✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 03/12/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*जागतिक विकलांग दिवस*
💥 ठळक घडामोडी :-
१९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
२००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.
💥 जन्म :-
१८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
१९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
११५४ - पोप अनास्तासियस चौथा.
१७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला समृद्धी महामार्गाची पाहणी करणार. ११ डिसेंबरला मोदींच्या दौऱ्याआधी शिंदे-फडणवीस महामार्गाचा आढावा घेणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *लालपरीच्या ताफ्यात आणखी 8 हजार बस येणार, डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार बस येणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नंबी नारायणन-इस्रो हेरगिरी प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून आरोपींना जामीन देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, केरळ हायकोर्टाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी, एसएससी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, नवी मुंबईत 10 हजार विद्यार्थी देणार परीक्षा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ ; जीएसटीसह सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *महाराष्ट्राचे विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सौराष्ट्राने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *MPSCचं सुपरफास्ट काम ! PSI पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जागतिक विकलांग दिनानिमित्त लघुकथा .......
*पंगूम लंघयते गिरीम*
वरील लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.html
लघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙
शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.
कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते !
खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा.
लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून
मनोविकास प्रकाशन
०२० ६५२६२९५०
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) पाकिस्तान कडून आलेला ड्रोन मारून पाडणाऱ्या पहिल्या BSF महिला जवान कोण ?
२) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने रद्द कोणत्या देशाचे झाले आहेत ?
३) भारतातली पहिली बोट रेस व जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा २०२२ कोणी जिंकली ?
४) टिपू सुलतान कोण होता ?
५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केव्हा केली ?
*उत्तरे :-* १) भाग्यश्री नाईक, सालेकसा, जि. गोंदिया ( महाराष्ट्र ) २) भारत ( ४२ सामने रद्द ) ३) ट्रॉपिकल टायटन्स ४) योद्धा, विद्वान, म्हैसूर राज्याचे शासक ५) १३ ऑक्टोबर १९३५ ( येवला, नाशिक )
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद
👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली
👤 शिवाजी कल्याणकर
👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार
👤 विरेश रोंटे
👤 श्रेयस दिलीप धामणे
👤 पांडुरंग तम्मलवाड
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.*
*जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*लाख मोलाचा देह*
एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.
वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे'
'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.
'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.
अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.
व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें