गुरुवार, 18 अगस्त 2022

17/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 🎇 दि. 17/08/2022 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
★ १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
★ १९६० - गॅबनला (झेंडा चित्रीत) फ्रांस पासून स्वातंत्र्य.
★ १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
★ १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
★ १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.

💥 जन्म :-
★ १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
★ १९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
★ १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
★ १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.
★ १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.

💥 मृत्यू :-
★ १३०४ - फुकाकुसा, जपानी सम्राट.
★ १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
★ १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
*जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत होणार, सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे राज्यशासनाचे आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. त्यात राजदच्या १६, तर जदयूच्या ११ जणांना मंत्रीपद; बिहारमध्ये विस्तारात काँग्रेसच्या दोघांचा समावेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार ? अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *‘फिफा’ची भारतावर बंदी ! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निर्णय ; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद गमावले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

Class 5th chapter 1.7
*Talking about things 👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/ExuBsAJzRis

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *पौर्णिमा - अमावस्या*

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙

चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ?
या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात.
सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो.
एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते ‍१४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात.
उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात.
मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता ?

२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - २०२२ मध्ये भारताने एकूण किती पदके मिळविली ?

३) व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये जगात सर्वाधिक स्त्री वैमानिक कोणत्या देशाचे आहेत ?

४) आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन केव्हा साजरे केले जाते ?

५) महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

*उत्तरे :-* १) तानाजी   २) ६१ पदके ( २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य )   ३) भारत   ४) १३ ऑगस्ट   ५) चंद्रशेखर बावनकुळे
                     

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  मीना खोंड, साहित्यिक
●  बालाजी मदन इंगळे, साहित्यिक
●  राजेश कुंटुरकर
●  रवींद्र धुप्पे
●  अरुणा भोसले
●  सचिन एडके
●  बालाजी बरडे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

    *हसत दु:खाचा केला मी स्विकार,*
    *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*
    *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*
    *आनंदयात्री, मी आनंदयात्री !*

*दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?*

*दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*

             *॥ रामकृष्णहरी ॥* 
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
      *श्री. संजय नलावडे, मुंबई* 
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*माझा भारत महान*

पराक्रमी देश माझा
शूरवीर जवानांचा 
क्रांतिवीर देशभक्त
अभिमान आम्हां यांचा..१

सुजलाम सुफलाम
सुबत्तेची धान्यराशी
शांती एकता बंधुता
सौख्य नांदे मजपाशी..२

घुमे नाद आसमंती
मावळ्यांचा इतिहास
जय भवानी मातेचा
आशीर्वाद हमखास..३

ध्वज लहरे आकाशी
होई जल्लोष गगनी
मिळो आनंद अंतरी
सत्यमेव ब्रीद मनी..४

अशा भारत देशाचा
जगी वाढवूया मान
भारतीय असल्याचा
आहे सार्थ अभिमान..५

*©® सुचित्रा कुंचमवार✍️*
*नवी मुंबई*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

           ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
    *अंधारात कसा चढणार डोंगर*

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....
रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....
इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.
'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.
शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''
म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''
''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''
म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं?
जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश  असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द  असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें