✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 10/10/2019 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
*जागतिक मृत्युदंड निषेध दिन*
*राष्ट्रीय टपाल दिन*
💥 जन्म :-
◆१८९५ - भक्ती रक्षक श्रीधर देव गोस्वामी महाराज, भारतीय गुरू.
◆१९०६ - आर.के. नारायण, भारतीय इंग्लिश लेखक.
◆ १९३३ - सदाशिव पाटील, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
◆ २००६ - सरस्वतीबाई राणे, भारतीय - मराठी गायिका.
◆ २००८ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
◆ २०११ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *नवी दिल्ली : दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्माचाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची आता महागाई भत्ता १७ टक्के होणार आहे. तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही आठवडाभर आधीच पगार मिळणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज होणार स्वस्त*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीत रंगला मर्दानी दसरा, 42 किलोची खंडा उचलण्याची स्पर्धा अनुभवण्यासाठी भक्तांची गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *औरंगाबाद खंडपीठाने अहमदनगर जिल्हा न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती नेमली असून ही समिती शिर्डी संस्थानच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विश्वस्त मंडळाने घेतलेले निर्णय तपासणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *ज्येष्ठ रंगकर्मी आणि 'आविष्कार' नाट्यसंस्थेचे संस्थापक अरुण काकडे यांचं निधन *
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नवी दिल्लीः भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ८ गडी राखून मात केली. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.*
••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *आजपासून भारत आणि आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना जिंकून भारताला ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण*
https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/27.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' चे कार्य काय ?* 📙
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक क्षेत्रांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. जगाच्या बरोबरीने भारताची वाटचाल ज्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र म्हणजे अंतराळ. चंद्रावर २००८ साली 'मून इम्पॅक्ट प्रोब' तर २०१४ साली पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे मंगळावर 'मंगळयान' पाठविणारा पहिला देश ठरण्यात भारत यशस्वी झालेला आहे.
सन १९६२ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'Indian Space Reasearch organisation' (इस्रो) या संस्थेचे प्रमुख प्रवर्तक डॉक्टर विक्रम साराभाई होते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट उपग्रह आणि अग्निबाण यांची निर्मिती करणे, उपग्रह वाहकांची तसेच प्रक्षेपकांची निर्मिती करणे हे आहे. त्रिवेंद्रम जवळील थुंबा येथे भारताचे पहिले अग्निबाण प्रक्षेपण स्थळ कार्यान्वित झाले. भारताने १४ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या भूमीतून 'आर्यभट्ट' हा तीनशे साठ किलो वजनाचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळयुगास प्रारंभ केला. 'भास्कर १' हा प्रायोगिक स्वरूपाचा उपग्रह पृथ्वीच्या निरीक्षणासाठी ७ जानेवारी १९७९ रोजी अंतराळात सोडण्यात आला. दूरदर्शनचे कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून 'इन्सॅट १ए' उपग्रह १० एप्रिल १९८२ रोजी अंतराळात सोडण्यात आला. पण सप्टेंबर १९८२ मध्येच तो निकामी झाला. त्यानंतर 'इन्सॅट १बी', 'इन्सॅट १सी', आयआरएनएसएस इत्यादी उपग्रह सोडण्यात आलेले आहेत. चंद्र आणि मंगळ भारतीयांच्या कवेत आलेलाच आहे आता फक्त वेध आहेत इतर ग्रह ताऱ्यांचे. त्यासाठी इस्त्रो विविध मोहिमांमध्ये गुंतलेली आहे. भूस्थिर उपग्रह पाठवणे किंवा इतर ग्रहांकडे यान पाठवण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढण्यासाठी LVM3 या अंतराळ वाहकाच्या मोहिमेमध्ये इस्रोचे वैज्ञानिक सध्या गुंतलेले आहेत.
रशियाच्या मदतीने २ एप्रिल १९८४ रोजी राकेश शर्मा हा अंतराळात जाणारा पहिला भारतीय अंतराळवीर ठरला. त्याच्या बरोबर दोन रशियन अंतराळवीर सुद्धा होते. अंतराळयान भारतावरून जात असताना त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा यांचे बरोबर संपर्क साधला आणि विचारणा केली की 'आपको भारत कैसा दिखता है ?' त्यावेळी राकेश शर्मा यांचे उद्गार होते, 'सारे जहाँ से अच्छा'. आज प्रांतवाद, धर्मवाद, जमातवादाची भाषा करणारी, दंगलीच्या माध्यमातून माणसा माणसांतील अंतर वाढवणारी, संघटित आणि प्रस्थापित झालेली व्यक्तिमत्त्वे, आपण सर्व भारतीय म्हणून विचार करणार आहेत की नाही ? हा मुख्य मुद्दा आहे.
भारतीय वंशाची परंतु अमेरिकेची नागरिक असलेली कल्पना चावला २००३ मध्ये नासाच्या मदतीने अंतराळात गेली. परंतु १ फेब्रुवारी २००३ मध्ये कोलंबिया यानातून पृथ्वीवर परत येत असताना दुर्घटना घडली. कल्पना चावलासहीत सात अंतराळवीर मृत्युमुखी पडले. अंतराळात जाणे जीवावर सुद्धा बेतू शकते याची प्रचिती या निमित्ताने आली. अमेरिकेने सर्व अंतराळवीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशनींना नाव दिलेली आहेत. त्यातीलच एका अशनीचे नाव आहे 'अशनी ५१८२ कल्पना चावला'. भारत सरकारने हवामान संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहाला 'कल्पना १' आणि 'कल्पना २' ही नावे देऊन तिचा उचित सन्मान केला आहे. दिनांक ९ डिसेंबर, २००६ मध्ये भारतीय वंशाची परंतु अमेरिकेच्या नागरिक असलेल्या सुनीता विल्यम्सने अंतराळात जाण्याचा मान पटकावला. अंतराळात जास्त काळ राहणारी (जवळपास १९५ दिवस), बोस्टन मॅरेथॉनमध्ये अंतराळातच भाग घेणारी, अंतराळात जास्त काळ चालणारी महिला, अशा विविध वैशिष्ट्यांनी तिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जलद शतक काढणारा, एका षटकात जास्त धावा काढणारा, जास्त धावा देणारा, जास्त षटकार मारणारा, जास्त शतके काढणारा, रटाळ खेळणारा, असल्याच वैशिष्ट्यांचा मारा प्रसार माध्यमांच्याद्वारे सहन करणाऱ्या भारतीय समाजाकडून सुनीता विल्यम्सची वैशिष्ट्ये उपेक्षित राहणे स्वाभाविकच आहे.
पहिली भारतीय महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावलाचे नाव बहुतांश वेळेला घेतले जाते. पण कल्पना चावला अथवा सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या अंतराळवीर आहेत. कारण त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. पहिली भारतीय महिला अंतराळवीर होण्याचा बहुमान अजून कोणीही पटकावलेला नाही. त्यामुळे शालेय अथवा महाविद्यालयीन युवतींना अजूनही संधी उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी साचेबद्ध शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडून संशोधनात्मक वृत्ती जोपासण्यची गरज आहे.
स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हाॅएल, जेफरी बर्बीज आणि डॉक्टर जयंत नारळीकर यांनी पुनरुज्जीवन केले आणि नवीन सिद्धांत मांडला 'स्थिरवत स्थितीचे विश्व' या नावाने. पुण्यामध्ये कार्यरत असलेल्या 'आयुका' या संशोधन संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष असलेल्या डॉक्टर जयंत नारळीकर यांचे खगोल विज्ञानाच्या प्रसारामध्ये आणि संशोधनांमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे. 'चंद्रशेखर मर्यादा' किंवा Chandrashekhar Limit' या नावाने अजरामर झालेल्या अनिवासी भारतीय डॉक्टर एस चंद्रशेखर यांचेही योगदान खगोलविज्ञानामध्ये उल्लेखनीय आहे. श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यांमध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात. या त्यांच्या संशोधनाला १९८३ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अशा या भारतीय खगोल वैज्ञानिकांचा वारसा पुढे चालवायचा असेल तर मात्र प्रामाणिकपणे इस्रोच्या टीममध्ये सामील होण्याची आवश्यकता आहे.
*डाॅ. नितीन शिंदे*
*'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*“ मोठी व्यक्ती संधी मिळाली नाही अशी तक्रार कधीच करीत नाही. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *मानवी डोक्याच्या कवटीत असणाऱ्या हाडांची संख्या किती ?*
8
2) *शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करतो ?*
लहान मेंदू
3) *कोणत्या अवयवाची त्वचा सर्वात पातळ असते ?*
डोळा
4) *कोणत्या जिवाणूंमुळे दुधाचे दही होते ?*
लॅक्टोबॅसिलिस
5) *सिसमोग्राफने काय मोजले जाते ?*
भूकंपाची तीव्रता
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● पडोळे डी सी, दहेली तांडा, किनवट ● विशाल अन्नमवार
● राजेश्वर भुरे ● सतीश बड्डेवाड
● आदिनाथ कपाटे पाटील ● संतोष खेडकर
● गंगाधर पापुलवार ● श्याम देसाई
● राजेंद्र वाघमारे ● पोतन्ना चंदेवाड
● सतीश बोधनकर ● रेखा अर्गे
● माधव गवळे ● विठ्ठल धुळेवार
● गोविंद पाटील ● वसंत कदम
● रामा गायकवाड ● कैलास सांगवीकर
● विनोद लोणे ● तुकाराम ढोले
● शंकर बत्तीनवार ● तानाजी पाटील
● अरुण शंखपाळे ● प्रमोद यादव
● शरद घुबे ● राज वजीरे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*देव नक्की कशात आहे ? मुर्तीत आहे का ? नाही, पण तो आहे असे समजून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र पाळून यथासांग मंत्रोच्चाराने त्यास आमंत्रित केले जाते. अशा मुर्तीला वर्षानुवर्ष एकाग्रपणे समरसून त्यात देवाचे स्वरूप पाहिल्याने व निष्ठा वाहिल्याने एक दिव्य तेज प्राप्त होते. त्याची उदाहरणे म्हणजे कित्येक प्राचीन मंदिरात प्रतिष्ठापित झालेल्या श्री काशी विश्वेश्वर, श्री विठ्ठल, श्री बालाजी, श्री अंबाबाई, श्री तुळजाभवानी, श्री सिद्धीविनायक या व अशा अनेक मूर्तींमध्ये कालांतराने दिव्यत्व प्राप्त झालेले दिसते, ते त्यातील 'यथा देहे तथा देवे' या सुत्राचे पालन केल्यामुळे.*
*या मूर्तींच्या दर्शनाने जो आनंद मिळतो, त्याला कारण तिथल्या उपासना, त्रिकाळ आरत्या, तिथले प्रसन्न वातावरण, धुपाचा सुवास, फुलांची आनंददायी सजावट, समईच्या मंद तेवणा-या शुभ्र कळ्या, चंदनाचे गंध, पितांबर आणि पांढरे उपरणे, मस्तकावर सुवर्ण मुकुट वगैरेंनी नटलेली मुर्ती व तिचे निमूटपणे आपल्याकडे पाहत शांत उभे राहणे. अशा ठिकाणी देव पाहण्याचे भाग्यच लागते. तो हाडामांसाचाच दिसावा असा भक्ताचा हट्ट तिथे अजिबात नसतो. त्याच्या निराकार अस्तित्वावर त्या भक्ताचा विश्वास असतो. त्या आधारावर तो त्या मुर्तीत देव पाहतो.*
••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●••
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*नेकी करो, और दरियामे डालो।*
*या* *संतवचनाचा महिमा खरेच अगदी महान आहे.*
*साधू -संत (फक्त त्यागी) एकेठिकाणी कधीच थांबले नाहीत.जिथे थांबले* *तिथे काहीतरी चांगली विचारांची पेरणी करून मगच* *पुढे गेलेत हा इतिहास* *सांगतो.*
*म्हणूनच तर अशा महान लोकांना* *आजही समाज मानतो.*
*खारुताई, दिसायला किती छोटी पण ती जंगलामध्ये खाल्लेल्या बिया माती* *कोरून गाडून टाकते व कालांतराने त्याठिकाणी झाडे* *उगवतात.खारुताई हे कधीच विसरून जाते व आपले काम* *करते.तसेच आपण हटके कामासाठी फळाची अपेक्षा करू नये.*
*अशोक कुमावत,नासिक*
*(राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
काही जणांच्या मनामध्ये ब-यावाईट विचारांचे सतत मंथन चालू असते.अशावेळी नेमक्या चांगल्या विचारांना कसे बाहेर काढायचे तेच समजत नाही.ही चांगल्या गोष्टींच्याच बाबतीत होत असते.उदाहरणच घ्यायचे झाले तर आपण दह्यापासून ताक बनवतो आणि ताकापासून लोणी आणि लोण्यापासून तूप बनवतो.केवळ एकाच प्रयत्नाने शक्य झाले का ?नाहीना !मग एखाद्या चांगल्या विचाराला जन्म द्यायचा झाला तर अगोदर वाईट विचारांच्या गर्दीत एका चांगल्या विचाररुपी रवीने मंथन करुन नवनीत अर्थात लोणी काढतो आणि त्या लोण्याचा स्निग्ध पदार्थ म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी उपयोग करतो त्याचप्रमाणे आपल्यातला एखादा चांगला विचार आपण आपल्या मनाच्या मटक्यातून मंथन करुन काढला आणि तो आपल्या व इतरांच्या जीवनासाठी अधिक फायद्याचाच ठरेल.ज्यामुळे चांगल्या विचारांची देवाणघेवाण होईल आणि जीवन समृद्ध होईल.यासाठी चांगल्या सशक्त विचारमंथनाचीच सर्वांना गरज आहे.वाईट विचारांची कुणालाही गरज नाही एव्हाना तुम्हाला देखील.
© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.९४२१८३९५९०/
८०८७९१७०६३.
🍁🍃🍁🍃🌹🍃🍁🍃🍁
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*चढ आणि उतार*
आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.'
बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.
थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.
त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...'
*तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें