्वामी दयानंद सरस्वती

3)  *'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       महात्मा फुले

4)  *'डिस्कवरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?*
       पं जवाहरलाल नेहरू

5)  *'वेदाकडे परत चला' ही घोषणा कोणी दिली ?*
       स्वामी दयानंद सरस्वती

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  नागेश अशोक धावडे
●  नागनाथ शिंदे
●  रोहित भोळे
●  हणमंत सावंत

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.*
*माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?*

     ••☆‼ *रामकृष्णहरी*  ‼☆••
     🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
     *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई*
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।*
*देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.*
*मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...*
*की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..*
*सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...*
*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...*
*आपली होऊन जातात...*
*तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...*
*चेहरा बघण्यापेक्षा...*
*नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...*
*शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...*
*त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....*
*शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते*
*तर मनाची सुंदरता,*
*टिकून राहाते शेवटपर्यंत...*
*शरीराला वय असतं....*
*मनाला ते कधीच नसतं...*
*शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...*
*शरीर तर असतं निमित्तमात्र...*
*माणसाच्या स्वभावात गोडवा...*
*शालीनता...*
*प्रामाणिकपणा...*
*आणि विनयशीलता असेल...*
*तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...*
*तरी ती हवीहवीशीच वाटते...*
*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,*
*देवघरातील समईच्या तेजापुढं*
*आपण नतमस्तक होतो...*
*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...*
*त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!*
*आपल्या आवडत्या माणसाचं...*
*आपल्यासोबत असणं...*
*ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...*
*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...*
*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?*
*नशिबानं कधी भेटलीच...*
*तर हळुवार जतन करून ठेवावीत...*
*कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?*
*माणूस बनुया,माणस जपुया,*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*   
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना  वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत  नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *सकारत्मक दृष्टिकोन*

एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."
"महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.

सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "
पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या) गावी जाणार कसे ?
तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल !! आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें