बुधवार, 30 नवंबर 2022

01/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 01/12/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जागतिक एड्स दिन


💥 ठळक घडामोडी :- 
◆१९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले
◆ १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना

💥 जन्म :-

◆ १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
◆ १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
◆ १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :- 

◆ ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
◆ १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अ‍ॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कोराना काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 597 परिचारिकांना कायमस्वरुपी करणार, शासनाचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'टोयोटा'ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द, त्यामुळे भारताला वनडे मालिका गमवावी लागली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *कथा -  सुंदर*
त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........
वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html    

कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧

    कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त .
       दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी .
    पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!
   चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून .
   कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार . 
   मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....!

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'जागतिक एड्स दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
२) एड्स होण्याची मुख्य कारणे कोणती ?
३) जगात सर्वात प्रथम एड्सचा रुग्ण कोठे सापडला ?
४) एड्सची लक्षणे कोणती ?
५) भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोठे सापडला ?

*उत्तरे :-* १) १ डिसेंबर   २) HIV रुग्णाचे रक्त दिल्याने, दुषित रक्त असलेल्या इंजेक्शनमधून, HIV बाधित आईकडून स्तनपान झाल्यावर, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे इत्यादी   ३) अमेरिका ( १९८१ )   ४) कित्येक आठवड्यापासून ताप येणे, खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, सतत जुलाब, झोपतांना घाम येणे, भूक न लागणे इत्यादी   ५) मुंबई ( १९८६ )

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक
◆ हेमंत भेंडे, शिक्षक
◆ राजकुमार दाचावार, शिक्षक
◆ श्याम नरवाडे
◆ मारुती गिरगावकर, शिक्षक
◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक
◆ मारोती दिंडे
◆ श्रीकांत लाडे
◆ सुभाष सोनटक्के
◆ शिवाजी पुरी
◆ श्याम पाटील
◆ विश्वनाथ पांचाळ
◆ बालाजी कलकोटे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.*
*भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.*

              *॥ रामकृष्णहरी ॥*
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
          *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                     *जीवन*
*समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि*
*"समुद्र चोर आहे".*
*त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि*
*"समुद्र पालनकर्ता आहे".*
*एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते*
*"समुद्र खुनी आहे".*
*एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो*
*"समुद्र दाता है".*
*अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते*
*लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*
      *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...*
*भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.
*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता*
*जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय  वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, 28 नवंबर 2022

29/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 29/11/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           


💥 ठळक घडामोडी :- 
१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

💥 जन्म :-
१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. 
१९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.
१९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
१९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :- 
१९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार
१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. 
२०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड द्या! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचा सरकारला 4 डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम, अन्यथा कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आता गोवरसाठीही क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या.. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत एका षटकामध्ये 7 सिक्सर साग झंझावाती द्विशतकासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Story-The Nightingale and the nobleman👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/EgGfP7iJmFc

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
              *शिक्षकांना शिकवू द्या ...*

शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙

वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.
चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.
दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*"आजची प्रश्नमंजूषा"*
       

१) देशातील स्कायरूट एरोस्पेस या खाजगी कंपनीने बनविलेले पहिले रॉकेटचे नाव काय आहे ?
२) भारतातील पहिली बोट रेस लीग स्पर्धा कोणती ?
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
४) टिपू सुलतान यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?
५) 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक कोणी केले ?

*उत्तरे :-* १) विक्रम - एस   २) केरळ चॅम्पियन बोट लीग   ३) येवला, नाशिक   ४) देवनाव्हली, कर्नाटक   ५) जगदिशन नारायण, तामिळनाडू

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 साईनाथ बोईनवाड
👤 योगेश खवसे
👤 पोतन्ना गुंटोड
👤 प्रमोद पाटील बोमले

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.*

*असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.*

              *॥ रामकृष्णहरी ॥*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
       *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
              *कासवाची चतुराई*

एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच  म्हणाला अरे! शिकार हातची गेली..

*बोध: चतुराईने केलेले  काम चांगलेच व   उपयोगी असते.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, 27 नवंबर 2022

28/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/11/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     


💥 ठळक घडामोडी :- 
● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला
● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

💥 जन्म :-
● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.
● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

💥 मृत्यू :- 
● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.
● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट 

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबईत सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. आदित्य ठाकरेंचा 217 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने केला विश्वविक्रम, प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Story-Kind Kondiba👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/fs5JTsw7RVw

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*

भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html 

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *चिखलदरा*

चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.
महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.
परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेत
हे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.
चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) महाराष्ट्रातील किती व कोणत्या शाळांना २०२२ चा केंद्राचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' प्राप्त झाला आहे ?
२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
३) सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच संधी मिळालेल्या महिलेचे नाव काय ?
४) 'पाणी पंचायत' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
५) शिवसेनेचे 'सामना' हे मुखपत्र केव्हा सुरू झाले ?

*उत्तरे :-* १) तीन - सातारा ( २ शाळा ) , रायगड ( १ शाळा )   २) नागपूर   ३) आशा बोथरा   ४) विलासराव साळुंखे   ५) २३ जानेवारी १९८९

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 राम चव्हाण, नांदेड

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

    *हसत दु:खाचा केला मी स्विकार,*
    *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*
    *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*
    *आनंदयात्री, मी आनंदयात्री !*

*दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?*

*दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

       जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.
ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा  विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर  सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.

© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                    *मित्रता*
राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण  खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणाली
राम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला.

*तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, 25 नवंबर 2022

26/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 26/11/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *भारतीय संविधान दिन*


💥 ठळक घडामोडी :- 
● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
● १९४९: भारताची घटना मंजूर झाली.
● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

💥 जन्म :-
● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. 

💥 मृत्यू :- 
● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.
● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. 
● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी
● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी
● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *एमपीएससीत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० नोव्हेंबरला शिंदे-फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असं स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, आम्ही कामावरून काढले नाही; कर्मचारी कपातीवर अॅमेझॉनचे स्पष्टीकरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या पोर्तुगालने घानाला 3-2 ने मात देत विश्वचषकात दिली विजयी सलामी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*गोष्टींचा शनिवार-चिनू,मिनू व गोगो,Fun in Metro👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/DjS_bheqK64

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *भारतीय संविधान दिवस*

देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html            

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?*

रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.

*.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.*
देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे.
देवास (मध्य प्रदेश),
नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि
म्हैसूर (कर्नाटक)
या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.
देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.
नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.

*.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.*
१. मुंबई
२. कोलकत्ता
३. हैदराबाद
४.नोएडा

*.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.*
प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.

*.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.*
रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.

*.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.*
रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.

*.नोटा कशा छापल्या जातात?.*
विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.

*.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.*
नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते.

*.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.*
खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात.
*भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.*

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन
👤 अर्जुन यनगंटीवार
👤 मुरलीधर हंबर्डे पाटील
👤 संजय बोंटावार

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.*

*नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
  💥💥💥💥💥💥💥💥
        *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *धाडसी  गीता*

गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ  झाली. गीता अभ्यास करत होती. एक  कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँs
बँs  ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला  पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले.

बोध: आपण कधीही  धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही.
समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, 24 नवंबर 2022

25/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 25/11/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी*


*आंतरराष्ट्रीय महिलाविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन*
*शाकाहार दिन*          

💥 ठळक घडामोडी :- 
● २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
● १९९१-कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळले

💥 जन्म :-
● १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
● १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
● १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
● १९५२-इम्रान खान ,पाकिस्तान चे प्रधानमंत्री.
● १९२६- रंगनाथ मिश्रा ,भारताचे २१ सरन्यायाधीश.

💥 मृत्यू :- 
● १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
● १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *अक्कलकोट, सोलापूर कर्नाटकात विलीन करावे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर संताप, कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे नाहीत, आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल, फडणवीसांचं प्रत्युत्तर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा देणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आंदोलन स्थगित, मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची दिली माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी गोवरनं बालकाचा मृत्यू, मुंबई आणि परिसरातील बळींची संख्या 12 वर तर औरंगाबादमध्येही 8 बालकांना गोवरची लागण झाल्याचा संशय, आरोग्य विभाग अलर्ट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *नागपुरात 49 वर्षांनंतर प्रथमच 'इंडियन सायन्स काँग्रेस'; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये गेल्या 5 वर्षात 80 हजार 865 कोटींची फसवणूक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *प्रतीक्षा संपली ! कोल्हापूर फुटबॉल हंगाम 4 डिसेंबरपासून होणार सुरु ; शाहू स्टेडियम गर्दी अनुभवण्यास सज्ज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा विश्वचषक 2022 च्या मोसमात स्पेन संघाने केली धमाकेदार कामगिरी, कोस्टा रिकाचा पहिल्याच सामन्यात 7-0 ने पराभव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री

*यशवंतराव चव्हाण* पुण्यतिथी निमित्ताने

http://nasayeotikar.blogspot.com/2022/11/yashwantrao-chavhan.html

।। विनम्र अभिवादन ।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संकलन :-
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *तापाने फणफणलेल्या मुलाला पांघरून द्यावे का ?* 📙

एकदा घरी एक व्यक्ती बोलवायला आली. तिच्या मुलाला ताप होता. त्यांच्यासोबत घरी गेलो. पाहतो तो काय घराची दारे खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, भर उन्हाळ्यात घरातील सर्व लोक घामाघूम होऊन मुलाकडे चिंताक्रांत नजरेने पाहत बसले होते. मुलाकडे बघितले तर त्याला कानटोपी स्वेटर घातला होता. अंगावर उबदार शाल घातली होती. मुलगा अंथरुणावर तळमळत होता. गेल्या गेल्या सर्वप्रथम मी आई वडिलांना जवळ बोलावून पंखा लावायला सांगितला. नंतर मुलांचे स्वेटर कानटोपी काढली. शाल काढून टाकली. माठातील गार पाणी आणायला सांगितले. एक स्वच्छ फडके आणले. ते ओले करून मुलाची पाठ, छाती, हात पाय कपाळ वारंवार ओल्या फडक्याने पुसले. नंतर मुलाला पातळसर कपडे घातले. एवढे झाल्यावर आईला थर्मामीटरने मुलाचा ताप पाहायला सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला वीस मिनिटात ताप १०३ वरून १०० पर्यंत खाली उतरला होता. असा प्रसंग तुमच्याही घरात होऊ शकतो!
ताप आल्यावर शरीरात जास्तीची उष्णता निर्माण झालेली असते. ती शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. त्यामुळे अशा मुलाला स्वेटर वा उबदार कपडे घातल्याने ताप कमी होणार नाही. याउलट गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने व पाण्याने पुसल्याने ताप कमी होतो. त्यामुळे ताप आलेल्या मुलाला पांघरूण देखील घालू नये. पंख्यांमुळेही गारवा निर्माण होऊन ताप कमी व्हायला मदत होते. या उपायांमुळे तापामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे ताप हा रोग नाही. ते एक लक्षण आहे. वर सांगितलेल्या उपायाने ताप तात्पुरता उतरेल. पण रोग बरा होणार नाही. त्यासाठी त्या त्या रोगाचा विशिष्ट उपचारच घ्यायला हवा.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल "*
- कर्मवीर भाऊराव पाटील

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला खेळाडू अचंता शरथ कमल हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे ?
२) पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
३) बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेना' या पक्षाची स्थापना केव्हा केली ?
४) लसीकरणाचे जनक कोण ?
५) राही सरनोबत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

*उत्तरे :-* १) तामिळनाडू   २) डॉ.सी. व्ही. आनंदा बोस   ३) १९ जून १९६६   ४) एडवर्ड जेन्नर   ५) निशानेबाजी

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी
      सर्व शिक्षा अभियान, नांदेड
👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद
👤 शिवाजी पाटील कदम
👤 अंकुश बल्लेवार
👤 नरसिंग एंड्रलवार
👤 शिवलिंग गंटोड
👤 महेश मुधोळकर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* 
*परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*

   ••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••
            🔹🔹🔹🔹🔹🔹
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
            📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची  नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
   संवाद....९४२१८३९५९०/
               ८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
          *खरी आई*

एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे” असे त्या दोघीही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशांसमोर आणले गेले. त्या दोन्ही बायकांचे म्हणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले खरीआई नक्की कोणती? हे ठरवण  खरोखरचे अवघड होते. न्यायाधीशाने खूप विचार केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली. सेवकाला आज्ञा केली, “या मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या.” न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हटले, “नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा. या मुलाला त्या बाई जवळ राहू द्या. मी मुलावर चा माझा हक्क सोडते .” दुसरी आई मात्र काहीही बोलली नाही. न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले. मुलाचे तुकडे होण्याऐवजी हक्क सोडायला जी बाई तयार होती, न्यायाधीशाने ते मूल त्या बाईस दिले. दुसऱ्या बाईला मात्र तुरंग वासाची शिक्षा ठोठावली.

*बोध: सत्याचानेहमी विजय होतो.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, 23 नवंबर 2022

24/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 24/11/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
१९६६ - टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार

💥 जन्म :-



💥 मृत्यू :-

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड होतेय; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2022 साठी संगणकीय सोडत सिडको भवन येथे काढण्यात आली. यावेळी हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, लोकांना मदत करू, देवेंद्र फडणवीसांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *औरंगाबादच्या वैजापूर शहरातील मारुती सुझुकी चारचाकी शोरूमला भीषण आग*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफामधील धक्कादायक निकालांचं सूत्र कायम, जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*The Magic herb-story👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/cG1cAIgbz-I

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *सैनिक  :  देशाचा संरक्षक*

भारतीय सैनिकाविषयी लिहिलेला लेख

https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙

दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.
स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.
अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.
अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.
घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.
निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) अलीकडे नुकताच अचंता शरथ कमल यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
२) सुभाषचंद्र बोस यांना 'देशनायक' म्हणून कोणी संबोधले ?
३) बाळासाहेब ठाकरे यांचे टोपणनाव काय ?
४) पाकिस्तानचे जनक कोण ?
५) हिमाचल प्रदेशमध्ये नुकतेच बांधलेले जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणते आहे ?

*उत्तरे :-* १) टेबल टेनिस   २) रविंद्रनाथ टागोर   ३) हिंदुहृदयसम्राट   ४) बॅरिस्टर जिना   ५) ताशिगंग

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● नागेश बबिलगेवार, किनवट
● खंडू मोरे, नाशिक
● नागेश सब्बनवार, कुंडलवाडी
● चरण इंदूर
● व्ही के पाटील
● दत्तराम गडोड, धर्माबाद
● अखिलेश जल्लोड
● बालाजी दिवटे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.*
         
*'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*
           
         🌹 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🌹
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू  लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३
📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *एक छानशी कथा.....*

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'
एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.
खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"
ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.
जे मित्र आपली होटेलची बिलं भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे, तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून. जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगलवार, 22 नवंबर 2022

23/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 23/11/2022 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


💥 ठळक घडामोडी :- 
१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

💥 जन्म :-
१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड
१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी
१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी
१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार

💥 मृत्यू :- 
१९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस
१९५९ : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर
२०१९ : दैनिक नवाकाळचे संपादक,'अग्रलेखांचे बादशाह' नीलकंठ खाडिलकर

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *खालावलेला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केरळ पॅटर्न राबवण्याची तयारी, सरकारकडून नवा प्रयोग करण्यात येणार. *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन 'रोजगार मेळाव्यात' 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सरकारने आदेश दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवदी यांनी म्हटलं आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहारा प्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *17 हजार मुलांचं गोवर लसीकरण पूर्ण,आरोग्य विभागाची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *टीम इंडिया आणि न्युझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना पावसामुळे  बरोबरीत, टीम इंडियाने 1-0 ने जिंकली मालिका*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*The sky is falling-story👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/wMNG3jvIugw

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*

अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html            

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       📙 *नागीण का होते ?* 📙

तुमच्या घरात किंवा शेजारीपाजारी कोणालाही 'नागीण' झाल्याचे तुम्हाला समजले असेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नंतर नागिन म्हणजे त्वचेवर येणारे विशिष्ट प्रकारचे पुरळ हे पाहिल्यावरच कळले असेल. कांजण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या विषाणूंसारख्या दुसर्या विषाणूंमुळे नागिन हा रोग होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व कित्येक वर्षांनी मज्जारज्जुतून एखाद्या नसेमार्फत त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. मोठ्या वयात जास्त त्रास होतो. हे विषाणू मज्जापेशी व त्यांच्यामधून मज्जातंतुतुच्या रेषेवर वाढतात. आजाराची सुरुवात त्या मज्जातंतूंच्या मार्गावर खूप दुखणे सुरू होऊन होते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो व पाठोपाठ पाण्याने भरलेले दुखरे फोड येतात. पाच सहा दिवस हे फोड वाळायला लागतात व खपली धरते. फोड गेले की दुखणे थांबते. काही वेळा सहा महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यतः बरगड्यांमधील नसांच्या रेषेवर फोड येतात. नागिन हा रोग त्रासदायक असला तरी सहसा फारसे गंभीर परिणाम होत नाहीत; पण डोळ्यात जर फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते. असायक्लोव्हीर या महागड्या औषधाने पुरळ लवकर बरे होते. पण आग होणे मात्र कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे ती म्हणजे इतर विषाणूजन्य रागांप्रमाणेच हाही रोग काही दिवसांत आपोआप बरा होतो. वेदना कमी होण्यासाठी ऍस्पिरिन, पॅरासिटेमॉल या औषधांचा वापर करता येतो. वेदना खूप दिवस होऊनही बंद न झाल्यास संबंधित नस मारून टाकतात. अर्थात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घ्यावे.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" जेव्हा कठीण परिश्रम केले जातात तेव्हा ते विजयाचे क्षण घेऊन येतात. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) जी - २० शिखर परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारत केव्हापासून औपचारिकपणे अध्यक्षपद स्वीकारणार आहे ?
२) टी - २० विश्वचषक २०२२ चा मालिकावीर किताब कोणी पटकावला ?
३) बाळासाहेब ठाकरे कोण होते ?
४) वनमहोत्सवाचे जनक कोण ?
५) सूर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?

*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २०२२   २) सम कुरेन, इंग्लंड   ३) व्यंगचित्रकार, शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदसम्राट   ४) के. एम. मुंशी   ५) निम्म्या

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👤 जुगलकिशोर बोरकर
👤 सुनील बंडेवार, धर्माबाद
👤 जगन्नाथ भगत
👤 आदित्य खांडरे
👤 कपिल दगडे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म!  कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.*

*स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
☀☀☀☀☀☀☀☀☀
         *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

आपल्याकडे एक श्रद्धा अशी आहे की,घरात एखादा पाहुणा किंवा एखादी पाहुणी आली की,तुमच्या पायगुणाने आमचे खूप चांगले झाले आहे असे म्हणतो.हे कितपत योग्य आहे ? मला तरी ते मान्य नाही.जर असे काही होत असेल तर आपण रोजच पाहुण्यांना येण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले असते.काहीच न करता असे जर होत असेल तर खुप काही आपण झालो असतो.विचार करायची गरज नाही,काम करायची गरज नाही किंवा प्रयत्नही करायची गरजही नाही.आपण चांगले विचार मनात आणले आणि मन लावून काम केले तर घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.अशा परिस्थितीत बाहेरच्यांचे येणे हा निव्वळ योगायोग आहे असेच समजायचे.आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारुन पाहिले तर ते आपल्याला खरेही वाटणार नाही.अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे एक कल्पनाच आहे असे समजावे.ही डोळस श्रद्धा नसून एक अंधश्रद्धा समजावी.अशा प्रकारच्या कितीतरी श्रद्धा आहेत त्या आपण ज्ञानाच्या माध्यमातून,कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून सिध्द करता येते.त्यासाठी ' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.' ह्याप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०.
🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
              *आमचे चुकले*

एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा ,संत्री खात होते .टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशाला खंत वाटली नाही.आणखी  टरफले साली  गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणारा प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पहातात त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी ची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करतात सानेगुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा” गुरूजी  नम्रपणे म्हणाले “, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी गुरुजींची वृत्ती! आपल्या जीवनात कोणतीही काम कधीच हलके मानले नाही.

*बोध: आपण कोठेही कचरा करु नये. आणि जर का झाला असेल तर  तर त्याला व्यवस्थितपणे टाकावे.  स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ,कर्तव्य आहे.आपली चूक आपण मान्य करावी आणि नंतर अशी चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, 21 नवंबर 2022

22/11/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 22/11/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    *संत ज्ञानेश्वर सांनीवन समाधी*


💥 ठळक घडामोडी :- 
१९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.
१९६३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

💥 जन्म :-
१९३९: उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म.
१९४३: अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.
१९६७: टेनिसपटू बोरिस बेकर यांचा जन्म.

💥 मृत्यू :- 
१९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.
२००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, चालू बील भरलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या कापू नका; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महावितरणला निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सीमा भागातील लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळणार; सीमा प्रश्नासंदर्भातील बैठकीत निर्णय, सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष आरीस पिरोजशॉ खंबाटा यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *PSI परीक्षेचा निकाल जाहीर, पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदांची संख्या 376 असून शारीरीक चाचणीसाठी अर्हता प्राप्त ठरलेले उमेदवार संख्या 1535 आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज,  महाराष्ट्रात नाशिकमधील ओझर सर्वाधिक थंड, अवघ्या 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एन. जगदीशनसह साई सुदर्शनने रचला इतिहास, ४० चेंडूत १९० धावा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा इराणवर दणदणीत विजय, 6-2 च्या मोठ्या फरकाने दिली मात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ*

📲 *VIDEO लिंक👇*
https://youtu.be/GQdy7jj7QII        

Video पाहून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

📙 *आजकाल देवीची लस का देत नाहीत ?* 📙

'देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा' ही वाक्य तुम्ही वाचले असेल. आता तर अशा घोषणाही बंद झाल्या आहेत. कारण जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दि ८ मे १९८० रोजी 'जगातून देवी या रोगाचे समूळ उच्चाटन झाले आहे', असे जाहीर केले. त्यानंतर जगात देवीचा एकही रुग्ण सापडलेला नाही. देवीच्या विषाणूंचेच जगातून पूर्णपणे उच्चाटन झाले आहे.

पूर्वी देवी हा एक भयंकर रोग मानला जात असे. या रोगामुळे पुरळ येई, चेहऱ्यावर व्रणांमुळे विद्रुपता येई, कधी कधी अंधत्व येत असे वा मृत्यूही होई. देवी झालेल्या व्यक्तीला ताप असे व तिला प्रचंड थकवा येई.

 देवी हा असा गंभीर रोग असल्याने तो होऊ नये यासाठी प्रतिबंधक लस द्यावी लागे. ती लस देणे देवीचे निर्मुलन झाल्याने १९८० नंतर बंद करण्यात आले. साहजिकच ज्यांचा जन्म १९८० नंतर झाला आहे त्यांना ही लस देण्यात आली नाही.

देवीचे पुनरागमन होण्याचा धोका लक्षात घेऊन जागतिक संघटनेने न्यूयॉर्क व मॉस्को या दोन ठिकाणच्या प्रयोगशाळांमध्ये देवीच्या लसीचा पुरेसा साठा करून ठेवलेला आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या गंभीर प्रसंगाला यशस्वीपणे तोंड देता येईल. देवीचे निर्मूलन हा वैद्यक इतिहासातील सोनेरी अध्याय आहे. देवीच्या नंतर पोलिओ व गोवर या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ सध्या कार्यरत आहेत.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा, व्यक्तीचा नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) फिफा विश्वचषक स्पर्धा आयोजन करणारा सर्वात लहान देश कोणता ?
२) टी - २० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट कोणी घेतल्या ?
३) पहाटेचा तारा असे कोणत्या ग्रहास म्हणतात ?
४) भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण ?
५) बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

*उत्तरे :-* १) कतार ( ३० लाख लोकसंख्या )   २) हसरंगा, श्रीलंका ( १५ बळी )   ३) शुक्र   ४) डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम   ५) प्रबोधनकार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

👤 अरुण पवार, सहशिक्षक 
👤 पांडुरंग पुठ्ठेवाड, संपादक
👤 श्रीकृष्ण निहाळ, सहशिक्षक
👤 साईप्रसाद यनगंदेवार, सहशिक्षक 
👤 मधू कांबळे
👤 विकास चव्हाण

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.*

*लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* 

              *॥ रामकृष्णहरी ॥*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
      *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

          माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुसऱ्यांच्या दु:खाला दूर करून सुखाचा नि आनंदाचा क्षण निर्माण करण्यासाठी.फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद. ९४२१८३९५९०
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *इमानदार सखाराम*

शिवानी नावाची मुलगी होती. तिच्या कुटुंबामध्ये तिचे आई-बाबा, ती व तिचा भाऊ राहायचा. शिवानी ची आई घरचे काम स्वतः करायची. शिवानी पण तिच्या आईला कामांमध्ये मदत करत होती. आईने एकदा कपडे धुतले व वाळायला टाकले. सायंकाळी पाच वाजता बाबा बाहेरून आले.  बाबांनी आईजवळ पैसे दिले. आई घाईत होती. आईने ते पैसे घाईगडबडीने कपड्याच्या घड्यामध्ये ठेवून दिले. संध्याकाळी इस्त्री वाले काका म्हणजे सुखाराम आले मी त्यांना कपडे इस्त्री करायचा साठी कपडे देऊन दिले. ते निघून गेले. बाबांनी थोड्या वेळानंतर आईला पैसे मागितले. आई रोजच्यासारखी कपाट मध्ये पैसे शोधत होती. परंतु तिला पैसे सापडले नाही. तिला खूप घाबरण्यासारखं झालं. ती गोंधळून गेली. “आता मी काय करू यांना काय उत्तर देऊ”, तिला विचार पडला. तेवढ्यातच इस्त्री वाले काका कपडे प्रेस करून आम्हाला देण्यासाठी आले. ते म्हणाले “तुमचे पैसे  माझ्याकडे आहे मी जेव्हा कपडे इस्त्री करण्यासाठी कपड्याच्या घड्या मोडल्या तेव्हा मला हे पैसे दिसले, हे घ्या तुमचे पैसे”. बाबांनी ते पैसे घेतले व त्यांना भेट म्हणून शंभर रुपये देण्याची प्रयत्न केला  पण इस्त्रीवाला काकांनी पैसे घेतले नाही. ते म्हणाले, “मी भलेही गरीब असेल पण मला मेहनतीचेच पैसे हवे.” असे म्हणून ते निघून  गेले. आई बाबा त्यांच्या पाठीमागे त्यांचे कौतुकच करत होते.

*बोध: माणसाने कष्टाची कमाई मोठी असते हे जाणले पाहिजे.कारण  मेहनतीचे फळ हे श्रेष्ठ  असते. आणि कधीच दुसऱ्याची चोरी करु नये.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~