✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 17/11/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घटना :-
◆ जागतिक अपरिपक्वता दिन
◆ जागतिक स्मृती दिन
◆ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
◆ राष्ट्रीय अपस्मार दिन
💥 जन्म :-
◆ १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार
💥 मृत्यू :-
◆ १९२८ - पंजाब केसरी लाला लजपत राय
◆ २०१२ - शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *:राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *प्लास्टिक उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग, देशातील 60 टक्के प्लास्टिकचा पुनर्वापर होत आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *खासदार संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *जॉन्सन & जॉन्सनला हायकोर्टाचा अशंत: दिलासा, बंद केलेलं उत्पादन सुरू करण्यास परवानगी, पण विक्रीसाठी मनाई*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाची एन्ट्री; राज्य सरकारकडे एकूण तीन निविदा दाखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पुण्यात सीएनजी दरवाढीचा भडका, मध्यरात्रीपासून सीएनजी प्रतिकिलो दीड रुपयाने महागला, पुण्यात सीएनजी आणि डिझेलचे दर एकाच पातळीवर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *बेंगलोरजवळ भारतातील सर्वात मोठा आयफोन निर्मिती प्रकल्प, 60 हजार जणांना रोजगार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मालिका - नॅशनल हिरोज*
*पंजाब केसरी - लाला लजपत राय*
पूर्ण माहिती वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.
http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/lala-lajapat-ray.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ *संकलन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *निर्मलक (डिटर्जंट - Detergent) कसे काम करते ?* 📙
भारतात निर्मलकांचा वापर १९६० च्या दशकात सुरू झाला. त्यांचे मुख्य काम म्हणजे पाण्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा मळ व तेलकटपणा मोकळा करून धुण्याच्या मिश्रणात उतरवणे. थोडक्यात पाण्याची पदार्थ 'विरघळवण्या'ची ताकद निर्मलक वाढवतो. मळलेले कपडे, तेलकट भांडी, तेलाचे मातीचे हात धुण्याची वेळ येते, तेव्हा त्याची हमखास आठवण येते. थोडासा विचार केला, तर निर्मलक आपल्या जीवनात किती व्यापक रीतीने शिरला आहे, हे लक्षात येईल. तो उपलब्ध नाही असे चार दिवस जरी गेले तरी आपले सगळे व्यवहार अडून बसतील. प्रक्षालक व निर्मलक म्हणजे व्यवहारात 'डिटर्जंट' हाच शब्द जास्त सहज वापरला जातो.
पहिला डिटर्जंट बनवला गेला, त्याला आता किमान ७५ वर्षे झाली. फ्रिट्झ गुंथर या जर्मन संशोधकाने हा डिटर्जंट क्रूड ऑईलपासून बनवला होता. पण त्यानंतर कित्येक वर्षे त्याचा व्यावहारिक उपयोग केलाच गेला नाही. सुमारे १९५० च्या दशकात याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सध्या ढोबळमानाने असे म्हणता येईल की, अल्फिलबेंझीन व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या साह्याने तयार झालेल्या संयुगातील अॅसिडचा भाग सोडा अॅश वापरून काढला जातो. राहतो तो डिटर्जंट.
डिटर्जंट तयार झाला तरी त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणखी काही खास प्रक्रिया केल्या जातात. फेस आल्याशिवाय 'साबण' वापरला असल्याचे समाधान मिळत नाही म्हणून फेसाळणारे काही घटक त्यात मिसळले जातात. रक्त, घाम, तेल यांचे डाग निघावेत म्हणून खास वितंचके (Enzymes) त्यात घालतात. याखेरीज कपडे अधिक शुभ्र दिसून चकाकी यावी, यासाठी ऑप्टिकल व्हाइट्नर घालण्याची पद्धत आहे. डिटर्जंटची पावडर जितकी हलकी, जितकी तिची लाही मोठी, तितकी ती लवकर काम करते. यासाठी तयार डिटर्जंट मोठाल्या ढवळून काढणाऱ्या मिक्सरमधून काढला जातो. त्यात आकर्षक दिसण्यासाठी हलकासा रंग व छान सुगंधी वास मिसळला जातो.
याच वेळी काम करणाऱ्या हातांची कातडी, कपडे, भांडी, धुण्याच्या वापरातील बादल्या यांवर रासायनिक अपायकारक प्रक्रिया होऊ नये, ही पण काळजी डिटर्जंट घेत असतो. डिटर्जंटच्या आधी काम करणारा साबण व कॉस्टिक सोडा हा काम करणाऱ्याला त्रासदायक तर ठरेच, पण त्याची चिकट लगदास्वरूपी लुकणे कपड्याला चिकटून राहत असत. डिटर्जंट वापरायलाही खूपच सोपा असतो. पाण्यात झटकन विरघळवुन त्या मिश्रणात कपडे बुडवतात येतात. त्यामुळे अनेक कपडे एकदम धुवुन निघू शकतात.
डिटर्जेंटचा वापर सुरू झाला आणि जवळपास दशकभराने नवीनच समस्या समोर उद्भवताना आढळू लागल्या. आज या समस्यांनी समोर थोडेसे आव्हान व थोडेसे गंभीर स्वरूप धारण केले आहे. सगळ्या वापरातला डिटर्जंट गटारावाटे जेव्हा एकत्र होतो, तेव्हा पाण्यातील जंतू त्याचे विघटन करू शकत नाहीतच; पण या डिटर्जंटमुळे पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावर परिणाम होऊ लागतो. हे पाणी नदीत गेल्यास तेथील जलचरांवर त्याचा दुष्परिणाम दिसून त्यांची संख्या रोडावू लागते.
यावर उपाय शोधणे चालू आहे. प्रयोग चालू आहेत; पण अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. डिटर्जंट तयार करणे फारसे अवघड नाही. अगदी घरगुती स्वरूपातही तो तयार करता येतो. कच्चा माल आपल्या देशात सहज उपलब्ध आहे. पावडर स्वरूपातील, वडी स्वरूपातील किंवा द्रव स्वरूपातील डिटर्जंट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डिटर्जेंट तयार करणारी एक भारतीय कंपनी कसलीही आधुनिक यंत्रणा, वीज यंत्रे न वापरता डिटर्जंट तयार करते, विकते व तिची आज भारतीय डिटर्जंटच्या विक्री मध्ये निम्म्यापेक्षा जास्त टक्केवारी आहे. या उत्पादनासाठी फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणींचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आहे. 'निरमा' हे तिचे नाव.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" रोज सकाळी उठल्यावर, मिळालेल्या दिवसासाठी परमेश्वराचे आभार माना. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कोठे व केव्हा झाले ?
२) 'शिवसेना' या पक्षाची स्थापना कोणी केली ?
३) 'सामना' या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते ?
४) बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन व आदर्शांवर आधारित मराठी चित्रपटाचे नाव काय ?
५) बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?
*उत्तरे :-* १) मुंबई, १७ नोव्हेंबर २०१२ २) बाळासाहेब ठाकरे ३) बाळासाहेब ठाकरे ४) बालकडू ( २०१५ ) ५) पुणे, २३ जानेवारी १९२६
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● योगेश सराफ, स्फुटलेखक
● साहेबराव डोंगरे, सहशिक्षक
● माधव पांचाळ
● गोविंद बैस
● निकिता पुलकंठवार
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*झोका काय नि पाळणा काय. स्वप्नात नेणारी ही जादूभरी दुनिया. चंद्र दिसतो आकाशात. हाती येणार नसतो बाळाच्या. पण हात उंच करून धरू पाहणारे हात थांबत नाहीत. आनंद, दु:ख, भीती, ग्लानी, नीज. झोका थांबला की बाळ रडते. झोका दिला की गुंग होते. वास्तवापासून दूर नेतो झोका. विसरायला लावतो जे नको असते. देह आणि मनाचा खेळ सगळा.*
*जत्रा भरते तेव्हा उंच उंच रहाटपाळणे असतात तिथे. लहानपणी नव्हते एवढे उंच पाहण्यात. चार पाळण्याचे, कमी उंचीचे गावच्या जत्रेत असायचे..त्यात बसण्याची ओढ आणि उतरण्याची घाई असायची. एकेक पाळणा हाताच्या साह्याने फिरवत, पाळणा उंच जाई., खाली येई, गती वाढत जाई. उंच जाताना उचलण्याचा गोळा पोटात आणि खाली येताना भीतीचा खड्डा पोटात. उच्च आनंद आणि प्राणस्पर्श होणारी भीती. आयुष्यात येणा-या अशा अनेक प्रसंगाच्यावेळी हे भान ठेवावंच लागतं. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट व्हायलाच हवी. नाहीतर साधी गोष्टसुद्धा प्राणस्पर्शापर्यंत घेऊन जाते आपल्याला.*
*दोन दोरांच्या हातांनी*
*झोका देहास वेढतो*
*मनालाही वेटाळून*
*झोका प्राणास छेडतो.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
माणसाच्या डोक्यात कितीही अनंत विचार असले तरी प्रत्यक्ष काम करताना किंवा अमलात आणताना फक्त एकच विचार आणतो तेव्हा कुठे तो त्या कामात यशस्वी होतो.कारण एकाच कृतीवर त्याचे लक्ष केंद्रीत करावे लागते.जर काम करत असताना अनेक विचार डोक्यात ठेवून हातात असलेले कितीही चांगले काम असले तरी त्या अनेक विचारांमुळे काम बिघडून जाते.अशावेळी आपली मानसिकता चांगली असणे आवश्यक आहे.मानसिकताही बिघडवण्याचे काम डोक्यातले अनेक विचार असतात.अशावेळी शांत संयमी रहावे आणि आपल्याला नेमके कोणते काम पार पाडावयाचे आहे याचाच फक्त विचार करावा आणि त्याच विचाराने कृती करावी मगच त्यानंतर एखादा महत्त्वाच्या विचाराला प्राधान्य देऊन कृती करावी म्हणजे कामे व्यवस्थित पार पाडता येतात.यामध्ये कोणतेही काम लवकर संपविण्याची घाई करु नये.मग विचार कितीही डोक्यात असलेतरी...!
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/
८०८७९१७०६३
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आईचे प्रेम*
एकदा एका परीने जाहीर केले,
"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात जास्त सुंदर असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."
ते एकूण सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."
परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."
तात्पर्यः 'आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.' आईची महती जगात महान आहे.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें