बुधवार, 3 अगस्त 2022

04/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 04/08/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
★ १९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
★ १९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
★ १९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.
★ १९९१ - क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्‍यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
★ २००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी

💥 जन्म :-
★ १७९२ - पर्सी शेली, इंग्लिश कवी.
★ १९२९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
★ १९६१ - बराक ओबामा, अमेरिकन राजकारणी.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *एअरटेलची 5G सेवा ऑगस्टमध्ये सुरु होणार; एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत झाला करार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नागपूर : गणेशोत्सव मंडळांनी कमी उंचीच्याच मूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 4 फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असे आवाहन आयुक्तींनी केले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *अमरावती : महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांनी अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा जवळील आमझरी येथे भेट देऊन विदर्भातील पहिले मधाचे गाव‌ आमझरी म्हणून जाहीर केले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *नॅशल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई करत हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कोल्हापूर : सुखाचा संसार सुरू असतानाच अचानक एखाद्या महिलेस विधवा होण्याचा दुर्दैवी प्रसंग आल्यास तिला पुढील आयुष्यासाठी आधार म्हणून तब्बल पंचवीस हजाराची मदत देण्याचा कौतुकास्पद निर्णय जिल्ह्यातील हेरवाड गावातील वीरशैव लिंगायत माळी समाजाने घेतला आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी हॉकी (पुरुष)- ग्रुप बीमध्ये भारताने कॅनडावर ८-० असा धमाकेदार विजय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका ही ६ ते ११ ऑक्टोबर या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Learn Vegetables Name भाज्यांची ओळख👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/fDknq1kNALU

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मुलांमध्ये वाचनाची भूक कशी वाढवावे ?
वाचन हे आपल्या डोक्यातील मेंदूचे खुराक आहे. माणसाला भूक लागली की माणूस भाकर-भाजी खातो आणि पोटाची भूक मिटवितो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या डोक्यातील मेंदूला भूक लागली तर वाचन करून त्याची भूक भागवावी लागते तरच आपला मेंदू नेहमी क्रियाशील राहतो......…

पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.

http://nasayeotikar.blogspot.com/2021/07/interest-in-reading.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌎 *पृथ्वीवर एकूण किती पाणी आहे ?* 🌎

ऊर्जेच्या बाबतीत विज्ञान आपल्याला सांगतं की ती कायमस्वरूपी आहे. तिचा नाशही होत नाही की ती निर्माणही केली जाऊ शकत नाही. फक्त तिचं स्वरूप तेवढं बदलत राहतं. जगातल्या पाण्याच्या साठ्याबाबतही तेच म्हणता येईल. तोही कायमस्वरूपी आहे. तो नव्यानं निर्माण केला जाऊ शकत नाही की त्याचा नाशही होत नाही. फक्त त्याचं स्वरूप बदलत राहतं; आणि हे सतत बदलत असतं. त्यामुळे जगात पाण्याचं एक चक्र निर्माण झालेलं आहे. ते या धरतीवर सजीवसृष्टी तगून राहायला मदत करत आहे.
हा साठा किती आहे याचा विचार केला तर भोवंडून जायला होतं. धरतीवर भूभागापेक्षा जास्त भाग पाण्याने व्यापलेला आहे. जगात एकूण १२६ कोटी अब्ज लिटर पाणी आहे. म्हणजेच कितीतरी आहे. यातला जवळजवळ ७० टक्के हिस्सा महासागरांमध्ये आहे. ध्रुवप्रदेश तसंच उंचावरच्या हिमनद्यांमध्ये गोठलेल्या स्वरूपातही पुष्कळ पाणी आहे. तरीही आपण नेहमी पाण्याची चणचण आहे, टंचाई आहे, पाणी कपात करावी लागणार आहे, असं का ऐकत असतो ? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, या एकूण पाण्यापैकी केवळ ३ टक्के पाणीच गोडं आहे. म्हणजेच साडेतीन चार कोटी अब्ज पाणी गोडं आहे. तेही पुष्कळ आहे; पण गोडं आहे याचा अर्थ ते सरळंच पिण्यायोग्य आहे असं नाही. कारण आपण हे नदी, तलाव यांच्यामधलं गोडं पाणी सतत प्रदूषित करत असतो, त्यामुळे ते पिण्यायोग्य राहत नाही.
निसर्ग हे प्रदूषित पाणी परत शुद्ध करून पिण्यायोग्य कर करतच असतो. त्यालाच आपण जलचक्र म्हणतो. म्हणजे या पाण्याची वाफ होऊन ती आकाशात जाते. ती परत पावसाच्या रूपात शुद्ध पाणी होऊन जमिनीवर येते; पण हे पावसाचं पाणीही आपण व्यवस्थित साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. जे साठवलं जातं तेही निष्काळजीपणे वापरून परत प्रदूषित करत असतो.
केवळ निसर्गावर अवलंबून न राहता हे प्रदूषित पाणी शुद्ध करून पिण्यायोग्य करण्याचे खंबीर उपाय आपण करत नाही. ते केल्यास पिण्यायोग्य गोड्या पाण्याचा साठा वाढेल. निसर्गानं जेवढं गोडं पाणी उपलब्ध करून दिलं आहे तेवढेही आपण परत पूर्ण केलं तरी आपली पाण्याची गरज नीट भागू शकेल.

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*          

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*Prayer is the voice of faith.*
*( प्रार्थना हे श्रद्धेचा आवाज आहे. )*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) 'तांबट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

२) भारताचे पहिले अल्पसंख्यांक राष्ट्रपती कोण होते ?

३) 'कारगिलचा वाघ' कोणाला म्हटले जाते ?

४) तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?

५) केदारनाथ प्राचीन मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

*उत्तरे :-* १) प्रल्हाद जाधव   २) डॉ. झाकीर हुसेन   ३) विक्रम बत्रा   ४) गहू   ५) उत्तराखंड

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
●  गणेश उदावंत
●  व्यंकटेश अमृतवार
●  शिलानंद बुद्धेवार, बिलोली
●  विठ्ठल पवार
●  अमित सूर्यवंशी
●  आनंदराव आवरे
●  प्रतिभा येवतीकर
●  प्रभाकर रेब्बावार< देगलूर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ].
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

श्रावणमास

मास व्रतवैकल्यांचा
देवतांना पुजण्याचा
शाकाहारी भोजनाने
उपासना करण्याचा

व्रत केलेले पार्वतीने
शंकराच्या प्राप्तीसाठी
मुली स्त्रियांही व्रतस्थ
मनाजोग्या वरासाठी

हरितालिकेचे हे व्रत
उपवास करुया चला
निराहार राहूनी दिनी
स्मरू  देव शंकराला

शिवलिंग बने वाळूचे
वाहूया पत्री हार बेल
ओवाळू या निरांजन
कुंकूमादि फळ फुल

मागु अखंड सौभाग्य
भोळ्याच महादेवाला
करू आराधना त्याची
दे कीर्तीचे दान मला

सौ.भारती सावंत, मुंबई
9653445835
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*बुद्धीला व्यवहाराची जोड हवी*

पाणिनि हे संस्कृतचे महान व्याकरणकार.
२००० वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तिविषयी शिकवीत होते. त्यावेळी एक वाघ माणसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले  व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले.पण 'व्याघ्र' या शब्दाची व्युत्पत्ति  शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही.
*'व्या जीघ्रति इती व्याघ्रः'* म्हणजे वास घेत चालतो तो वाघ........पण झाले काय वाघाने त्यांचीच शिकार केली.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें