गुरुवार, 24 नवंबर 2022

25/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 25/11/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी*


*आंतरराष्ट्रीय महिलाविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन*
*शाकाहार दिन*          

💥 ठळक घडामोडी :- 
● २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
● १९९१-कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळले

💥 जन्म :-
● १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
● १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
● १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
● १९५२-इम्रान खान ,पाकिस्तान चे प्रधानमंत्री.
● १९२६- रंगनाथ मिश्रा ,भारताचे २१ सरन्यायाधीश.

💥 मृत्यू :- 
● १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
● १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *अक्कलकोट, सोलापूर कर्नाटकात विलीन करावे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर संताप, कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा देणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची दिली माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू, मुंबई आणि परिसरातील बळींची संख्या 12 वर तर औरंगाबादमध्येही 8 बालकांना गोवरची लागण झाल्याचा संशय, आरोग्य विभाग अलर्ट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *नागपुरात 49 वर्षांनंतर प्रथमच 'इंडियन सायन्स काँग्रेस'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये गेल्या 5 वर्षात 80 हजार 865 कोटींची फसवणूक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *प्रतीक्षा संपली ! कोल्हापूर फुटबॉल हंगाम 4 डिसेंबरपासून होणार सुरु ; शाहू स्टेडियम गर्दी अनुभवण्यास सज्ज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा विश्वचषक 2022 च्या मोसमात स्पेन संघाने केली धमाकेदार कामगिरी, कोस्टा रिकाचा पहिल्याच सामन्यात 7-0 ने पराभव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री

*यशवंतराव चव्हाण* पुण्यतिथी निमित्ताने

http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/yashwantrao-chavhan.html

।। विनम्र अभिवादन ।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संकलन :-
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *तापाने फणफणलेल्या मुलाला पांघरून द्यावे का ?* 📙

एकदा घरी एक व्यक्ती बोलवायला आली. तिच्या मुलाला ताप होता. त्यांच्यासोबत घरी गेलो. पाहतो तो काय घराची दारे खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, भर उन्हाळ्यात घरातील सर्व लोक घामाघूम होऊन मुलाकडे चिंताक्रांत नजरेने पाहत बसले होते. मुलाकडे बघितले तर त्याला कानटोपी स्वेटर घातला होता. अंगावर उबदार शाल घातली होती. मुलगा अंथरुणावर तळमळत होता. गेल्या गेल्या सर्वप्रथम मी आई वडिलांना जवळ बोलावून पंखा लावायला सांगितला. नंतर मुलांचे स्वेटर कानटोपी काढली. शाल काढून टाकली. माठातील गार पाणी आणायला सांगितले. एक स्वच्छ फडके आणले. ते ओले करून मुलाची पाठ, छाती, हात पाय कपाळ वारंवार ओल्या फडक्याने पुसले. नंतर मुलाला पातळसर कपडे घातले. एवढे झाल्यावर आईला थर्मामीटरने मुलाचा ताप पाहायला सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला वीस मिनिटात ताप १०३ वरून १०० पर्यंत खाली उतरला होता. असा प्रसंग तुमच्याही घरात होऊ शकतो!
ताप आल्यावर शरीरात जास्तीची उष्णता निर्माण झालेली असते. ती शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. त्यामुळे अशा मुलाला स्वेटर वा उबदार कपडे घातल्याने ताप कमी होणार नाही. याउलट गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने व पाण्याने पुसल्याने ताप कमी होतो. त्यामुळे ताप आलेल्या मुलाला पांघरूण देखील घालू नये. पंख्यांमुळेही गारवा निर्माण होऊन ताप कमी व्हायला मदत होते. या उपायांमुळे तापामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे ताप हा रोग नाही. ते एक लक्षण आहे. वर सांगितलेल्या उपायाने ताप तात्पुरता उतरेल. पण रोग बरा होणार नाही. त्यासाठी त्या त्या रोगाचा विशिष्ट उपचारच घ्यायला हवा.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल "*
- कर्मवीर भाऊराव पाटील

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला खेळाडू अचंता शरथ कमल हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे ?
२) पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
३) बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' या पक्षाची स्थापना केव्हा केली ?
४) लसीकरणाचे जनक कोण ?
५) राही सरनोबत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

*उत्तरे :-* १) तामिळनाडू   २) डॉ.सी. व्ही. आनंदा बोस   ३) १९ जून १९६६   ४) एडवर्ड जेन्नर   ५) निशानेबाजी

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी
      सर्व शिक्षा अभियान, नांदेड
👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद
👤 शिवाजी पाटील कदम
👤 अंकुश बल्लेवार
👤 नरसिंग एंड्रलवार
👤 शिवलिंग गंटोड
👤 महेश मुधोळकर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* 
*परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*

   ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••
            🔹🔹🔹🔹🔹🔹
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
            📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची  नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
   संवाद....९४२१८३९५९०/
               ८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
          *खरी आई*

एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे” असे त्या दोघीही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशांसमोर आणले गेले. त्या दोन्ही बायकांचे म्हणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले खरीआई नक्की कोणती? हे ठरवण  खरोखरचे अवघड होते. न्यायाधीशाने खूप विचार केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली. सेवकाला आज्ञा केली, “या मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या.” न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हटले, “नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा. या मुलाला त्या बाई जवळ राहू द्या. मी मुलावर चा माझा हक्क सोडते .” दुसरी आई मात्र काहीही बोलली नाही. न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले. मुलाचे तुकडे होण्याऐवजी हक्क सोडायला जी बाई तयार होती, न्यायाधीशाने ते मूल त्या बाईस दिले. दुसऱ्या बाईला मात्र तुरंग वासाची शिक्षा ठोठावली.

*बोध: सत्याचानेहमी विजय होतो.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें