रविवार, 6 अक्टूबर 2019

07-10-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 07/10/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
★१९१९-महात्मा गांधींनी 'नवजीवन'हे वृत्तपत्र सुरू केले.
★१९१२-हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
★ ख्रिस्त पूर्व ३७६१-हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.

💥 जन्म :-
◆१९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. ◆१९७८ - झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆१९५२-ब्लादिमिर पुतीन ,रशियाचे राष्ट्राध्यक्ष.

💥 मृत्यू :-
●१७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू.
●१९९८-भाऊसाहेब वर्तक,महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मुंबईः राज्यात उद्यापासून पाच दिवस वादळी पावसाचे, ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागात दुपार नंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मध्य रेल्वेने मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्र परिसरात तांत्रिक आणि दुरूस्तीच्या कामासाठी हा मार्ग दहा दिवस ठेवणार बंद, यामुळे कोयना, प्रगतीसह नांदेड-पनवेल, मुंबई-हैदराबाद, बीजापूर-मुंबईसह इतर सहा रेल्वे गाड्यांनी प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या गृहप्रकल्पाची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी 05 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *अमरावती : आपल्या साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेले, जनतेत जाऊन मिसळणारे आणि गरीब, वंचितांचे प्रश्न ऐकून घेणारे. आ. बच्चू कडु यांनी कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता रक्तदान करून दाखल केला उमेदवारी अर्ज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबई / पुणे : नवी मुंबईत आणि पुण्यात काल जोरदार पाऊस झाला. मुंबईच्या काही भागात पावसाचा शिकडकावा झाला तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला मेघगर्जनासह विजांच्या कडकडाट होत जोरदार पाऊस पडला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मध्ये भारताच्या आर. अश्विनने ८ विकेट घेऊन श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी केली बरोबरी, अश्विन हा सगळ्यात जलद ३५० विकेट घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा २०३ धावांनी दणदणीत विजय, दोन्ही इनिंगमध्ये शतक करणाऱ्या रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*

प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. ........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल.

https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                      *संघर्ष*

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !
जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.
एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !
150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !
याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !
150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !
दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे
एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *प्रौढ व्यक्तीच्या दातांची संख्या किती असते ?*
       32

2)  *हिंदी महासागरातील 'मोती' म्हणून कोणत्या देशाचा उल्लेख केला जातो ?*
        श्रीलंका

3)  *श्रीलंकेची सांस्कृतिक राजधानी कोणती ?*
       कँडी शहर

4)  *श्रीलंकेचे पूर्वीचे नाव काय होते ?*
       सिलोन

5)  *श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ कोणता ?*
        व्हॉलीबॉल

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  जादू पतंगे, वसमत
●  सुदर्शन कदम
●  दत्तात्रय देवकते
●  अभिषेक निगम
●  रवींद्र शेळके
●  सायरेड्डी चाकरोड
●  डॉ. रवी माळी
●  योगेश गाडे
●  दिपालीताई सतीश सावंत

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..*

*सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्र मानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.*

    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
  🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
    *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।*
*देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.*
*मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...*
*की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..*
*सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...*
*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...*
*आपली होऊन जातात...*
*तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...*
*चेहरा बघण्यापेक्षा...*
*नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...*
*शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...*
*त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....*
*शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते*
*तर मनाची सुंदरता,*
*टिकून राहाते शेवटपर्यंत...*
*शरीराला वय असतं....*
*मनाला ते कधीच नसतं...*
*शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...*
*शरीर तर असतं निमित्तमात्र...*
*माणसाच्या स्वभावात गोडवा...*
*शालीनता...*
*प्रामाणिकपणा...*
*आणि विनयशीलता असेल...*
*तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...*
*तरी ती हवीहवीशीच वाटते...*
*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,*
*देवघरातील समईच्या तेजापुढं*
*आपण नतमस्तक होतो...*
*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...*
*त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!*
*आपल्या आवडत्या माणसाचं...*
*आपल्यासोबत असणं...*
*ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...*
*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...*
*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?*
*नशिबानं कधी भेटलीच...*
*तर हळुवार जतन करून ठेवावीत...*
*कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?*
*माणूस बनुया,माणस जपुया,*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*   
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

म्हणतात ना स्वत:ची पाठ स्वत:ला कधीच दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्यातील काही असलेले दोष आपल्याला लवकर कळत नाही.दुसरे जेव्हा आपल्यातील दोष काढायला लागतात तेव्हा आपल्याना त्यांचा खूप राग येतो आणि अशावेळी वाटायला लागते की,तो कोण आहे आपल्यातले दोष काढणारा ? आपल्यातला हा अहंपणा किंवा माझे तेच खरे आहे असा असणारा स्वभाव किंवा आपली मानसिकता यामुळे लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होत नाही त्यामुळे आपल्यातल्या दोषांवर आपणच पांघरुण घालतो आणि आपल्यातल्या लागणा-या दोषाला अधिक बळकटी देतो त्यामुळे आपल्या जीवनाचे खूप नुकसान होते,आपली चार माणसांमध्ये किंमत तर  राहत नाही उलट आपल्यामध्ये थोडीबहुत जी काही माणुसकी आहे तीही संपून जाते.अशावेळी आपण आपल्यातील दोष दुसऱ्यांनी काढले म्हणून त्यांच्यावर रागावू नका किंवा त्यांच्याशी अबोलाही धरु नका.कारण तेच लोक आपल्यातील दोष जेव्हा दाखवतात यांचा अर्थ आपण समजून असा घ्यायचा की,आपल्याला सुधारणा करण्यासाठी संधी देत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्या जीवनात असलेले दोष दूर करुन जीवन अधिक चांगल्या प्रकारे बनवून समृध्द करायला शिकले पाहिजे.उद्या आपणच त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे राहू आणि आपल्या आदर्श विचारांचा स्वीकार करतील.अशावेळी आपले तेच म्हणण्यापेक्षा इतरांच्या ही विचारांचा विचार करायला हवा की,ज्यामुळे सगळ्यांचेच कल्याण होईल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/
८०८७९१७०६३.
📚🍃📚🍃📚🍃📚🍃📚       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                   *यशाचा घडा*
                  
वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.
एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें