रविवार, 29 सितंबर 2019

26 सप्टेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 26/09/2019 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
◆२००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

💥 जन्म :-
★१९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
★१९३१ - विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
★ १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.

💥 मृत्यू :-
◆१९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.
◆१९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक.
◆ १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक.
◆ १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.
◆२००२ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मतदानाबाबत जनजागृतीसाठी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षितसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सदिच्छादूत म्हणून नियुक्ती, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नरेंद्र मोदी फादर ऑफ इंडिया, डोनाल्ड ट्रम्प यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं, गुंतवणुकीसाठी 43 कंपन्यांच्या सीईओशी आज चर्चा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *सर्व व्यवहार बंद करत पीएमसीवर आरबीआयकडून निर्बंध, दिवसाला केवळ एकच हजार काढता येणार, संताप करत ग्राहकांचा बँकांमध्ये गोंधळ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *कोणावरही सूडबुद्धीने कारवाई नाही, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होणार महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी, लातूरमध्येही मुसळधार पाऊस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *प्रसिद्ध तेलुगू विनोदी अभिनेता वेणु माधवचे निधन, अवघ्या 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फिफा फुटबाॅल अवॉर्ड - मेसी सहाव्यांदा प्लेअर ऑफ द इयरचा मानकरी तर राेनाल्डाे तिसऱ्या स्थानावर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
या बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
https://sharechat.com/post/m1mA8lW
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *सुपरस्टार अमिताभ बच्चन*

https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_25.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *डासांमुळे होणारे आजार* 📙

मलेरिया, हत्तीरोग, चिकुनगुनिया, डेंग्यू या चार आजारांच्या प्रसारासाठी डासांच्या विविध जाती कारणीभूत ठरतात. यांतील प्रत्येक आजाराने जगाच्या पाठीवर, भारतातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.
आपण चारही आजारांची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक ठरते; कारण भारतात कुठेही गेलात, तरी डास तुमच्या भोवती गुणगुणतच असतात, चावत असतात.
सर रोनाल्ड रॉस या जन्माने भारतीय डॉक्टरचा मलेरियाच्या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशातील अल्मोरा गावी १३ मे १८५८ रोजी त्यांचा जन्म झाला. ब्रिटनमध्ये १८७९ मध्ये वैद्यकीय पदवी घेऊन भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून ते दाखल झाले. मलेरियाला कारणीभूत झालेले परजीवी सूक्ष्मजीव फ्रेंच शास्त्रज्ञ लाव्हरेन यांनी १८८० मध्ये शोधले होते. पण त्यांची वाढ, प्रसार व मलेरियासंदर्भातील डासांचे जीवनचक्र यांबद्दल रॉस यांनी सतत संशोधन चालू ठेवले. अॅनाफिलीस जातीच्या डासाच्या मादीच्या जठराच्या वळ्यांमध्ये हे परजीवी दबा धरून वाढतात व तिच्या चाव्यातून मानवी शरीरात त्यांचा प्रवेश होतो, हे निरीक्षण हैदराबादजवळच्या बेगमपेठ येथील प्रयोगशाळेत त्यांनी १८९७ साली नोंदवले. १९०२ साली त्यांना याबद्दलचे नोबेल पारितोषिक दिले गेले.
मलेरियामध्ये रात्रीच्या वेळी थंडी वाजून येते व दिवसा ताप उतरतो, पण अशक्तपणा येतो. यामुळे हीव म्हणजे थंडी आणणारा ताप म्हणून हिवताप या नावाने तो प्रसिद्ध आहे. परजीवींची वाढ लाल रक्तपेशीत होते व त्यांचे विघटन झाल्याने रक्तक्षय होतो, हा मलेरियाचा एक उपद्रव, क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.
स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.
यांपैकी चिकनगुनिया या आजाराची सुरुवात आफ्रिकेमध्ये टांझानियात १९५२ साली झाली. कोलकात्यामध्ये १९६३ साली पहिली लागण झाल्याची नोंद आहे. केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसात नंतर याने अधूनमधून तोंड वर काढले. सुमारे ४३००० लोकांना त्यावेळी चिकनगुनियाने पछाडले होते. महाराष्ट्रात प्रथम मराठवाडा, विदर्भ येथे व नंतर अनेक ठिकाणी गेल्या ३ वर्षांत चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ या डासांनी आता महाराष्ट्रातही ठाण मांडले आहे. चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो. शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. घराघरांतून धडधाकट माणसे सांधे आखडल्यामुळे काम करू शकत नाहीत, हे दृश्य या आजाराने धुमाकूळ घातलेल्या अनेक गावांमध्ये दिसून येते. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.
डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्‍या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. त्यात अडथळा येऊन विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो. रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.
हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. एक ते दोन सेंटीमीटर एवढी त्यांची वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. अतिसूक्ष्मापासून पूर्ण वाढीपर्यंत दोन आठवड्यांत यांची प्रगती होते. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात; पण हत्तीसारखा जाड पाय झाल्यास हालचाल, काम करणे अवघड होते. पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्‍या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते. हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध वापरले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.
डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की डास चावण्यापासून प्रतिबंधक हाच एक उपाय सध्यातरी आपल्या हातात आहे. डास मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे पचवुन त्यांच्या नव्या प्रजाती सतत तयार होत गेल्या आहेत. डीडीटी तर त्यांनी कधीच पचवले आहे. साचलेल्या पाण्यावर तेलाचा तवंग सोडून डासांच्या अळ्यांना प्राणवायू मिळू न देता त्यांचा नायनाट हा प्रकार छोटय़ा जलाशयात केला जातो. परमॅथ्रिनसारखी द्रव्ये, अन्य रसायने यांचा वापर केला जातोच. त्यामुळे डास आपल्यापासून दूर राहतात. मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डासांना सहन न होणारी तीव्र वासाची द्रव्ये हवेत फवारणे वा त्वचेवर लावणे हाही एक उपाय आहे. मच्छरदाणी, लांब हातापायांचे कपडे हाही उपाय केला जातो.
मात्र आजही गरीब असो वा श्रीमंत, झोपडीत राहणारा असो वा उंच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणाऱा या सर्वांनाच डासांनी नकोसे करून सोडलेले आहे. त्यांच्यामुळे फैलावणारे आजार आज सर्वांनाच सारखे त्रास देत आहेत. नजीकच्या भविष्यात उष्ण कटिबंधातील सर्व माणसांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, हे निश्चित.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*           

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ?*
       लोकसभा

2)  *संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ?*
       राज्यसभा

3)  *राज्यसभेचा सभापती कोण असतो ?*
        उपराष्ट्रपती

4)  *भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ?*
       राष्ट्रपती

5)  *राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?*
       5 वर्ष

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  सुनील आलूरकर
●  अभिषेक संजय कदम
●  विश्वनाथ होले
●  सोनाजी बनकर
●  विक्की खटके
●  विक्रम रिक्कल
●  श्री दासरवार
●  अजय मिसाळे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो. तसंच माणसाचं झालंय.*

*थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला.  ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.* 

              *॥ रामकृष्णहरी ॥*
   🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*दोस्तांनो,*
*साथ सोबत लागते कुणाला।*
*माझेच आभाळ, माझीच धरती ।* *वादळ घेऊन चालतो खांद्यावरती।*
*काल दादासाहेब फाळके पुरस्काराची* *घोषणा झाली.आणि तमाम चित्रपट रसिकांच्या आनंदाला उधाण आले.*
*एकही साधे सब साधे,हे संतवचन काल सत्यात उतरले.*
*जीवनात संघर्ष काय असतो हे समजून घ्यायचे असेल तर मी खात्रीने अमिताभ बच्चन यांचे नाव सांगेन.*
*ज्या महान अभिनय सम्राटाला काल चित्रपट सृष्टी साठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला.*
*मित्रांनो,1942 ला जन्मलेला तरुण 25 व्या वर्षी  काम धंद्याच्या ,चित्रपट* *हिरो बनण्याच्या उद्देशाने मुंबईत येतो.*
*ताडामाडा सारखा साडेसहा फूट वाढलेला ,हडकुळा, लांबट तोंड,कुणालाही न आवडणारा,* *सिनेमात कुणी काम देईना, आवाज ऐकला तरी लोक हुसकावून देत. थोडाफार गर्दीत काम केलं तरी पोट* *भरत नसे.उपासमारीने टेम्पररी डायबेटीस* *हा आजार ऐन तारुण्यात जडला आणि अजूनही* *भयाण अवस्थेत हा आजार तो माणूस आनंदाने संभाळतोय.धीर सोडला* *नाही,एक दिवस वैतागून घराकडे जाताना काम मिळाल्याचा* *निरोप मिळतो.सात हिंदुस्थानी (१९६९) मध्ये*
*सात नायकाबरोबर कष्टाने भूमिका सजवतो.आणि तेथून या माणसाने कधी मागे वळून पाहिलेच* *नाही .अनेक संकटे आली,1983 ला कुली सिनेमात एका घटनेने बच्चन अक्षरशः देवाघरी* *जाऊन परत आला.*
*अजूनही एका असाध्य आजाराला सांभाळून बच्चन रोज नवीन दिवस पाहतो.पण आतून इतका भक्कम* *तयार झाला की अनेक वेळा दवाखान्यात यमराजाला* *त्याने परतवून लावले.सत्तरीतले कजरा रे कजरा रे गाणे बच्चन ला एका नव्या उंचीवर* *घेऊन गेले.कौन बनेगा करोडपती ने तर संपूर्ण भारतीयांच्या* *हृदयात त्याने स्थान मिळविले.आज खर बच्चन सत्ते पे* *सत्ता झाला.77 व्या वर्षी काल दादासाहेब फाळके स्मारकाचे* *देश त्याचा उतराई झाला.दोन पिढ्या रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या* *महानायकाचा इंग्लड मध्ये सर्वप्रथम मेणाचा पुतळा उभारला गेला.*
*हरिवंशराय आणि तेजी बच्चन आज स्वर्गातून म्हणत असतील ,पुत्र देई* *ऐसा गुंडा ,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा।*
 
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*  
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

माणसाने शिस्त आणि प्रेम या दोन गोष्टींना मर्यादितच ठेवायला हवे.कारण त्यांचा उपयोग जास्त प्रमाणात केला तर नात्यात दुरावा किंवा विरोध निर्माण होतो आणि वर्तनात सभ्यतेचा अतिरेक निर्माण होऊन आपण इतरांपेक्षा काहीतरी मुर्खपणा करत आहोत हे इतरांच्या लक्षात येते.म्हणून ह्या दोन गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहूनच जीवन जगायला शिकले पाहिजे.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *अहंकार नसावा.*

एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी  दगडाचा शोध घेत होता.तो रस्त्याने जात असतांना त्याला मोठे दोन  दगड दिसले ,आणि  मुर्तीकाराने ठरविले की या दगडाच्या छान सुबक दोन मुर्त्या तयार कराव्या.
दगडाचे निरीक्षण करून मुर्तीकाराने कशी मूर्ती तयार करावी याबाबत मनात आराखडा तयार केला.आणि दोन्ही दगडाला सांगितले की, मी तुमच्यापासून छान मूर्ती तयार करणार आहे तेव्हा तुम्ही मला साथ द्यावी.छन्नी हातोडा घेऊन मूर्तिकार दगडाला आकार देत असतांना पहिला दगड म्हणाला मला त्रास होतो, माझ्यावर घाव करू नका. तेव्हा मुर्तीकाराने दगडाला समजविले की, मी हळूहळू घाव देणार तू तुझ्यातील कडकपणा कमी कर. थोडा नरम  हो म्हणजे मला घाव घालायला त्रास होणार नाही व तुला पण जास्त त्रास होणार नाही.पहिला  दगड स्वतःतील अहंपणा सोडायला तयार नव्हता.मुर्तीकाराने दुसऱ्या दगडाला  समजविले दुसरा दगडाने स्वतःमधील कठीणपणा कमी करून नरमपणा घेतला व काही दिवसातच अतिउत्तम , सुंदर अशी राधाकृष्णची मूर्ती  मुर्तीकाराने तयार केली.
मूर्तीची स्थापना झाली  तेव्हा बाजूला पडलेला कडक मोठा दगड बघून त्याचा उपयोग लोकांनी  नारळ फोडण्यासाठी केला.
मुर्तीकाराचे ज्या दगडाने ऐकले त्या दगडाची मूर्तीत रूपांतर झाले व  सर्व लोक भक्तिभावाने पूजा करायला लागले. कुंकूम तिलक लावून हारापर्ण करतात, छान वस्त्र परिधान करतात आणि ज्या दगडाने स्वतःचा अहंकार सोडला नाही , मुर्तीकाराचे ऐकले नाही त्या दगडाला  जीवनभर नारळाचे घाव सहन करावे लागते.पूजा करणारे लोक  अंगावर पाय देऊन   राधाकृष्णच्या मूर्तीची  पूजा करायला जातात. त्यावेळी  अहंकारी दगडाला खूप दुःख झाले पण वेळ गेलेली होती.

*तात्पर्यः अहंकारपणाने वागल्यास स्वतःचेच नुकसान होते म्हणून अहंकार अंगी नसावा.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें