✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 21/10/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
*भारतीय पोलीस स्मृती दिन*
💥 जन्म :-
◆ १८८७ - भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंग
💥 मृत्यू :-
◆ १९८१ - ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी दत्तात्रय
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आज नऊ कोटी मतदार ठरवणार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य, लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोग सज्ज, सुरक्षेसाठी 4 लाख पोलीस कर्मचारी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मतदानावर पावसाचे सावट, अनेक मतदान केंद्रावर चिखलाचं साम्राज्य, कर्मचाऱ्यांची तारांबळ, तर मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्रात 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मनमाड :- ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने केला घात, पिकांचे नुकसान, शेतकरी पुन्हा संकटात, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई : यंदा दिवाळीच्या आधीच निवडणुकीच्या निकालाचे, फटाके फुटणार आहेत. मात्र, निवडणुकीमुळे दिवाळीतला साहित्यिक फराळ म्हणजे दिवाळी अंक महागला आहे आणि त्याची आवकही कमी झाली आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची मोठी कामगिरी, 22 दहशतवादी आणि 11 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, दहशतवाद्यांचे सात तळ केले उद्ध्वस्त, चांदवड तालुक्यातील भरवीर येथील सैन्यदलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज हा जवान शहीद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोल्हापूर: देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान 'रुस्तम-ए-हिंद' दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला डाव 497 धावांवर घोषित, दुसऱ्या दिवस अखेर आफ्रिकेच्या 2 बाद 9 धावा, रोहित शर्माचं कसोटी कारकिर्दीतलं पहिलं द्विशतक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*चला मतदान करू*
पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
https://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_84.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *निर्वात पोकळी म्हणजे काय ?* 📙
निर्वात पोकळीचा वापर अनेक ठिकाणी करावा लागतो आणि तो विविध कामांसाठी सुटसुटीत व उपयुक्त ठरतो. निर्वात पोकळी म्हणजे जेथे हवाही नाही अशी पोकळी. अर्थात हवेचा कणनकण काढून घेणे येथे शक्य नसते. पण जवळपास सर्व हवा काढून घेतली जाते, हे खरे. अर्थात निर्वात पोकळीमधून उष्णता व आवाजाचा प्रवास होऊ शकत नाही. निर्वात पोकळीमध्ये प्राणवायूचा अभाव असल्याने वस्तूंच्या ज्वलनाने 'ऑक्साइड' या संयुगात रूपांतर होत नाही. निर्वात पोकळीमध्ये लहानसे छिद्र पाडून जागा निर्माण झाली, तर झपाट्याने हवा किंवा संपर्कामधला द्रव शिरकाव करतो.
या सर्व गोष्टींचा वापर सुटसुटीतपणे आपण व्यवहारात करून अनेक ठिकाणी निर्वात पोकळी निर्माण करतो व तिचा उपयोग करून अन्य वस्तू बनवतो.
रोजच्या वापरातील कागदी व प्लास्टिकची पोकळ नळी म्हणजे स्ट्रॉच बघा ना. बाटलीतील द्रवपदार्थ शोषून घ्यायला आपण स्त्रा वापरतो. हवा शोषून घेतल्याने स्ट्राॅमध्ये पोकळी निर्माण झाली की वातावरणातील दाबामुळे द्रव तोंडात जातो.
पदार्थ गार वा गरम ठेवण्याचा थर्मास घ्या. याचे बाहेरचे भांडे व आतील भांडे यांमध्ये निर्वात पोकळी निर्माण करून ठेवलेली असते. शिवाय दोन्ही पृष्ठभाग अत्यंत चकचकीत करून उष्णतेचे परावर्तनही करतात; पण मुख्यतः पोकळीमुळे आतील पदार्थ गरम वा गार राहण्यास मदत होते.
ऑपरेशन थिएटरमध्ये सक्शन मशीन वापरले जाते. ऑपरेशन चालू असताना रोग्याच्या शरीरातील विविध स्राव, रक्त, खराब, दूषित पाणी काढण्यासाठी निर्वात पोकळी बाटलीत निर्माण केली जाते. हे सर्व स्राव मग एका नळीवाटे झपाट्याने शोषून घेऊन ही पोकळी भरली जाते. या मशीनशिवाय अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचणे कठीण झाले असते, इतके हे उपयुक्त असते. रुग्णाच्या श्वसनमार्गात, घशात साचलेले स्राव काही सेकंदात शोषून श्वसनमार्ग मोकळा करून देण्याचे कार्य हे या यंत्र करते.
याच पद्धतीचा वापर घरातील व्हॅक्यूम क्लीनर यंत्रात केला जातो. वेगाने फिरणारा पंखा पोकळीसदृश परिस्थिती या यंत्राच्या तळाशी निर्माण करतो व बारीकसारीक धुलीकण वेगाने शोषून घर स्वच्छ केले जाते. पंख्याने फेकलेली हवा मागील बाजूने हलकेच बाहेर पडत राहते, तर धुळ एका पिशवीत जमा होत राहते.
खोल बोअरिंगमधील पाणी उपसणारे पंपही हेच तत्त्व वापरतात. तर एखाद्या डब्यातील रॉकेल व पेट्रोल काढण्यासाठी प्रथम एखाद्या नळीमध्ये निर्वात पोकळी निर्माण करूनच हे द्रव सायफन नळीद्वारे आपण काढतो.
निर्वात पोकळीचा वापर अनेक विजेच्या उपकरणात केला जातो. विजेचा दिवा, टीव्हीची ट्यूब, क्ष-किरण निर्मितउपकरणे यांमध्ये निर्वात पोकळी निर्माण केली जाते. येथे महत्त्वाची गरज असते, ती पदार्थांचे प्राणवायूबरोबर संयुग बनू न देण्याची. विजेच्या दिव्यातील टंगस्टनची तार प्राणवायूच्या संपर्कात तापली, तर लगेच खराब होते, अन्यथा निर्वात पोकळीत ती तासनतास काम देत राहते.
निर्वात पोकळीचा वापर करून वातावरणातील दाब मोजण्याचे काम करणारा बॅरोमीटर बनवला जातो. या नोंदीवरून पावसाच्या, वादळाच्या अचानक आगमनाचा पत्ता लागू शकतो. पोकळीचा निर्वातपणा उरलेल्या हवेच्या दाबाने मोजला जातो. यासाठी Torr हे एकक वापरले जाते.
निर्वात पोकळीची अवस्था विश्वात बहुसंख्य ठिकाणी आहेच. पृथ्वीचे वातावरण सोडले, तर आपण एक प्रकारच्या निर्वात पोकळीतच प्रवास करतो. गुरुत्वाकर्षणामुळे हे वातावरण पृथ्वी घट्ट पकडून धरते व पोकळीकडे शोषु देत नाही, हे सुद्धा महत्त्वाचे नाही काय ?
*सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *'जागतिक गरिबी निर्मूलन दिन' केव्हा साजरा केला जातो ?*
17 ऑक्टोबर
2) *आगा खान पॅलेस कोठे आहे ?*
पुणे
3) *सत्यशोधक समाजा'ची स्थापना कोणी केली ?*
महात्मा ज्योतिबा फुले
4) *महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली ?*
01 मे 1960
5) *'जागतिक पर्यावरण दिन ' केव्हा साजरा करतात ?*
05 जून
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● बाबू फिलिप्स डिसूझा, पुणे
● नरेश बलकेवाड
● सुरेश पून्नावाड
● कोमल सिंग
● विष्णुदास शिंदे
● शिवराज पाटील गाडीवान
● मा. गोविंद कंधारे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !*
*भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.*
*"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*🤝🏻💪🏻आज आपण लोकशाहीचा एक नवा अध्याय निर्माण करणार आहोत.*
*👉लक्षात घ्या,जेव्हा राष्ट्राचे मतदार कमजोर पडतात,तेव्हा भष्ट्राचाराचे किटाणू,तेथील राजकीय,सामाजिक,* *शैक्षणिक आणि बौद्धिक व्यवस्थेवर हल्ला* *करून तिला पोखरून नष्ट करतात.*
*लोकशाही भक्कम करायची असेल ,*
*देश बळकट आणि प्रगत करायचा असेल तर आजची संधी वाया घालवू नका.*
*तुम्हाला अनेक प्रलोभने दाखवतील,*
*प्रतिकूल परिस्थितीत अर्थसहाय्य करतील. ही अशी करणारी माणसं ते* *निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर* *राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी* *माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत* *प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे.* *राजकारणात संस्थानिक घराणी शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून यावेळी* *किंवा निवडणूक जवळ आली की एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन* *_अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम करतात. सत्कार_* *स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांचे नतमस्तक होऊन हस्तक बनतात. आणि* *राजकारणात वापर करतात.हा प्रलोभनाचा कार्यक्रमच मुळी सर्वांना* *दीन करण्याचा असतो..*
*समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आणि आहे की नोकरदारांना , कामगारांना, शेतकऱ्यांना, मजुरांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला ,बांडगुळ संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. मनी, मसल, अन मीडियाच्या जोरावर कर्तृत्व नसताना संस्थापकांचा,राजकारण्यांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष,आमदार ,खासदार,मंत्री बनत राहतात, तर शिपाई,शेतकरी, लिपीक, कामगार,प्राध्यापक, प्राचार्य ,मजूर रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होत आहेत.*
*"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, अधीर होणं,समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक,राजकिय अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*
*लक्षात असुद्या-स्वतःला एक दिवसासाठी, एका मतासाठी विकून* *नतमस्तक आणि हस्तक बनू नका, देश,लोकशाही विकू* *नका.खंडप्राय देश अखंड* *राखण्यासाठी स्वच्छ आणि माणसाला उभे करून नवा महाराष्ट्र* *घडविणाऱ्यांच्या हाती सत्ता द्या।*
*अशोक कुमावत, नासिक.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
एखाद्या वाईट विचारासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ चांगल्या विचारासाठी दिला तर त्यातून स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होते.चांगल्या विचारांमुळे आपण काहीतरी चांगले केल्याचे समाधान तर होतेच त्याचबरोबर इतरांनाही काही चांगले दिल्यामुळे मनाला आनंद मिळतो.आपण दिलेला वेळ सत्कार्यासाठी लावल्याचेही आत्मिक समाधान मिळते.पण वाईट विचार केला तर आपले स्वत:चेही समाधान होत नाही आणि इतरांचेही समाधान होत नाही याचे शल्य नेहमी सलत राहते.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*चढ आणि उतार*
आपल्या छानदार खोगिराची एका घोडयाला घमेंड वाटत होती. हमरस्त्याने एक ओझे लादलेला गाढव चालला होता. तो त्या घोडयाला वाट करून द्यायला जरा बाजूला झाला. पण आपल्याच तो-यात घोडा उतावीळपणे त्याला म्हणाला, 'ए, जा रे, हट्. चल लवकर हो बाजूला. नाहीतर एखादी लाथच खाशील.'
बिचारे गाढव गप्पच राहीले. पण घोडयाचे ते उध्दटासारखे वागणे त्याच्या मनात राहीले. काही दिवसांनी तो घोडा म्हातारा व निकामी झालेला पाहून त्याच्या मालकाने तो एका शेतकऱ्याला विकला. आता त्या शेतक-याच्या शेतखणाची गाडी ओढून नेण्याचे काम त्याला करावे लागत होते.
थकला भागला तो घोडा असाच एकदा रस्त्यावरून जात असताना पूर्वीचे ते गाढव त्याला भेटले.
त्याला पाहताच खोचकपणे गाढवाने त्याला विचारले, 'ओऽहो, कुठे निघाली स्वारी? नि हे काय? तुमचं ते पूर्वीचं छानदार खोगिर नाही दिसत कुठे? काय हो अश्वराज, त्या वेळच्या त्या घमेंडीत कधी अशी पाळी येईल, असं वाटलं होतं का तुम्हाला?...'
*तात्पर्य - जीवनात चढ-उतार दोन्ही असतात, हे सदैव ध्यानी बाळगावे.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें