✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 01/10/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर :- वन्य जीव सप्ताह*
*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन*
*आंतरराष्ट्रीयवृद्ध व्यक्ती दिन*
*आंतरराष्ट्रीय संगीत दिन*
इ
💥 ठळक घडामोडी :-
◆१८३७-भारतातील पाहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
◆१९५८ - नासाची स्थापना.
💥 जन्म :-
◆१९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.
◆१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.
💥 मृत्यू :-
◆१९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *नाशिक - सरकारने लागू केलेल्या निर्यात बंदीचे नाशिकमध्ये तीव्र पडसाद. कांदा निर्यात बंदीविरुद्ध उमराणे, सटाणा, चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी केली निदर्शने तसेच ठिक-ठिकाणी रस्ते अडवून सरकारविरोधी दिल्या घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य अखेर निवडणुकीच्या रिंगणात, शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मनसे विधानसभा निवडणूक लढवणार,राज ठाकरे यांची घोषणा, दोन उमेदवारही जाहीर, पाच ऑक्टोबरला मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *करतारपूर कॉरिडोरच्या उद्घाटनासाठी पाकिस्तान पंतप्रधान मोदींऐवजी मनमोहन सिंह यांना आमंत्रण देणार, मात्र डॉ. सिंह आमंत्रण स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *'गली बॉय'मुळे आपण 'ऑस्कर घेऊन येऊ' अशा शब्दात दिग्दर्शक झोया अख्तरनं भारतीय सिनेमा 'गली बॉय'ला ऑस्कर मिळण्याबाबत आशावाद व्यक्त केला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कालिया आणि रॉबर्टची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन, वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास, हरहुन्नरी अभिनेता हरपल्याची भावना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *गरज पडली तर हवाई दलपुन्हा एअर स्ट्राईककरू शकते असे एअर मार्शल आर के एस भदौरिया यांनी व्यक्त केले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*दृष्टी तशी सृष्टी*
https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 📙
मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.
आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.
विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे :
डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)
पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)
*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *इटली या देशाची राजधानी कोणती ?*
रोम
2) *राष्ट्रध्वजावरील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे ?*
हिरवा
3) *भारतात सध्या उच्च न्यायालय किती आहेत ?*
25
4) *नेपाळ या देशाचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?*
गाय
5) *नवीन 200 रुपयाच्या नोटांवर कशाचे चित्र आहे ?*
सांची स्तूप
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● अर्जुन वाकोरे
● विशाल मस्के
● निलेश पंतमवार
● व्यंकट रेड्डी मुडेले
● गोविंदराव इपकलवार
● आनंद पेंडकर
● व्यंकटेश काटकर
● गजानन काळे
● सुभाष टेकाळे
● श्रीकांत भोसके
● माधव शिंदे
● साईनाथ पलीकोंडावार
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.*
*बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*
*" कुछ इस तरह मैने*
*जिंदगी को आसान कर दिया,*
*किसी से मांग ली माफी,*
*किसी को माफ कर दिया !"*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*श्री संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*आलोच आहे या उघड्या-नागड्या जगात।*
*जगायचेच आहे तर मग दिलखुलास जगा।*
*कधी दोन देत, तर कधी दोन घेत।*
*मानवी जीवन ही निसर्गाची अनमोल* *देणं आहे.आनंदाने जगा।*
*एका इंग्रजी सिनेमाची छोटी गोष्ट* *वाचा मग जीवन कळेल कस* *जगावं.*
' *Last Holiday'.....*
*'आयुष्याची शेवटची सुट्टी'*
*जरा उशिरा लावलेला, पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.*
*त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी.*
*त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच.*
*मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी* *सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि* *शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये* *आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत* *उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात* *शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न* *झालेली असते. तिला आनंद तर होतो...*
*पण ती देवाला विचारते...."why now ?...*
*आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"*
*पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता* ' *आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य* *खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा* ' *दांभिक सभ्यतेचा' बुरखा फाडून, स्वतःशी आणि* *इतरांशी निव्वळ 'प्रामाणिक ' रहाते / वागतेे / बोलते.*
*आणि तिला जाणवतं....*
*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना...* .
*आपण आयुष्य ख-या अर्थाने जगलोच नाही.*
*केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील' याची चिंता करण्यात हे* *सुंदर आयुष्य फुकट घालवलं.*
" I *have wasted too much of* *time on assumptions.....*
*now I have time only for* *reality "*
*राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते.* *तिच्या departmental store owner* *लाही खरी खोटी सुनावते.*
*त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.*
*आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत....*
*तिला कसलाही आजार नाही....*
*ती* *एवढ्यात मरणार नाही.*
*तिच्या आनंदाला पारावार रहात नाही.*
*पण या *last holiday* न* *शिकवलेला धडा, ती कधीच विसरत* *नाही.*
*तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात.*
*फिल्मी भाग सोडला तर खरंच विचार करायला लावणारा होता, नायिकेच्या* *या *आयुष्याचा प्रवास.*
*आपणही, आजचा / आत्ताचा क्षण* *कधी भरभरून जगतंच नाही....*
*मनात कायम उद्याची चिंता !*
*काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी ...*
*कायम हातचं सोडून पळत्या पाठी जीवाच्या आकांताने पळत रहातो....*
*इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत* *सहभागी होतो.*
*सगळा आनंद / सगळी मजा, एखाद्या* ' *सुट्टीत' उपभोगण्यासाठी,* *शिलकीत टाकत* *जातो....*
*आणि हे सगळं व्यर्थ आहे....जे खरच* *हवं होतं... आनंद /* *समाधान...हे या कशात* *नव्हतच. ......*
*हेे **कळायच्या आतच ....'शेवटची सुट्टी* *लागते',* *शिलकीतली 'पुंजी' तशीच राहून* *जाते.... न वापरलेली.... कोरीच्या* *कोरी....*
*पण आता निरूपयोगी !*
*या 'शेवटच्या सुट्टी' पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?* *तर प्रत्येक क्षण त्या 'सुट्टी' इतकाच आनंद देईल !*
*So live life gracefully with your own terms.*
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही.
जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल.
खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.
© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*कुत्रा आणि लांडगा*
एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''
तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें