बुधवार, 31 अगस्त 2022

01/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 01/09/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷    .🎇  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
★ इ.स.पू. ५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
★ १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
★ १९७४ - लॉकहीड एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड (चित्रीत) प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर (~५५७० कि.मी) १ तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
★ १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.

💥 जन्म :-
★ १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.
★ १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
★ १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
★ १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
★ १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
★ १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
★ १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
★ ११५९ - पोप एड्रियान चौथा.
★ १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.
★ १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.
★ १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.
★ १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा गणेशोत्सवाला वेगळाच रंग चढला. देशभरात गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले! टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचं वेतन रोखण्याच्या कारवाईला शिक्षकांकडून उच्च न्यायालयात आव्हान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणाची  घटनात्मक परीक्षा,  13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अँपची निर्मिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचा 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन. ते 91 वर्षांचे होते. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाने हाँगकाँगचा 40 धावांनी केला पराभव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Learn the domestic animal पाळीव प्राण्यांची नावे👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/JcL5UTf7DcM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *नजर हटी, दुर्घटना घटी*
वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालकांची थोडीशी चूक आपल्यासोबत इतरांना संकटात टाकू शकते. अपघातात गमावलेले जीव कधीही परत येत नाही. ....... पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर 

https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *सिद्धेश्वर मंदीर - बारामती*
        
बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. 
इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. 
या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. 
औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.
सन 1723  मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.

मंदिराची वैभवशाली परंपरा...
बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती.           

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) साहित्य अकादमीच्या वतीने मराठी भाषेसाठी प्रसिध्द बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्या कोणत्या साहित्यकृतीला बहुमान प्राप्त झाला आहे ?

२) एका कसोटीत दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या आहेत ?

३) क्रांतिकारक राजगुरू यांचे मूळ गाव कोणते ?

४) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?

५) भारतात नुकतीच उध्वस्त करण्यात आलेली सर्वात उंच इमारत कोणती ?

*उत्तरे :-* १) पियुची वही   २) ग्रॅहम गुच, इंग्लंड ( पहिल्या डावात ३३३ व दुसऱ्या डावात १२३ धावा - ४५६ धावा भारताच्या विरोधात )   ३) खेड, जि. पुणे   ४) प्रतल   ५) ट्वीन टॉवर, नोएडा, ३२ मजली

                       *संकलन*
                   जैपाल भै. ठाकूर 
  जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव,
        जि. गोंदिया (९७६५९४३१४४)
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  विजय भगत, वाशीम
●  प्रल्हाद जाधव
●  संभाजी कोंडलवाडे
●  नागनाथ कौडगावे
●  दिनेश सारंगी
●  रामेश्वर चिंतलवाड
●  नवनाथ पिसे
●  गणेश गिरी, धर्माबाद
●  सुनिता गायकवाड
●  आर. के. उन्हाळे
●  शिवाजी पाटील येडे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे whatsapp करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.*

*माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.*

*"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."*

*~~‼॥ रामकृष्णहरी  ॥‼~~*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
    *श्री. संजय नलावडे, मुंबई*
    *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*गणरायाचे आगमन*

गणरायाच्या आगमनाने
घरात पसरले चैतन्य
सुख, समृद्धी जीवनात
अजून काय पाहिजे अन्य

फक्त दीड दिवसांसाठी
गजानन येतो घरी
आनंद पसरवून जातो
बालगोपालांच्या उरी

वर्षातून एकदाच येतो
श्री गणेशा हर्षोल्लासात
समाधान देऊन जातो
प्रत्येकाच्या तनामनात

आबालापासून वृद्धापर्यंत
सर्वानाच असते प्रतीक्षा
सुखदुःखाच्या क्षणी
तोच श्री तर करतो रक्षा

दंगा न करता गणेशोत्सव
आनंदात साजरी करू या
चला, एका सुरात म्हणू 
गणपती बाप्पा मोरया .....

- नासा येवतीकर, धर्माबाद
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
वाहत जाणा-या  पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *माणुसकीचे फळ*

एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.
कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.
तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.
त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.
त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,
“तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”
त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा…
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, 29 अगस्त 2022

30/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 30/08/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष . 🎇 * 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


💥 ठळक घडामोडी :-
● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.

💥 जन्म :-
● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.
● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी'
● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा.
● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 *9604481084*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबईकरासाठी दूध महागलं; सुट्या दुधाच्या किंमतीत पाच रुपयांची वाढ, दूध उत्पादक महासंघाचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *भाजपने लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 'अच्छे दिन' आले नाहीत; आकडेवारीचा संदर्भ देत शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *तब्बल 151 अशैक्षणिक कामे करावी लागणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा कशी करता; एका शिक्षकाचं आमदार प्रशांत बंब यांना खरमरीत पत्र*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस पुण्यात दारु विक्रीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट, पाटण्यात होणार 2024 च्या निवडणुकीवर चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Learn the names of Games खेळांची नावे👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/GER_spd2wv0

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *आधी वंदू तुज मोरया*
          
...

पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....!

https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙

कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ?
कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.
आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो.
आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते.
शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते.
आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) ग्रामसभेसाठी बायोमेट्रिकचा वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?

२) शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती प्रमाणात असते ?

३) काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात ?

४) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?

५) 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले गेले आहे ?

*उत्तरे :-* १) मान्याची वाडी, सातारा   २) ९ %   ३) विशालकोन   ४) अमावस्येची रात्र   ५) मुंडक उपनिषद

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  नागभूषण मॅकावाड
●  नागभूषण दुर्गम, नांदेड
●  अरुण चव्हाण
●  गणेश बोळसेकर
●  दिलीप झरेकर
●  कृष्णा श्याम दाभडकर
●  माधुरी हातनुरे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?*

*आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?*

*"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."*
 
         ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
          *श्री संजय नलावडे, मुंबई*
         *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

गणपती बाप्पा

बाप्पाला पाहताक्षणी
मनाचा लागतो शोध
गणपती बाप्पा माझा
मला देतो किती मोद

त्याच्या येण्याची उत्सुकता
मला लागते वर्षभर
तो आला वाजत गाजत
की उत्साह पसरतो घरभर
तयारी चाले आगमनाची
मग काम करी दिवसभर
त्याच्याकडे पाहून माझा
संपतो सगळा क्रोध
गणपती बाप्पा माझा
मला देतो किती मोद

अकरा दिवस चाले
त्याची पूजा आराधना
रोज वेगळा कार्यक्रम
रोज आगळा सामना
बाप्पा खुश व्हावा म्हणून
आम्ही सारे करतो साधना
उत्सवातील सेवा करून
कमी होतो सर्वांचा रोध
गणपती बाप्पा माझा
मला देतो किती मोद

- ना. सा. येवतीकर, विषय शिक्षक
कन्या शाळा धर्माबाद
  9423625769
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590/
          8087917063.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *भेटवस्तू न स्वीकारणे*

अब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण
स्वातंत्र्यानंतर अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’
काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.
कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.
ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’
अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

रविवार, 28 अगस्त 2022

29/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 29/08/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷    🎇.  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


              *राष्ट्रीय क्रीडा दिन*
💥 ठळक घडामोडी :-
◆  १८९८ - गुड इयर कंपनीची स्थापना
◆ १९४७ - डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली
◆ १९७४ - चौधरी चरणशिंग यांनी भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना केली

💥 जन्म :-
◆१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
◆१९०१ - सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
◆१९०५ - भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद
◆१९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆१९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
◆१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.

💥 मृत्यू :-
◆१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.
◆१९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.
◆१९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 *9604481084*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *येणारं वर्ष बाजरी वर्ष ! मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, शेतकऱ्यांना तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करण्याचे आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पुण्याच्या चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त करणार, 12 ते 15  सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चांदणी चौकात पाहणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *गणेशोत्सवाआधीच्या शेवटच्या रविवारी सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती मंडपात नेण्याची लगबग, मूर्तीकार मूर्तींवर फिरवतायत अखेरचा हात तर विविध शहरातील बाजारपेठाही सजल्या*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर, शिंदे, फडणवीस आणि शेलारांच्या घरी गणपतीचं दर्शन घेणार, लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकापुढे माथा टेकवणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान आणि  19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार, सूत्रांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पंढरपुरातील गर्दी व्यवस्थापनासाठी 'काशी मॉडेल', सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचा काशी दौरा, गर्दी व्यवस्थापनाबाबत काशीतल्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेत पाकिस्तावर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. हार्दीक पांड्या सामनावीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
Class 7th
*It's a Small world👇*

*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/OfhseWOkPNA

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*भारतीय क्रीडा दिवस त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख*

*खेळाकडे ही लक्ष द्यायला हवे*

मैदाने ही मुलांच्या खेळासाठीच असावेत, खेळाचे महत्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा त्यामुळे खेळाचा चांगल्याप्रकारे प्रसार होऊ शकेल. सध्याची पिढी मैदानाऐवजी मोबाईलवर जास्त दिसत आहे...........

पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.

https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/28.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *एन्डोस्कोपी म्हणजे काय ?* 📙

मानवी शरीराची बाह्यत: तपासणी सहज शक्य असते. काही भागांत छोटेसे उपकरण घालून अंतर्भागातील काही गोष्टी तपासणेही गेली अनेक दशके प्रचारात होतेच. उदाहरणार्थ, घशामध्ये लॅरिंगोस्कोप घालून स्वरयंत्रापर्यंतचा भाग बघणे वा गुदद्वारातून प्रोक्टोस्कोप घालून पाइल्सची तपासणी, योनिमार्गात व्हजायनोस्कोप घालून गर्भाशयमुखापर्यंतच्या भागाची तपासणी करून आजाराचे निदान वा इलाज करणे चालूच होते. संपूर्ण शरीराच्या आतील भागाची क्ष किरण वा अल्ट्रा साऊंडद्वाराही तपासणी करणे काही दशके डॉक्टर्स करीत होतेच. पण या साऱ्यामध्ये एक उणीव कायम जाणवत होती, ती म्हणजे प्रत्यक्ष अवयवाचा तपासायचा भाग डोळ्यांनी पाहता येत नव्हता. त्या जागेपर्यंत पोहोचून त्याचा छोटासा भाग तपासणीसाठी बाहेर काढता येत नव्हता.
या अडचणीमागचे महत्त्वाचे कारण होते, प्रकाश हा फक्त सरळ रेषेतच प्रवास करीत असल्याने दृश्यमान करण्याच्या भागात पोहोचताना आलेले कोणतेही वळण, बाक हा अडथळा ठरत होता. या सार्‍यावर उपाय सापडला, तो फायबरऑप्टिक तंत्रज्ञानाचा सरसकट वापर सुरू झाला त्यावेळी.
कोठेही कशीही वळू शकणारी, शरीरातील प्रमुख रंध्रातून वा भोकातून प्रवेश करू शकणारी फायबर ऑप्टिक वायर, तिच्या तोंडाशी असणारा प्रखर उजेड टाकणारा दिवा व या साऱ्यांच्या मदतीने दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा फायबर ऑप्टिकमुळे दुसऱ्या टोकापर्यंत सहज पोहोचू लागल्या. त्यांना भिंगाद्वारे मोठे करून साध्या डोळ्यांनी तर पाहता येऊ लागलेच, पण आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे याच सर्व प्रतिमा शेजारी ठेवलेल्या टीव्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष रुग्ण व त्याचे सर्व डॉक्टर्सही पाहू लागले आहेत. गरजेनुसार याचे कॉम्पॅक्ट डिस्कवर आरेखन करून ठेवता येते व दुसर्‍या कोण्या तज्ज्ञाचे मत घ्यायचे असेल, तर त्यालाही पाठवता येते.
याचा महत्त्वाचा फायदा झाला, तो म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंत लांबलचक असलेल्या काही मीटरच्या अन्नमार्गाचे संपूर्ण परीक्षण आता शक्य झाले आहे. अन्ननलिकेची सूज, जठरातील व्रण, छोट्या आतड्यातील अंतस्त्वचेतीलन बदल, मोठ्या आतड्यातील अडथळे एवढेच नव्हे, तर पित्ताशयाची तपासणीही यामुळे शक्य झाली. फुफ्फुसांकडे हवा पोहोचवणाऱ्या नलिकांची तपासणी, तेथे साचलेल्या कफाची विल्हेवाट लावणेही या पद्धतीने शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानात भर पडली, ती लॅप्रोस्कोपी या शल्यप्रकाराची. फायबर ऑप्टिक प्रकाशाचा वापर करून शरीरातील विविध पोकळ्यांमधील कोणत्याही अवयवावर शस्त्रक्रिया करणे आज सहज शक्य झाले आहे. आत घातलेल्या नळीतूनच कात्री, चिमटा, रक्त थांबवणारी इलेक्ट्रिक कॉटरी - जिचा वापर करून तीव्र उष्णतेने रक्तवाहिन्यांची तोंडे बंद केली जातात - इत्यादी उपकरणे थेट अवयवांपर्यंत पोहोचतात. शरीरावर म्हणजेच मुख्यत्वे पोटावर पूर्वी चार ते पाच इंचाचा छेद घेऊन करावी लागणारी अनेक शस्त्रकर्मे आता केवळ दोन वा तीन करंगळीच्या आकाराच्या नळ्या आत सारुन केली जातात. अर्थातच रुग्णाचा बरे होण्याचा काळ जखमा मोठ्या नसल्याने खूपच कमी होतो. पूर्वी ज्या शस्त्रकर्मानंतर किमान पंधरा दिवस रुग्णालयात खाटेवर राहणे गरजेचे होते, तो काळ आता या पद्धतीने जेमतेम एक ते तीन दिवसांपर्यंत येऊन पोहोचला आहे.
याही पुढचा टप्पा म्हणजे छोट्या कॅप्सूलच्या आकाराचा 'बग' म्हणजे छुपा कॅमेरा रुग्ण गिळतो. त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या चित्रणाच्या संदेशांचे टीव्हीवर वर मोठ्या पडद्यावर सतत प्रक्षेपण होत राहते. सोळा ते अठरा तासांनंतर हा 'बग' शरीराबाहेर टाकला जातो. आज जरी महागडी व प्रयोगाव्यवस्थेतील ही तपासणी असली, तरी काही वर्षात जगभर तिचा वापर जरूर सुरू होईल.
साधी डॉक्टरी तपासणी जर दोन तीनशे रुपयात होत असेल, क्ष किरण व अल्ट्रासाऊंडसाठी चार पाचशे रुपये पडत असतील तर एन्डोस्कोपीसाठी मात्र दोन ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्याचे कारण सरळच आहे. वापराव्या लागणाऱ्या सामग्रीची किंमत काही लाखांच्या घरात असते.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*         

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*Good handwriting is the mirror of good learning.*

*( चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. )*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) भारतातील सर्वात लांब असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची लांबी किती किमी आहे ?

२) भारतातील पहिल्या महिला खासदार कोण होत्या ?

३) शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तर उत्तर किती येईल ?

४) एनआरसीचे पूर्ण रूप काय आहे ?

५) आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते ?

*उत्तरे :-* १) ३७४५ किमी, NH ४४, श्रीनगर ते कन्याकुमारी   २) राधाबाई सुबारायन   ३) शून्य   ४) नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन   ५) हायड्रोजन                  

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  सौ. योगिता रामानंद रामदिनवार
●  रवी शिंदे, कुंडलवाडी
●  शिवराज पाटील चोळाखेकर
●  गणेश राऊत
●  रवींद्र केंचे
●  गणेश येडमे
●  ईश्वर शेटीये
●  सचिन बावणे
●  विनायक कुंटेवाड
●  अनिरुद्ध खांडरे
●  योगेश पाटील ढगे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर'  कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.*

*कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.*

      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
   ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
       *श्री. संजय नलावडे, मुंबई*
        *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*बालकविता - आई म्हणते....*

आई म्हणते संकटाना
नेहमीच तोंड द्यावे
लहानथोर सा-यांशीच
तोंड भरून बोलावे

मोठ्यांच्या बोलण्यात
कधी तोंड ना घालावे
चुकूनही कुणावर
कधी तोंडसुख ना घ्यावे

वायफळ बडबडीत कशाला
तोंडाची वाफ दवडावी?
फसवून कुणाच्या तोंडाला
पानं का पुसावी ?

तोंडाला तोंड देत कधी
भांडत ना बसावे
विश्वासघात करुन कुणाला
तोंडघशी ना पाडावे

कशाला कुणाशी उगाचच
तोंड सोडून बोलावे
वाईट कडू बोलण्यापेक्षा
तोंडाला कुलूप घालावे

आई आमची सतत असे
सांगते बरंच काही
तोंडदेखले मात्र ती
कधीच बोलत नाही

एकनाथ आव्हाड, मुंबई
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनात आपल्या जीवनाचे सुंदर स्वप्न पाहू शकतो आणि तसा पाहण्याचा हक्कही आहे.पण जे काही सुंदर स्वप्न पाहतो ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी खूप काही मेहनत घ्यावी लागते तेव्हा कुठे ते स्वप्न पूर्ण होऊ शकते.केवळ स्वप्न पाहणे आणि प्रत्यक्षात काहीच न करणे म्हणजे जीवनात आपल्याच हाताने नैराश्य आणून घेणे होय.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..9421839590.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*जोपासना चांगल्या विचारांचा एकनिष्ठतेची*
=========================
   एकदा तथागत गौतम बुद्ध एका ठिकाणी धम्म देसना देण्यासाठी गेले.समोर हजारो लोक बसलेले होते,तथागत काहीच न बोलता काही वेळ बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले. दुसऱ्या दिवशी परत धम्म देसना देण्यासाठी आले समोर पाचशे लोक बसलेले होते. परत तथागत काही वेळ काहीच न बोलता बसून राहिले व थोड्या वेळाने निघुन गेले.
   परत तिसऱ्या दिवशी जेंव्हा ते धम्म देसना देण्या साठी आले तेंव्हा फक्त वीस लोक समोर बसलेले होते,आणि त्या दिवशी तथागतांनी धम्म देसना दिली.
    जेंव्हा त्यांच्या शिष्याने त्यांना विचारले की पहिले दोन दिवस जास्त लोक असतांना तुम्ही धम्म देसना न देता तिसऱ्या दिवशी फक्त
वीस लोक असतांना का दिली?
   तथागतांनी खुप छान उत्तर दिले,"ज्या लोकांना खरच धम्म ऐकायचा होता ते तिसऱ्या दिवसा पर्यन्त आपल्या निश्चयावर ठाम राहिले व तिसऱ्या दिवशी उपस्थित राहिले.परन्तु जे मला फक्त बघण्या साठी आले होते व जे आपल्या निश्चयावर ठाम नव्हते ते अपोआपच कमी होत गेले.मला फक्त धम्म ऐकून घेणारे नकोत तर आचरणात आनणारे अनुयायी हवेत.म्हणून मी तिसऱ्या दिवशी योग्य अशाच अनुयायांना धम्म दिला."

*बोधःजो पर्यन्त चांगल्या विचारांशी एकनिष्ठ राहण्यावर आपण ठाम नसतो तो पर्यन्त आपल्याला त्यापासून मिळणारा लाभ मिळत नाही.किती आहेत यापेक्षा कसे आहेत हे महत्वाचे.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

शुक्रवार, 26 अगस्त 2022

26/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 26/08/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :- 
◆१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर

💥 जन्म :-
◆१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित
◆१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ
◆ १९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते

💥 मृत्यू :-
◆१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
◆१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक
◆१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू
◆१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते
◆ २०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक

संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देणार, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नोंदणीकृत स्कूल बसशिवाय विशिष्ट स्कूलबससाठीची सक्ती शाळांना महागात पडणार, अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी होणार, सरकारची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *घोषणाबाजी आणि अभूतपूर्व गोंधळामुळे गाजलेल्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *घटनापीठासमोर होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट, ठाकरे आणि शिंदे गटातील वादावरच्या अनेक घटनात्मक प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त जागा भरणार, शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती, मराठा समाजातील 1200 उमेदवारांना आरक्षित पदावर नियुक्त्या*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *टीईटी परीक्षेत शिक्षण अधिकाऱ्याची मुलगी अपात्र असताना पात्र केल्याचा आरोप, अधिकाऱ्याकडून आरोपाचं खंडन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक, पुढच्या रणनितीवर होणार चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*इंग्रजी महिन्याची नावे👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/gZjoOzwNoTs
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *माझा फळा-माझी लेखणी*

हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. .........

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html

*संकल्पना - नासा येवतीकर*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग*
--------------------------------------

सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. 
चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. 
गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.
*या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.*
ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. 
ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. 
मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. 
रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.

*त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :*
१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.
२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.
३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.
४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.
५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.

----------------------------------
*त्र्यंबकेश्वरला कसे जाल?*
-----------------------------------
हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.
रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.
बसमार्ग  - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मी
नाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.
त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात.
तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात.        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) भारताने अवकाशात एकाच वेळी किती उपग्रह पाठविण्याचा विक्रम केला होता ?

२) सूर्यमालेतील बटूग्रह कोणता ?

३) क्रांतिकारक भगतसिंह यांना केव्हा फाशी देण्यात आली ?

४) नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १९२ धावा काढणारे सलामीवीर कोण ?

५) राजू श्रीवास्तव हे कोण आहेत ?

*उत्तरे :-* १) १०४ उपग्रह ( १५ फेब्रुवारी २०१७ )   २) प्लूटो   ३) २३ मार्च १९३१   ४) शिखर धवन ( ८१ धावा ) व शुभमन गिल ( ८२ धावा )   ५) प्रख्यात विनोदी कलाकार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  दिगंबर खपाटे बन्नाळीकर
●  प्रशांत इबितवार येवती
●  संदीप आवरे चिकना
●  विशाल कन्हेरकर अमरावती
●  नारायण शिंदे, रत्नागिरी
●  प्रशांत कोकणे
●  मधुकर बोईनवाड
●  संदीप सोनकांबळे
●  सुमेध वाघमारे
●  मारोती ताकलोर
●  दत्ता बोंदलवाड
●  अभय रन्नावरे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.*

*माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!*

        ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
     ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀
        *श्री. संजय नलावडे,मुंबई*
           *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
बालकविता - माझी नानी
--------------------------------
माझी लाडकी नानी
सांगे रोज कहाणी
गाई छानशी अंगाई
मी गाढ झोपी जाई    ।।

म्हणे माझी नानी
पहाटे की रे उठावे
सांगितलेले ते ऐकावे
आचरणात आणावे    ।।

भले व्हावे आपुले हे
नानीचे सांगणे खरे
वागू या आपण चांगले
आपल्यासाठी के बरे    ।।
--------------------------------
-अरुण वि.देशपांडे- पुणे
(आली आली परीराणी संग्रह-2012)
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो .

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद - ९४२१८३९५९०
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *क्रोधाला संयमाने जिंका*

एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’

तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

27/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 27/08/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷    🎇.  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆ १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान

💥 जन्म :-
◆१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक
◆ १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल.
◆ १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
◆१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री

💥 मृत्यू :-
●१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या पाथर्डीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने काढला मोर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *शिवसेनेची थेट संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय युती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई : राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणाऱ्या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक जाहीर, 15 आणि 16 ऑक्टोबरला गट क या पदांसाठी घेतली जाणार परीक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *येत्या 29 ऑगस्ट 2022 रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये मुकेश अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करु शकतात.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नरेंद्र मोदी हेच 'विश्वगुरू'; 75 टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेत 'जगात भारी'*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज निवृत्त होत आहेत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*विविध आकाराची ओळख👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/jgUSyrEp3os

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *आईचा श्याम - लघुकथा*

श्याम नावाच्या एका संस्कारी मुलाची कथा,जरूर वाचा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4017979838328760&id=100003503492582

प्रतिक्रिया जरूर comment करा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ लेखन - नासा येवतीकर, धर्माबाद
     9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙

ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.
हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.
धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.
गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम.
'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच.  ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय.

असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*         

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत ?

२) भारतात पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?

३) चंद्रशेखर आझाद ( तिवारी ) यांचा जन्म केव्हा झाला ?

४) दिशा पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?

५) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी कोणाच्या नावावर आहे ?

*उत्तरे :-* १) सुधीर मुनगंटीवार   २) ८४ %   ३) २३ जुलै १९०६ ( भाबर, मध्यप्रदेश )   ४) होकायंत्र   ५) डॉन ब्रॅडमन ( पहिल्या ८० डावात ९९.९४ सरासरी )

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  संतोषजी बदरखे 
●  अतुल वैद्य
●  दत्तप्रसाद सुरुकुटवार
●  प्रशांत वीरभद्र रुईकर
●  दिगंबर सोळंके

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर'  कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.*

*कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.*

       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
     ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
       *श्री. संजय नलावडे, मुंबई*
        *मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मैत्री तुझी माझी*

मैत्री तुझी माझी
आरसा नितळ,
दिसे प्रतिबिंब
अगदी निर्मळ...

संकटात नित्य
धावते वेळीच,
तुझी आणि माझी
मैत्री वेगळीच...

नाते ग आपले
 हे जगावेगळे,
 बंध हे मनाचे
आहेत आगळे...

मनातील माझ्या
ओळखते कशी,
आहे अशी मैत्री
ही बावनकशी...

जन्मोजन्मी हीच
मैत्रीण मिळावी,
सुखी माझी सखी
सदैव असावी...

मैत्रीचा हा हात
हाती राहो नित्य,
अखंड ही मैत्री
हेच खरे सत्य...

© सौ.गौरी शिरसाट
      मुंबई
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही.
त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी  घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही.

© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠     
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *समर्पण*

एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.''

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगलवार, 23 अगस्त 2022

24/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 24/08/2022 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷    .🎇  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


💥 ठळक घडामोडी :-
◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

💥 जन्म :-
◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.
◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक.
◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक.

💥 मृत्यू :-
◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ
◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू
◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी नाही, पुढच्या तारखेकडे लक्ष*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करा, विनायक मेटेंच्या अपघातावर विधानसभेत चर्चेदरम्यान अजित पवारांची मागणी, चालकाच्या बदलत्या जबाबाची नेत्यांकडून दखल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मुंबई, ठाण्यात लहान मुलांमध्ये टॉमॅटो फ्लूचा प्रसार अधिक, चिकनगुन्या आणि डेंगूसदृश लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन महिलांसह पाच वर्षाचा मुलगा जखमी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *बॉक्सऑफिसवर आपटलेल्या लालसिंग चड्डा सिनेमाला ओटीटीवरही भाव मिळेना, नेटफिक्ससोबतची बोलणी फिसकटली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *पंतप्रधान मोदीं आज हरियाणा-पंजाब दौऱ्यावर; महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन करणार, सुरक्षेबाबत पोलीस सतर्क*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारताने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धत्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवत आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी प्रगती केली असून भारताला एका गुणाचा फायदा झाला आता भारताची रेटिंग 111 झाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Learn the Occupation👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/XQiONqjbUmM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *सोशल मीडिया आणि आधार*

https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙

रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा.
पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.
उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.
उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.
उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते.
तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*      

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?

२) 'पाचोळा' ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली ?

३) १ ते १०० मध्ये एकूण दोन अंकी मूळसंख्या किती ?

४) युवा क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म केव्हा झाला ?

५) आग्रा ( उत्तरप्रदेश ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे ?

*उत्तरे :-* १) दीपक केसरकर   २) प्राचार्य रा. र. बोराडे   ३) २१ मूळसंख्या   ४) २८ सप्टेंबर १९०७   ५) १०० फूट

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  श्याम ठाणेदार, पुणे
●  श्रीकांत भुजबळ साहेब
●  हणमंत बोलचेटवार
●  संजय पाटील, पुणे
●  ऋषिकेश शिंदे
●  गोपाल ऐनवाले
●  सुनीलकुमार बावसकर
●  प्रितिष पाटील
●  भाऊराव शिंदे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

       *सारा अंधारच प्यावा*
       *अशी लागावी तहान ॥*
       *एका साध्या सत्यासाठी*
       *देता यावे पंचप्राण ॥*
*असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.*

*खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*

             *॥ रामकृष्णहरी ॥*
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
          *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *मोबाईल स्तोत्रं*
                
लागते ओढ होता प्रातःकाळ
तसे पाहता,नसे ओढीची वेळ ...||१||

सर्वांठायी लावूनी वेढ तू गोड
सहान थोर भोवती तुझ्या सर्वकाळ ..||२||

क्षणाक्षणा वाढे आतुरता होई घालमेल
पाहत राही कोणता मॅसेज,कोणाचा मेल ..||३||

प्रभाते कर दर्शनमचा सहज पडला विसर
मुल्य वाटे ना कशाचे तूचं वाटे अग्रेसर ..||४||

जातील डोळे, स्थूल शरीर,लागेल चष्मा
कळते सारे परी तुझाच राहील वरचष्मा ...||५||

अतिशहाणे झाले जन तुझ्याचमुळे
पसरु दे चौफेर तुझे तुझेच जाळे ...||६||

डोके हॅंग झाले तरी चालेल देवा
तू नको तसे राहू, चाखू दे मेवा ...||७||

मन मुके झाले,शब्द बोलते केले...
जग जवळ आले,जवळचे दूर गेले ...||८||

बेचैन जीवाची बेचैनी वाढते क्षणाक्षणाला
ध्यास लागला लागला हरेक जीवाला ...||९||

मन हरवले धन जाऊ दे तुझ्या ठायी, तुझं पायी
इति आदिदेवमोबाईल स्तोत्रं संपूर्णम् ...॥१०।।

*हणमंत पडवळ, उस्मानाबाद.*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 
        नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन  निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹      
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                    *मानवता*

जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही.

*तात्‍पर्य :- ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, 22 अगस्त 2022

23/08/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
          ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 23/08/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷    🎇.  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆ २०१२- राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.
◆ १९६६- 'लुनार ऑरबिटर -१' या मानवरहीत अंतराळ यानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे पाठविले.
◆ १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
◆१९२९ - हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.

💥 जन्म :-
◆१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. 
◆ १९४४- सायरा बानू ,हिन्दी चित्रपट अभिनेत्री.
◆ १९१८- विदा करंदीकर, लेखक,कवी.

💥 मृत्यू :-
◆१९९४- आरती साहा, इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पटू.
◆ १३८७ - ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.
◆१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद.. शिक्षण संचालकांचा निर्णय.. शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण.. नगरपरिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *अग्निसुरक्षा नियमांच्या शिफारस करण्यासाठी अखेर राज्य सरकारनं चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले असून 5 सप्टेंबरपर्यंत  न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना देणार प्रशिक्षण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा .. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क होणार माफ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अगदी अखेरच्या 2 षटकात कमाल गोलंदाजी केल्याने 13 धावांनी भारत जिंकला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Humpty Dumpty👇*

*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/MVvqgTsRddk

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*लघुकथा - पंगूम लंघयते गिरीम*

दिव्यांग व्यक्तीची यशस्वी कथा.

http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.html

कथालेखन - नासा येवतीकर, धर्माबाद

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 📙

जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक. वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते.
जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात.
ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो.
संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

२) ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले देशातील पहिले राज्य कोणते ?

३) युवा क्रांतिकारक मंगल पांडे यांना केव्हा फाशी देण्यात आली ?

४) 'आधुनिक आर्यभट्ट' कोणाला म्हणतात ?

५) भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान कोण आहे ?

*उत्तरे :-* १) हेमंत सोरेन   २) गोवा   ३) ८ एप्रिल १८५७   ४) विक्रम साराभाई   ५) हरमनप्रीत कौर

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  सचिन बोरसे
●  आनंद यादव
●  अनिलकुमार शिंदे
●  रामदास पेंडपवार,
●  सुनील बेंडे
●  भारत सर्वे
●  भोजन्ना चिंचलोड
●  बाबुराव पिराईवाड

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?*

*कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"*

   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
☀☀☀☀☀☀☀☀☀
संजय नलावडे, मुंबई
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*बालकविता*

पाळण्यात पापा
मारतो गप्पा
खातो धप्पा
ममीचा

मुळूमुळू रडतो
दुधच पितो
मटकन झोपतो
बब-या

चांदवा झुलतो
मोर डोलतो
पोपट बोलतो
वेदूला

खुळखूळा खणखण
पैंजण रूणझुण
बाजूबंद छनछन
बाळाचे

दुडूदुडू चालणे
अंगणी नाचणे
बोबडे बोलणे
छकुल्याचे

- वीरभद्र मिरेवाड, नायगाव, नांदेड
( फेसबुक साभार )
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

रस्ता कितीही अरुंद असला तरीही माणूस तो रस्ता पार करुन जातो त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचण असली तरीही त्या अडचणीवर मात करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण जीवन हे सहजासहजी जगणे सामान्य माणसासाठी अवघडच आहे.अवघड आहे म्हणून सोडता येणार नाही किंवा निराश आणि हताशही होऊन बसता येणार नाही.स्तब्धपणे बसलात तर मार्ग काढणेही अवघड आहे.त्यातून काही ना काहीतरी युक्ती सुचता आली पाहिजे अन्यथा संकटं अंगावर झेलून लाखमोलाचे जीवन जगण्यात काही अर्थ राहणार नाही.प्रयत्न,सातत्य,सकारात्मक विचार ह्यातूनच जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०.
🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                     *निर्मळता*

गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."

तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहवे.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~