✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 11/08/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*रक्षाबंधन* *नारळी पौर्णिमा*
💥 ठळक घडामोडी :-
★ १९५१ - रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
★ १९५२ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
★ १९६० - चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
★ १९८७ - ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता
💥 जन्म :-
★ १९११ - प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक. (मृ: ८ मे १९९५)
★ १९१२ - थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
★ १९२८ - वि.स. वाळिंबे, मराठी लेखक
★ १९५४ - यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
★ १९५४ - मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
★ १९७४ - अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
★ ४८० - लिओनिदास, स्पार्टाचा राजा.
★ १२०४ - गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
★ १९०८ - क्रांतिकारक खुदिराम बोस
★ १९३९ - जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
★ १९६५ - बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *चीनमध्ये झुनोटिक लंग्या हेपिव्हायरसचा फैलाव, उंदराच्या प्रजातीपासून विषाणूचा फैलाव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा तर सांगलीत कृष्णेच्या पातळीत वाढ, विदर्भ आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, मुंबईला यलो अलर्ट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *सरकारचा पुढचा मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये, यादीकडे आमदारांच्या नजरा, बच्चू कडू शिरसाट, शेलारांसह 15 जणांच्या नावाची चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *1995 नंतर पहिल्यांदाच मुंबईतल्या मराठी मंत्र्याचा शिंदे सरकारमध्ये समावेश नाही, शिवसेनेकडून सरकारवर जोरदार टीका*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तेजस्वी यादव बिहारचे नवे उपमुख्यमंत्री, मोदी-शाहांना दे धक्का*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता, राजकीय घडामोडींमुळे 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकण्याची चिन्ह*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *व्हाट्सअप्पवर लवकरच सायलेंटली ग्रुप लेफ्ट करण्याचं फिचर, चॅट स्क्रीन शॉट घेण्यावरही निर्बंध आणण्याच्या तयारीत, तर दोन दिवसांनीही मेसेज डिलीट करता येणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
*Sea Animals समुद्री जीव👇*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/8xLWx9D-JVA
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*राखी : एक अतूट बंधन*
http://nasayeotikar.blogspot.com/2022/08/rakhi.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ लेखन -
*नासा येवतीकर, धर्माबाद*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *अनुवांशिकता म्हणजे काय ?* 📙
आमची वंशावळ' आमची जमात, अनुवांशिक रंगरूप व अनुवांशिक रोग इत्यादी गोष्टी सतत कानावर पडत असतात. काही वेळा चर्चेत येत असतात. अनुवांशिकी किंवा हेरिडिटी या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन अॅबेट ग्रेगर जोहनान मेंडेल यांनी केले. मेंडलचे नियम म्हणून त्यांनी केलेले संशोधन जनुकशास्त्रात आजही आधारभूत मानले जाते.
मेंडलचा पहिला नियम सांगतो की, विरुद्धगुणी शुद्ध बीजांचा संकर घडवला, तर त्यातील आक्रमक बीजाचे गुणधर्म पुढच्या पिढीत उतरतात. दुसऱ्या नियमानुसार एकापेक्षा जास्त जनुकांच्या जोडय़ा जर यात सामील असतील तर प्रत्येक जोडीतील आक्रमक जोडीचे संयुक्त गुणधर्म प्राधान्याने पुढच्या पिढीत दिसतात. याचाच एक सोपा अर्थ म्हणजे जसेच्या तसे संक्रमण होत नाही, तर त्यात प्राधान्यक्रम ठरवला जातो.
या साऱ्या गोष्टी विविध वनस्पतींच्या रंगसंकरातून, उंच बुटक्या जातींतून मेंडेल यांनी सिद्ध केल्या. यानुसार अनुवंशिकीचा विचार माणसाच्या संदर्भात करायचा झाला तर एकाच बीजांडांचे विभाजन होऊन झालेली जुळी भावंडेच फक्त सारखी असू शकतात. अन्यथा पहिल्या पिढीतील सर्व गुणधर्म दुसऱ्या पिढीत कधीही आढळणार नाहीत. स्त्रीबीजांडात व पुरुष शुक्रजंतुत जर प्रत्येक २३ क्रोमोसोमच्या जोड्या असतील, तर विविध गुणोत्तरातून २^२३ म्हणजेच ८३,८८,६०८ इतक्या विविध प्रकारे (पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा यांच्यात अनुवांशिकी गुणधर्म जसेच्या तसे येण्याची शक्यता ८३,८८,६०८ मध्ये एक एवढीच राहते.) अनुवंशिकी संक्रमण होऊ शकते.
जगभरची सर्व माणसे जरी मूलतः आफ्रिकेत निवास करीत होती, तरीही चेहरेपट्टी, उंची, डोळ्यांचे रंग यात असंख्य बदल याच कारणाने विविध जाती जमाती आढळतात.
याशिवाय हवामान, रहाणीमान, सूर्यप्रकाश यांचा परिणाम कातडीच्या रंगावर होत असतो, तो वेगळाच. त्यामुळेच जगातील असंख्य प्राणी, साडेसहाशे कोटी माणसे, विविध वनस्पती यांत विविध प्रकार आपल्याला सहजगत्या पाहावयास मिळतात.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*“ ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'ऑख आ धन्या छे' या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत ?
२) जागतिक आदिवासी दिन - २०२२ ची थीम काय आहे ?
३) उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत जगदीप धनखड ( ५२८ मते ) यांनी कोणाचा पराभव केला ?
४) एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात ?
५) भरती - ओहोटीचे एक चक्र पूर्ण व्हायला किती वेळ लागतो ?
*उत्तरे :-* १) नरेंद्र मोदी २) सरंक्षणात स्थानिक महिलांची भूमिका आणि पारंपारिक ज्ञानाचे प्रसारण ३) मार्गारेट अल्वा ( १८२ मते ) ४) समांतर रेषा ५) १२ तास २५ मिनिटे
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● नीलकंठ चोंडे, शिक्षक नेते, नांदेड
● उमेश खोसे, उस्मानाबाद
● प्रवीण संगमकर काळे
● दत्ताहरी पाटील पवार
● ओमप्रकाश कहाळेकर
● भास्कर कुमारे
● विशाल ढगे
● आशिष देशपांडे
● वाहिया खान पठाण
● शरद सूत्रावे
● सतीश सोनवणे, संपादक, नांदेड
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.*
*नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*रक्षाबंधन ....!*
राखीचा रेशमी धागा
प्रेमाचा अमूल्य पवित्र
बंधुभगिनी नाते गुंफले
सुवर्ण धाग्याचे रक्षासूत्र ..१
रक्षाबंधन आश्वासन
बहिणींच्या प्रेमाचे रक्षण
सुरक्षेचे कवच दैवी
बंधूच्या करी रक्षाकंकण ...२
बंधू भगिनी नाते सुंदर
मायेचे खेळीमेळीचे
सदा असो बंधूभाव
बंधूभगिनीच्या प्रेमाचे ..३
ज्ञानेश्वरांची बहिण मुक्ताई
सांभाळली बंधू प्रेमाने
द्रौपदीने बांधले रक्षाबंधन
कृष्णाच्या करी आत्मियतेने ..४
तेज प्रदीप्त दीपांनी
ओवाळून भाऊरायाला
बंधूस दीर्घायुष्य लाभावे
हिच प्रार्थना ईश्वराला ... ५
छोटी असो मोठी भगिनी
रक्षेचा कर्तव्यभार बंधुला
हेच मागणे भाऊराया
नको विसरु बहिणीला ...६
मीना खोंड, लंडन
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹शुभेच्छा संदेश...🌹
-------------------
फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे चार वर्षे पूर्ण झाली असून पाचव्या वर्षात दमदार पदार्पण....
-------------------
एक चिंतनशिल व्यक्तिमत्व, अष्टपैलू आणि दमदार कोणत्याही विषयावर शिघ्र लेखन करणारे फ्रेश माॅर्निंग बुलेटिनचे संचालक माझे मित्र ना.सा.येवतीकर यांचे मनापासून अभिनंदन.
या बुलेटिनच्या माध्यमातून शाळा,शिक्षक आणि विद्यार्थी यांना जोडणारे व विद्यार्थ्यांना सातत्याने शिक्षणप्रवाहात प्रवाहीत करण्याचे मनापासून प्रयत्न करण्याचे काम ना.सा.सरांनी केले.
विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता त्याला पुस्तकी ज्ञानाबरोबरच जनरल नॉलेजची आवड निर्माण व्हावी,जगात काय चाललंय यांचेही ज्ञान मिळावे, दिनविशेष,बोधकथा, विचार सुविचार, दैनिक वार्ता, व्यक्तीविशेष,वाढदिवस शुभेच्छा इ.चे स्वतंत्र टप्प्यात इत्यंभूत माहिती सदरील बुलेटिनमध्ये सातत्याने सादरीकरण करण्याचे उत्कृष्ट कौशल्य आणि आॅडिओ स्वरुपात बातमीपत्र सादरीकरण हे ना.सा.चे विशेष व्यक्तिमत्व त्यांच्यात आहे.त्या अख्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आणि ते ही न थकता,न थांबता अविरत ज्ञानाचा यज्ञ चालू आहे आणि असाच चालत राहणार आहे.यासाठी त्यांनी अनेक शब्द प्रभूंची साथ घेतली.काहींना माणसे तोडण्यात आनंद असतो तर काहींना माणसे जोडण्यात खूप आनंद वाटतो.तसेच ना.सा.हेअवलिया दुसऱ्या फळीचे आहेत.मी नेहमी संपर्कात राहतो मला आनंद वाटतो.आमच्या सारख्या छोट्या माणसांना जवळ केले आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहचवले याचा आनंद खूप वाटतो.माझ्या विचारवेधला त्यांनी खूप दूरपर्यंत पोहोचवले यांचा आनंद आहे.मला सातत्याने लिहिण्याची प्रेरणा दिली.एखाद्या दिवशी मला जरी काही कारणास्तव विचार लिहिले नसलेतरी माझ्या विचारवेध या संग्रहीत पुस्तकातून ते बुलेटिन मध्ये घेत असतात.असा हा सगळ्यांना घेऊन जाणारा जिद्दी माणूस..!
त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे.तो सदैव ज्ञानदानाचे कार्य करत असतो.अशा माझ्या मित्राला खूप यश मिळो आणि या बुलेटिन चे सातत्याने प्रगती होवो.पाच वर्षच काय पण अखंड प्रवास चालू राहण्यासाठी बळ मिळो हीच मनस्वी प्रार्थना.सगळ्यांनीच अशी साथ द्यावी व अधिक नावारुपाला यावे ही मनस्वी शुभेच्छा...
शुभेच्छूक,
व्यंकटेश काटकर,नांदेड
' विचारवेध '
संवाद..९४२१८३९५९०.
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*वस्तूचे मोल*
एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.
तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें