सोमवार, 5 दिसंबर 2022
06/12/2022
रविवार, 4 दिसंबर 2022
05/12/2022
03/12/2022
02/12/2022
बुधवार, 30 नवंबर 2022
01/12/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 01/12/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जागतिक एड्स दिन
💥 ठळक घडामोडी :-
◆१९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले
◆ १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना
💥 जन्म :-
◆ १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
◆ १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
◆ १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
◆ ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
◆ १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कोराना काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 597 परिचारिकांना कायमस्वरुपी करणार, शासनाचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'टोयोटा'ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द, त्यामुळे भारताला वनडे मालिका गमवावी लागली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*कथा - सुंदर*
त्याचं नाव सुंदर, तसं त्याचं कामही सुंदर त्याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं. परंतु सारेच जण त्याला बंदर म्हणायचे. कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........
वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html
कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧
कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त .
दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी .
पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!
चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून .
कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार .
मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....!
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'जागतिक एड्स दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
२) एड्स होण्याची मुख्य कारणे कोणती ?
३) जगात सर्वात प्रथम एड्सचा रुग्ण कोठे सापडला ?
४) एड्सची लक्षणे कोणती ?
५) भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोठे सापडला ?
*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) HIV रुग्णाचे रक्त दिल्याने, दुषित रक्त असलेल्या इंजेक्शनमधून, HIV बाधित आईकडून स्तनपान झाल्यावर, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे इत्यादी ३) अमेरिका ( १९८१ ) ४) कित्येक आठवड्यापासून ताप येणे, खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, सतत जुलाब, झोपतांना घाम येणे, भूक न लागणे इत्यादी ५) मुंबई ( १९८६ )
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक
◆ हेमंत भेंडे, शिक्षक
◆ राजकुमार दाचावार, शिक्षक
◆ श्याम नरवाडे
◆ मारुती गिरगावकर, शिक्षक
◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक
◆ मारोती दिंडे
◆ श्रीकांत लाडे
◆ सुभाष सोनटक्के
◆ शिवाजी पुरी
◆ श्याम पाटील
◆ विश्वनाथ पांचाळ
◆ बालाजी कलकोटे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.*
*भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.
© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जीवन*
*समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि*
*"समुद्र चोर आहे".*
*त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि*
*"समुद्र पालनकर्ता आहे".*
*एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते*
*"समुद्र खुनी आहे".*
*एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो*
*"समुद्र दाता है".*
*अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते*
*लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*
*जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...*
*भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.
*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता*
*जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोमवार, 28 नवंबर 2022
29/11/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 29/11/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
१९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.
२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.
२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
💥 जन्म :-
१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म.
१९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.
१९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
१९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
१९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार
१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.
२०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड द्या! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचा सरकारला 4 डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम, अन्यथा कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *आता गोवरसाठीही क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या.. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत एका षटकामध्ये 7 सिक्सर साग झंझावाती द्विशतकासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
*Story-The Nightingale and the nobleman👇*
*व्हिडीओ-लिंक👇*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*शिक्षकांना शिकवू द्या ...*
शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙
वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.
चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.
दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*"आजची प्रश्नमंजूषा"*
१) देशातील स्कायरूट एरोस्पेस या खाजगी कंपनीने बनविलेले पहिले रॉकेटचे नाव काय आहे ?
२) भारतातील पहिली बोट रेस लीग स्पर्धा कोणती ?
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे केली ?
४) टिपू सुलतान यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?
५) 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक कोणी केले ?
*उत्तरे :-* १) विक्रम - एस २) केरळ चॅम्पियन बोट लीग ३) येवला, नाशिक ४) देवनाव्हली, कर्नाटक ५) जगदिशन नारायण, तामिळनाडू
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👤 साईनाथ बोईनवाड
👤 योगेश खवसे
👤 पोतन्ना गुंटोड
👤 प्रमोद पाटील बोमले
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.*
*असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*कासवाची चतुराई*
एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली..
*बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
रविवार, 27 नवंबर 2022
28/11/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/11/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला
● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.
💥 जन्म :-
● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.
● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
💥 मृत्यू :-
● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.
● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबईत सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. आदित्य ठाकरेंचा 217 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने केला विश्वविक्रम, प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
*Story-Kind Kondiba👇*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/fs5JTsw7RVw
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*
भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*चिखलदरा*
चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.
महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.
परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेत
हे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.
चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) महाराष्ट्रातील किती व कोणत्या शाळांना २०२२ चा केंद्राचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' प्राप्त झाला आहे ?
२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
३) सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच संधी मिळालेल्या महिलेचे नाव काय ?
४) 'पाणी पंचायत' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?
५) शिवसेनेचे 'सामना' हे मुखपत्र केव्हा सुरू झाले ?
*उत्तरे :-* १) तीन - सातारा ( २ शाळा ) , रायगड ( १ शाळा ) २) नागपूर ३) आशा बोथरा ४) विलासराव साळुंखे ५) २३ जानेवारी १९८९
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👤 राम चव्हाण, नांदेड
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*हसत दु:खाचा केला मी स्विकार,*
*वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*
*प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*
*आनंदयात्री, मी आनंदयात्री !*
*दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?*
*दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.
ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.
© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रता*
राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणाली
राम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला.
*तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
शुक्रवार, 25 नवंबर 2022
26/11/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 26/11/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*भारतीय संविधान दिन*
💥 ठळक घडामोडी :-
● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
● १९४९: भारताची घटना मंजूर झाली.
● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.
● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
💥 जन्म :-
● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म.
💥 मृत्यू :-
● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.
● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन.
● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी
● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी
● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *एमपीएससीत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० नोव्हेंबरला शिंदे-फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असं स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, आम्ही कामावरून काढले नाही; कर्मचारी कपातीवर अॅमेझॉनचे स्पष्टीकरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या पोर्तुगालने घानाला 3-2 ने मात देत विश्वचषकात दिली विजयी सलामी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••
*गोष्टींचा शनिवार-चिनू,मिनू व गोगो,Fun in Metro👇*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/DjS_bheqK64
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*भारतीय संविधान दिवस*
देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?*
रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.
*.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.*
देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे.
देवास (मध्य प्रदेश),
नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि
म्हैसूर (कर्नाटक)
या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.
देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.
नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.
*.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.*
१. मुंबई
२. कोलकत्ता
३. हैदराबाद
४.नोएडा
*.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.*
प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.
*.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.*
रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.
*.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.*
रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.
*.नोटा कशा छापल्या जातात?.*
विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.
*.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.*
नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते.
*.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.*
खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात.
*भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन
👤 अर्जुन यनगंटीवार
👤 मुरलीधर हंबर्डे पाटील
👤 संजय बोंटावार
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.*
*नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*धाडसी गीता*
गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ झाली. गीता अभ्यास करत होती. एक कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँs
बँs ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले.
बोध: आपण कधीही धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही.
समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~