✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 28/09/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
जागतिक कर्णबधीर दिन
Green Consumer Day
💥 जन्म :-
◆१९८२- अभिनव बिंद्रा,ओलीम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.
◆१९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
◆१९८२- रणबीर कपूर,अभिनेता.
◆१९४७- शेख हसीना ,बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान.
💥 मृत्यू :-
●२०१२-ब्रजेश मिश्रा ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
●१९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
●१८९५-लुई पाश्चर,फ्रेंच सूक्ष्मशास्त्रज्ञ.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *चांद्रयान 2 चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाचे फोटो नासाकडून जारी, चांद्रयानाची हार्ड लॅण्डिंग झाल्याचीही माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी, निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी दाखल नाही*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पुरग्रस्तांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा पुणेकरांचा आरोप, अनधिकृत बांधकामांमुळे पुण्यात पूरपरिस्थिती, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा, पाहणीदरम्यान नागरिकांचा संताप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *2015च्या तुलनेत 2018 मध्ये मुंबईतील अपघातांमध्ये 22 टक्क्यांनी घट, ब्लूमबर्ग आणि मुंबई ट्राफिक पोलीस यांच्या अहवालातून माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांमुळे शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं, अनेक कार्यकर्ते ताब्यात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *भारतीय नौदलाचं बळ वाढणार, आयएनएस खंदेरी पाणबुडीचा ताफ्यात समावेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *लता मंगेशकरांच्या स्वरांकीत भावमुद्रांच्या खास पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन, उषा मंगेशकर आणि राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलारांची उपस्थिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
या बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.
https://sharechat.com/post/wnbj8KW
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*लता मंगेशकर*
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (२८सप्टेंबर) 90वा वाढदिवस. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताची गान कोकिळाअसे ही म्हटले जातेलता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*गुगल*
माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलचा काल वाढदिवस. इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.
आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. जरी गुगल कंपनीची ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले. २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस सत्तावीस सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनी ७ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती.
'गुगल' ही गणिती संज्ञा आहे. एकावर शंभर शून्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणितज्ज्ञाने ही संकल्पना शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव 'गुगल' ठेवण्यात आले. आजकाल गुगल सर्च इंजिन इतके प्रचंड लोकप्रिय झालेले आहे की 'to google' असे क्रियापदच इंग्रजीत तयार झालेले आहे. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*“ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?*
ग्रीनलँड
2) *जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?*
बर्लिन
3) *राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?*
पांढरा
4) *राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?*
24 आरे
5) *भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?*
15
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे
● प्रशांत राऊतखेडकर
● सचिन बावणे
● साईनाथ कानगुलवार
*29 सप्टेंबर 2019 रविवार*
● प्रथमेश नागोराव येवतीकर
● राजेश सामला
● संदेश जाधव
● महेश राखेवार
● गणेश पेटेकर
● मारोती वाघमारे
● अजय मिसाळे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.*
*हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*एक फिल्मी गीत ऐकलं की डोक्यात सणक निघायची। वाटायचं एव्हढा* *अलौकिक जन्म* *मिळाला तो काय रडायला* *मिळाला का?*
*ते अस,*
" *दुनिया बनाने वाले ,काहेको दुनिया बनाई। तुने काहेको दुनिया बनाई।"*
*मग लक्षात आलं।की अरे हा-- तुम्ही हारलात किंवा अपयशी झालात तर* *जवळचे सुद्धा लांब रहाण्याचा प्रयत्न करतात.जवळचा* *असूनही* *चुलत-चुलत वगैरे सांगतात.*
*पण या उलट तुम्ही कुठल्याही क्षेत्रात* *उत्तुंग शिखर गाठा. मग* *कमाल बघा---अहो नाती नसतांना* *_सुध्दा संबंध जोडला_* *जातो,आहो माझा खूप* *क्लोज नातेवाईक आहे,मित्र* *आहे असं सांगितलं* *जातं.*
*दुनियाच अशी आहे दोस्तो,तुम्ही गुणवान असलात की सगळे मूग* *गिळून बसणार। अन थोडका चुकीचं घडूद्या किंवा व्यंग सापडुदया की मुका सुद्धा* *बोलायला लागतो.*
*म्हणून जगून घ्या, जग दोनही बाजू तपासत आणि त्यांच्या प्रमाणे विचार* *करत*
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.
© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*खरे अपयश*
एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"
यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"
रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"
यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव
*(Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"
हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"
यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!"
*तात्पर्य*
*आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें