रविवार, 4 दिसंबर 2022

02/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 02/12/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
राष्ट्र दिन - संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
राष्ट्र दिन - लाओस.

💥 ठळक घडामोडी :- 
१९८८ - बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
१९८९ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.

💥 जन्म :-
१९३३ - के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
१९३७ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
१९४७ - धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७२ - सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७९ - अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :- 
१९८० - चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
१९९३ - पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात उडाला गोंधळ, यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी देण्यात आली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे; पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात वाढणार एकात्मतेची भावना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि 'पेपरलेस' होण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *सावकाराने बळकावलेल्या 100 एकर जमिनी जळगावमधील शेतकऱ्यांना परत, कुटुंबीयांना आनंदाश्रू तर अधिकाऱ्यांचे डोळेही पाणावले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान संपलं, 788 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोल्हापूरचा स्वप्नील पाटील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चा डिजिटल रुपया बाजारात उपलब्ध*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*My Family माझे कुटुंब👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/IqghB7P-qM0

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?*    
 http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 

काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. 
इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. 
असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय.

*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा कोणती ?
२) 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विश्वविक्रम कोणी केला ?
३) पहिला जागतिक एड्स दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?
४) छत्रपती शिवरायांनी कोणत्या भाषेला राजभाषा केले ?
५) फुटबॉल विश्वचषकाला कोणत्या वर्षी सुरुवात झाली ?

*उत्तरे :-* १) केरळ चॅम्पियन बोट लीग स्पर्धा   २) जगदिशन नारायण, तामिळनाडू ( १४१ चेंडूत २७७ धावा )   ३) १ डिसेंबर १९८८   ४) मराठी   ५) १९३०

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     
  
👤 संजय डाड, नांदेड
👤 सुरज पाटील रोशनगावकर
👤 अभि मामीडवार
👤 वैशाली गर्जेपालवे, सहशिक्षिका
👤 श्रीनिवास अवधुतवार, धर्माबाद
👤 जयानंद मठपती
👤 सूर्यकांत तोकलवाड
👤 शरद पवार, सहशिक्षक
👤 धनराज राखेवार, नांदेड
👤 संतोषकुमार राठोड
👤 दत्ता मुपडे
👤 कोमल पाटील
👤 आदित्य बालाजी धात्रक
👤 शिवराज दासरवार

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.*

*आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?*

••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••
    🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *मिनूला मोरानी दिलेली भेट* 
 
मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले  . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण   मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली.  व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली.    

बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें