सोमवार, 21 नवंबर 2022

22/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 22/11/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    *संत ज्ञानेश्वर सांनीवन समाधी*


💥 ठळक घडामोडी :- 
१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.
१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

💥 जन्म :-
१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.
१९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.
१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

💥 मृत्यू :- 
१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, चालू बील भरलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या कापू नका; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महावितरणला निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सीमा भागातील लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार; सीमा प्रश्नासंदर्भातील बैठकीत निर्णय, सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आरीस पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *PSI परीक्षेचा निकाल जाहीर, पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदांची संख्या 376 असून शारीरीक चाचणीसाठी अर्हता प्राप्त ठरलेले उमेदवार संख्या 1535 आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज,  महाराष्ट्रात नाशिकमधील ओझर सर्वाधिक थंड, अवघ्या 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एन. जगदीशनसह साई सुदर्शनने रचला इतिहास, ४० चेंडूत १९० धावा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा इराणवर दणदणीत विजय, 6-2 च्या मोठ्या फरकाने दिली मात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ*

📲 *VIDEO लिंक👇*
https://youtu.be/GQdy7jj7QII        

Video पाहून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

📙 *आजकाल देवीची लस का देत नाहीत ?* 📙

'देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा' ही वाक्य तुम्ही वाचले असेल. आता तर अशा घोषणाही बंद झाल्या आहेत. कारण जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दि ८ मे १९८० रोजी 'जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे', असे जाहीर केले. त्यानंतर जगात देवीचा एकही रुग्ण सापडलेला नाही. देवीच्या विषाणूंचेच जगातून पूर्णपणे उच्चाटन झाले आहे.

पूर्वी देवी हा एक भयंकर रोग मानला जात असे. या रोगामुळे पुरळ येई, चेहऱ्यावर व्रणांमुळे विद्रुपता येई, कधी कधी अंधत्व येत असे वा मृत्यूही होई. देवी झालेल्या व्यक्तीला ताप असे व तिला प्रचंड थकवा येई.

 देवी हा असा गंभीर रोग असल्याने तो होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस द्यावी लागे. ती लस देणे देवीचे निर्मुलन झाल्याने १९८० नंतर बंद करण्यात आले. साहजिकच ज्यांचा जन्म १९८० नंतर झाला आहे त्यांना ही लस देण्यात आली नाही.

देवीचे पुनरागमन होण्याचा धोका लक्षात घेऊन जागतिक संघटनेने न्यूयॉर्क व मॉस्को या दोन ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये देवीच्या लसीचा पुरेसा साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगाला यशस्वीपणे तोंड देता येईल. देवीचे निर्मूलन हा वैद्यक इतिहासातील सोनेरी अध्याय आहे. देवीच्या नंतर पोलिओ व गोवर या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सध्या कार्यरत आहेत.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तीचा नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजन करणारा सर्वात लहान देश कोणता ?
२) टी - २० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या ?
३) पहाटेचा तारा असे कोणत्या ग्रहास म्हणतात ?
४) भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण ?
५) बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

*उत्तरे :-* १) कतार ( ३० लाख लोकसंख्या )   २) हसरंगा, श्रीलंका ( १५ बळी )   ३) शुक्र   ४) डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम   ५) प्रबोधनकार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 अरुण पवार, सहशिक्षक 
👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक
👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक
👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक 
👤 मधू कांबळे
👤 विकास चव्हाण

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.*

*लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* 

              *॥ रामकृष्णहरी ॥*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
      *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

          माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुसऱ्यांच्या दु:खाला दूर करून सुखाचा नि आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी.फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद. ९४२१८३९५९०
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *इमानदार सखाराम*

शिवानी नावाची मुलगी होती. तिच्या कुटुंबामध्ये तिचे आई-बाबा, ती व तिचा भाऊ राहायचा. शिवानी ची आई घरचे काम स्वतः करायची. शिवानी पण तिच्या आईला कामांमध्ये मदत करत होती. आईने एकदा कपडे धुतले व वाळायला टाकले. सायंकाळी पाच वाजता बाबा बाहेरून आले.  बाबांनी आईजवळ पैसे दिले. आई घाईत होती. आईने ते पैसे घाईगडबडीने कपड्याच्या घड्यामध्ये ठेवून दिले. संध्याकाळी इस्त्री वाले काका म्हणजे सुखाराम आले मी त्यांना कपडे इस्त्री करायचा साठी कपडे देऊन दिले. ते निघून गेले. बाबांनी थोड्या वेळानंतर आईला पैसे मागितले. आई रोजच्यासारखी कपाट मध्ये पैसे शोधत होती. परंतु तिला पैसे सापडले नाही. तिला खूप घाबरण्यासारखं झालं. ती गोंधळून गेली. “आता मी काय करू यांना काय उत्तर देऊ”, तिला विचार पडला. तेवढ्यातच इस्त्री वाले काका कपडे प्रेस करून आम्हाला देण्यासाठी आले. ते म्हणाले “तुमचे पैसे  माझ्याकडे आहे मी जेव्हा कपडे इस्त्री करण्यासाठी कपड्याच्या घड्या मोडल्या तेव्हा मला हे पैसे दिसले, हे घ्या तुमचे पैसे”. बाबांनी ते पैसे घेतले व त्यांना भेट म्हणून शंभर रुपये देण्याची प्रयत्न केला  पण इस्त्रीवाला काकांनी पैसे घेतले नाही. ते म्हणाले, “मी भलेही गरीब असेल पण मला मेहनतीचेच पैसे हवे.” असे म्हणून ते निघून  गेले. आई बाबा त्यांच्या पाठीमागे त्यांचे कौतुकच करत होते.

*बोध: माणसाने कष्टाची कमाई मोठी असते हे जाणले पाहिजे.कारण  मेहनतीचे फळ हे श्रेष्ठ  असते. आणि कधीच दुसऱ्याची चोरी करु नये.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें