रविवार, 27 नवंबर 2022

28/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/11/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     


💥 ठळक घडामोडी :- 
● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला
● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

💥 जन्म :-
● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.
● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

💥 मृत्यू :- 
● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.
● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट 

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबईत सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. आदित्य ठाकरेंचा 217 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने केला विश्वविक्रम, प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Story-Kind Kondiba👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/fs5JTsw7RVw

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*

भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html 

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *चिखलदरा*

चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.
महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.
परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेत
हे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.
चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) महाराष्ट्रातील किती व कोणत्या शाळांना २०२२ चा केंद्राचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' प्राप्त झाला आहे ?
२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
३) सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच संधी मिळालेल्या महिलेचे नाव काय ?
४) 'पाणी पंचायत' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
५) शिवसेनेचे 'सामना' हे मुखपत्र केव्हा सुरू झाले ?

*उत्तरे :-* १) तीन - सातारा ( २ शाळा ) , रायगड ( १ शाळा )   २) नागपूर   ३) आशा बोथरा   ४) विलासराव साळुंखे   ५) २३ जानेवारी १९८९

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 राम चव्हाण, नांदेड

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

    *हसत दु:खाचा केला मी स्विकार,*
    *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*
    *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*
    *आनंदयात्री, मी आनंदयात्री !*

*दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?*

*दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

       जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.
ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा  विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर  सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.

© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                    *मित्रता*
राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण  खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणाली
राम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला.

*तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें