मंगलवार, 22 अक्टूबर 2019

23-10-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 23/10/2019 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
◆ १७०७ - ग्रेट ब्रिटनची पहिली संसद बैठक
◆ १८९० - हरी नारायण आपटे यांनी करमणूक मध्ये लेखणीला केली सुरुवात

💥 जन्म :-
◆ १७७८ - कितुरची राणी चेन्नमा
◆ १८७९ - वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र

💥 मृत्यू :-
◆ २०१२ - बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राज्यात पुढील पाच दिवस पावसाचं सावट, राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी दोन दिवस, तर काही ठिकाणी पाच दिवस पावसाचा अंदाज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *लातूर : लातूर केज, कळंब आणि अंबाजोगाई या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी वाढल्याने दुष्काळाचे सावट दूर, परतीच्या पावसाने मिळाला दिलासा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पीएमसी ग्राहकांचं शिष्टमंडळ आणि आरबीआय अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपन्न, पीएमसीप्रकरणी 30 ऑक्टोबरला आरबीआय पत्रकार परिषदेत निर्णय देणार, मुंबईतल्या आझाद मैदानात पीएमसी खातेदारांचं आंदोलन सुरु*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *यापुढची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषदेत घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *सातारा : आंधळी धरण नऊ वर्षानंतर भरले, माणगंगा नदीला पूर, नदी काठची घरे खाली करण्यास सुरुवात, लोकांना सतर्कतेचा इशारा, सातारा-सोलापूर रस्ता बंद, गोंदावले, दहिडी येथील मुख्य पुलावर पाणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरुम आणि मतमोजणी केंद्राला जॅमर बसवा, दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामधून मुख्यमंत्र्यांविरोधात लढणाऱ्या आशिष देशमुख यांची निवडणूक आयोगाकडे मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाकडून रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी धुव्वा, भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 133 धावांत गुंडाळला, तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
विशेष बातमी : आज शाळांचा शेवटचा दिवस, उद्यापासून शाळेला दिवाळीच्या सुट्यांना होणार प्रारंभ
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *वेळेचे नियोजन*

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *नगरधनचा भुईकोट.....*
जुन्या आणि नव्याचा संगम नगरधनचा भुईकोट

विदर्भातील रामटेक हे धार्मिक स्थळ म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील भाविकांबरोबर इतर राज्यांमधूनही अनेक भाविकांचा ओघ रामटेकला असतो. रामटेक पासून सहा-सात किलोमिटर अंतरावर एक बलदंड भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे नगरधनचा किल्ला होय. रामटेकच्या प्रसिद्ध अशा धार्मिक व पर्यटन स्थळाच्या जवळ असूनही नगरधनचा किल्ला मात्र अनेकांना अपरिचित आहे. रामटेकच्या डोंगरावरुन नगरधनचा किल्ला ओळखू येतो.
नगरधनचा किल्ला रामटेक तालुक्यात असून नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग क्र. ७ आहे. या महामार्गावर मनसर हे गाव आहे. या मनसर गावातून पश्चिमेकडे रामटेककडे जाण्यासाठी किंवा तुमसर (जि. भंडारा) कडे जाण्यासाठी रस्ता फुटतो. या रस्त्याने रामटेक गाठल्यावर तेथून सहा-सात किलोमिटर दक्षिणेकडे नगरधन गाव गाहे.
नगरधनचा भुईकोट हा प्रथमदर्शनी आपल्याला मोहवून टाकतो. नगरधन किल्ल्याने कात टाकून नवे रुप धारण केलेले आहे. याची तटबंदी व आतील भाग नव्याने दुरुस्त केलेला आहे. लालसर पण काळ्यारंगाची झाक असलेल्या चिर्‍यांनी किल्ल्याची तटबंदी व दरवाजा बांधून काढल्यामुळे त्याचे सौंदर्य कैकपटींनी वाढलेले आहे.नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. पुर्वी निरोपानिरोपी करण्यासाठी कबुतरांचा वापर करीत असत. दाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. पुर्वी आत येणार्‍यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची.
दारातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. तटबंदीवर चढल्यावर आपण तटबंदीवरुन फेरी मारु शकतो. या रुंद तटबंदीवर निरीक्षणासाठी मनोरे केलेले आहेत. येथून रामटेक किल्ल्याचे दर्शन उत्तम होते. किल्ल्याच्या आत वाड्याचे तसेच इतर निवासस्थानांचे अवशेष आहेत. किल्ल्यामध्ये तीन मजली खोल विहीर आहे. या मजल्यावर कमानीयुक्त खोल्या असून पायर्‍या उतरुन तिथपर्यंत पोहोचता येते. किल्ल्यामध्ये मंदिर, तसेच काही ठिकाणी प्राचीन अवशेषही पहायला मिळतात.
नगरधनचा किल्ला हा वाकाटक कालीन असल्याचे मानले जाते. म्हणजे चवथ्या शतकातील किल्ला आहे जुन्या आणि नव्याचा संगम असलेला नगरधनचा भुईकोट आटोपशीर आकाराचा असल्यामुळे तो पहाण्यासाठी एखादा तास आपल्याला पुरतो. नगरधनच्या भेटीत आपण रामटेकचा किल्ला व तेथेच नव्याने उभारलेले देखणे असे कालीदासाचे स्मारक ही पाहू शकतो. आपण पुर्व नियोजन व्यवस्थित केल्यास या भेटीतच तोतलाडोहचे अभयारण्यही पाहता येवू शकते.           

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" विचार असे मांडा की, तुमच्या विचारांवर कोणी विचार केले पाहिजे "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *'जागतिक रेडक्रॉस दिन' केव्हा साजरा करतात ?*
        8 मे

2)  *एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण ?*
         ल्युका तेबास, अर्जेंटिना (1975)

3)  *'देवीची लस' कोणी शोधून काढली ?*
        डॉ एडवर्ड जेन्नर,(1749)

4)  *भारतात पहिली अणुस्फोट चाचणी केव्हा झाली ?*
          18 मे 1974

5)  *माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?*
         बचेंद्रि पाल, ( 23 मे 1984 )

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  एकनाथ आव्हाड, साहित्यिक, मुंबई
●  स्वरादा खेडेकर गावडे
●  पंकज बदाणे
●  प्रिया टेकाळे मंडगावकर
●  नरेंद्ररेड्डी चाकरोड
●  अभिषेक नागुलवार
●  ईश्वर डहाळे
●  श्याम पाटील हसेकर
●  साई पाटील नरवाडे
●  सचिन दुर्गम
●  प्रवीण राखेवार
●  डॉ. साखरे साहेब

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.*

*या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.*

   ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●••
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*देव कुणाला भेटला,माहीत नाही.कधी भेटेल हेही माहीत नाही.*
*पण तुकाराम महाराज आपल्या शब्दात सांगतात की* 
*देव पहावयासी गेलो।*
*अन देवच होऊन आलो।*
*व्यापारी वृत्तीचे तुकाराम,नशिबी दोन बायकांच्या संसारात न रमणारे तुकाराम,सोन्याला मातीची उपमा* *देणारे तुकाराम,प्रपंच वेशीला टांगून रोज डोंगरावर जाऊन* *बसणारे,वेळ आली तेव्हा दुष्काळात आपले सर्वस्व  अर्पण करणारे तुकाराम अशा विविध* *छटांमधून संत तुकाराम जेव्हा अभ्यासले जातात तेव्हा कळते की देव कुठे,कसा आणि कुणाला भेटतो.*
*तुम्हीही हीच उपासना करा ,देव नक्की भेटेल.*
*ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतन केले नाही,* *इतरांकडे कधी वक्रदृष्टीने बघितले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही* *कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली* *नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते* *आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण* *आहेत तीच माणसे आपल्या जीवनात देवाला भेटतात किंवा देव त्यांनाच भेटतो.* *आणि हो तोच सुखी व समृद्ध होऊ शकतो. तीच माणसे* *इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि* *आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण*होईल.*
*म्हणूनच म्हटले आहे की तुझे आहे तुझपाशी पण तू जागा भुललाशी।*

*अशोक कुमावत, नासिक.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील.
पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते का ? नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे.आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                     *चतुर ससे*

एका जंगलात दोन चतुर ससे राहत होते.ते एकदा जंगलात फिरत आसतांना त्यांना एका झाडाखाली एक वाघ बसलेला दिसला.ससे खूपखूप घाबरले पण ते खूपच चतुर होते.त्यातील एकाने झाडाच्या फांद्या तोडल्या व अंगाभोवती गुंडाळल्या.उड्या मारतमारत तो वाघासमोरून निघून गेला.वाघ पाहतच राहिला.
       लगेचच दुसरा ससा ऐटीत वाघासमोर आला व म्हणाला ,"वाघदादा आपल्या जंगलात चालणारे व प्राण्यांना खाणारे झाड आले,ते तुम्ही पाहिले का?"
वाघ मनातून घाबरला.त्याने नुकतेच चालणारे झाड पाहिले होते.वाघ काहीच बोलला नाही.तेवढयात दुसरा ससाही तेथून पळून गेला.अशा त-हेने मोठ्या युक्तीने सशांनी आपली सुटका करून घेतली.
*बोधः "शक्तीपेक्षा युक्ती  श्रेष्ठ ".*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

22-10-2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 22/10/2019 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
◆ २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण.

💥 जन्म :-
◆ १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी.

💥 मृत्यू :-
● १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे,
पेशवाईतील न्यायाधीश.
● १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक.
● १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.46 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबई : निवडणुकीत व्यस्त असलेल्या शिक्षकांना आज (२१ ऑक्टोबर) मतदानाच्या दिवशी उशीर झाल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कामावर उशीरा येण्याची  सूट जिल्हा अधिकारी आणि जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.या परिपत्रकामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला. एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई: दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने काल रात्री मुंबईत जोरदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मतदारांसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांच्या पायघड्या, पाण्यातून वाट काढणाऱ्या बारामतीतील नव्या पॅटर्नची चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नवी दिल्ली  : आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या कामाला कोणतीही स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं दिला नकार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *रांची कसोटीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर; फॉलोऑननंतर दक्षिण आफ्रिकेची आठ बाद १३२ अशी अवस्था, भारताला विजयासाठी केवळ दोन विकेट्सची गरज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *सैनिक  :  देशाचा संरक्षक*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙

दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.
स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.
अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.
अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.
घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.
निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" एखादे अवघड काम करण्यासाठी मी नेहमी आळशी माणसाची निवड करतो, कारण त्यावरील सर्वात सोपा मार्ग तोच शोधू शकतो - बील गेटस "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *होमरुल लीगची स्थापना केव्हा झाली ?*
        1 मे 1916

2)  *'जागतिक कामगार दिन' केव्हा साजरा करतात ?*
        1 मे

3)  *'म्हैसूरचा वाघ' कोणाला म्हटले जाते ?*
        टिपू सुलतान

4)  *'बालकवी यांचे पूर्ण नाव काय ?*
       त्र्यंबक बापूजी ठोंबरे

5)  *'मराठी राजभाषा दिन' केव्हा साजरा करतात ?*
       1 मे

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  कवी अमोल शिंदे पाटील
●  पास्कॉल डिसोझा
●  राम गुड्डे
●  पांडुरंग कुलकर्णी
●  रमेश शंडकर
●  संजय कुलकर्णी
●  किरण कुलकर्णी
●  डॉ. मनीष कत्रूवार
●  ईश्वर जी पिन्नलवार
●  विनायक कामठेकर
●  पंकज ओझा
●  शिवशंकर सिरमेवार
●  योगेश अडकटलवार मंजूवाले

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.*
         
*'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*
           
         🌹 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🌹
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*देव कुणाला भेटला,माहीत नाही.कधी भेटेल हेही माहीत नाही.*
*पण तुकाराम महाराज आपल्या शब्दात सांगतात की* 
*देव पहावयासी गेलो।*
*अन देवच होऊन आलो।*
*व्यापारी वृत्तीचे तुकाराम,नशिबी दोन बायकांच्या संसारात न रमणारे तुकाराम,सोन्याला मातीची उपमा* *देणारे तुकाराम,प्रपंच वेशीला टांगून रोज डोंगरावर जाऊन* *बसणारे,वेळ आली तेव्हा दुष्काळात आपले सर्वस्व  अर्पण करणारे तुकाराम अशा विविध* *छटांमधून संत तुकाराम जेव्हा अभ्यासले जातात तेव्हा कळते की देव कुठे,कसा आणि कुणाला भेटतो.*
*तुम्हीही हीच उपासना करा ,देव नक्की भेटेल.*
*ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतन केले नाही,* *इतरांकडे कधी वक्रदृष्टीने बघितले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही* *कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली* *नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते* *आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण* *आहेत तीच माणसे आपल्या जीवनात देवाला भेटतात किंवा देव त्यांनाच भेटतो.* *आणि हो तोच सुखी व समृद्ध होऊ शकतो. तीच माणसे* *इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि* *आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण*होईल.*
*म्हणूनच म्हटले आहे की तुझे आहे तुझपाशी पण तू जागा भुललाशी।*

*अशोक कुमावत, नासिक.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू  लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३
📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *एक छानशी कथा.....*

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.
खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"
ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.
जे मित्र आपली होटेलची बिलं भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे, तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून. जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~