रविवार, 29 सितंबर 2019

30 सप्टेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 30/09/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन*
        
💥 ठळक घडामोडी :-
१९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.

💥 जन्म :-
१९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
१९६२ - शान, भारतीय संगीतकार.
१९८०-मार्टिना हिंगीस , लाँनटेनिस खेळाडू

💥 मृत्यू :-
२००१- माजी रेल्वे मंत्री,नागरी हवाई वाहतूक मंत्री ,कांग्रेसचे नेते माधवराव शिवाजीराव शिंदे (सिंधिया) यांचा विमान अपघातात मृत्यू.
१९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *उत्तर प्रदेश-बिहारच्या ३४ जिल्ह्यांत पुराचे थैमान, पूर व पावसाच्या दुर्घटनांत दोन दिवसांत ५४ जणांचा मृत्यू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *विधानसभा 2019 साठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसची 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, भोकर मधून अशोक चव्हाण निवडणूक रिंगणात, जुन्या चेहऱ्यांना परत संधी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात, साडेतीन शक्तिपीठांसह राज्यभरातील देवींच्या मंदिरांना रोषणाई, भाविकांची गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *जम्मू-काश्मीरमधील रामबन येथील बटोट परिसरातील भारतीय सैनिकांनी तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा केला आहे. मात्र या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीला मनाई, कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय, कांदा उत्पादक शेतकरी संतप्त*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोच रवी शास्त्रींची निवड करणारी समिती अडचणीत, कपिल देवसहित त्यांच्या संपूर्ण टीमला बीसीसीआयची नोटीस, पुन्हा एकदा प्रशिक्षक पदाची नियुक्ती होण्याची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *युवा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला सुवर्णपदक, 62 किलो फ्रीस्टाईल फायनलमध्ये दिल्लीच्या अनिताला दाखवले अस्मान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *लोभाचे फळ*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/29.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *दमा म्हणजे नेमके काय ?* 📙

रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.
दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.
दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.
दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.
दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?*
       गुरुशिखर

2)  *माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 केव्हापासून अंमलात आला ?*
       17 ऑक्टोबर 2000

3)  *'साहित्य अकादमी पुरस्कार' कोणत्या वर्षांपासून दिला जातो ?*
       1955

4)  *देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता ?*
       परमवीर चक्र

5)  *देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ पुरस्कार कोणता ?*
       अर्जुन पुरस्कार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  प्रमोद रत्नाळीकर
●  अनुराग वानरे
●  निलेश सुंकेवार
●  सतीश दमकोंडवार
●  पोतन्ना डेबेवार
●  देवन भोयर
●  महेश घुगारे
●  विशाल जारे पाटील
●  मन्मथ लिमशेट्टे
●  संतोष भालके

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आज घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून  जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात*

*पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मधल्या काळात असं काय घडलं ? मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"*

  • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • •
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
      *संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाईल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो,*
*पित्तरपाटा संपला आजपासून नवरात्री चालू होणार,नवस-सायास,* *उपवास,दांडिया,विविध उपक्रम, जल्लोष,खरच किती उत्साह या* *दिवसात राहील.तरुण असो की वयस्कर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर आपल्याला दिसेल.मग मनात* *किंतु न ठेवता निर्भेळ आनंद घ्या.*
*पिरांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर.--–-–---*
*माणसासारख्या माणसांनाही*
*कावळे लाजरे -बुजरे करतात।*
*चांगले पंधरा-पंधरा दिवस*
*कावळे फेस्टिव्हल साजरा करतात.*
*टोच्या मारीत राहणे*
*हा तर कावळ्यांचा पिंड आहे,*
*कावळ्यापेक्षा माणसांलाच*
*काकस्पर्शाचा कंड आहे।*
*मित्रांनो,*
*खरच कावळे घास घेतात का?*
*अजूनही शिकलेली मंडळी सुध्दा एखाद्या विज्ञानवादी माणसाला* *अबोल करतात.*
*आपले संत पिंडदानाविषयी काय म्हणतात ते पहा...*
*तुकाराम महाराज म्हणतात,*
*जित्या नाही अन्न | मेल्यावरी पिंडदान* | *| हे* *तो चाळवाचाळवी ||*
*एकनाथ महाराज म्हणतात,*
" *जिता मायबापा न घालिती अन्न|*
*मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान |।*
*पहा पहा संसारीचा कैसा आचारु|*
*जिता अबोला मा मेल्या उच्चारू |l*
*जित्या मायबापा न करिती नमन |*
*संत कबीर सांगतात ...*
" *जिंदा बापाको रोटी न खिलावे |*
  *मरे बाप पाछातायो... ,*
*मुठभर चावल दाबे धरके कौवा बाप* *बुलय्यो |*
*अनादी दुनया कैसी भजनबिना* *तारीयो ?||"*

*गाडगेबाबा म्हणतात*
*पिंड दान करू नका. आणि ही*
*भटा - बामणांची परंपरा बंद करा !!*
*मृत झालेल्या वाडवडिलांची स्मृति* *जतन करा, त्यानी केलेल्या* *चांगल्या कामाचे अनुकरण* *करा. त्यांचे चांगले विचार* *आत्मसात करा...*
*हाच त्यांचा योग्य स्मृती दिन होऊ* *शकतो!।।* ।.
*पण नाही,*
*कबिरांनी तर थोड्या वेळापूर्वी एका* *मेलेल्या गायीचे उदाहरण दिले,* *अरे आताच मेलेली गाय जर* *खाऊ शकत नाही,तर 100* *वर्षांपूर्वी मेलेली माणस कस  खाऊ* *शकतात.*
*असे असले तरी परंपरेच्या नावाखाली*
*सर्वांची पोट भरतात हे नाकारून चालणार नाही.*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
                   ,   
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *सदाचरण*

फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.

*तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

28 सप्टेंबर 2019

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 28/09/2019 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
जागतिक कर्णबधीर दिन
Green Consumer Day

💥 जन्म :-
◆१९८२- अभिनव बिंद्रा,ओलीम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.
◆१९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
◆१९८२- रणबीर कपूर,अभिनेता.
◆१९४७- शेख हसीना ,बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान.

💥 मृत्यू :-
●२०१२-ब्रजेश मिश्रा ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
●१९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
●१८९५-लुई पाश्चर,फ्रेंच सूक्ष्मशास्त्रज्ञ.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *चांद्रयान 2 चंद्रावर उतरलेल्या ठिकाणाचे फोटो नासाकडून जारी,  चांद्रयानाची हार्ड लॅण्डिंग झाल्याचीही माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी, निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी दाखल नाही*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *पुरग्रस्तांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा पुणेकरांचा आरोप, अनधिकृत बांधकामांमुळे पुण्यात पूरपरिस्थिती, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा, पाहणीदरम्यान नागरिकांचा संताप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *2015च्या तुलनेत 2018 मध्ये मुंबईतील अपघातांमध्ये 22 टक्क्यांनी घट, ब्लूमबर्ग आणि मुंबई ट्राफिक पोलीस यांच्या अहवालातून माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणांमुळे शरद पवारांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं, अनेक कार्यकर्ते ताब्यात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *भारतीय नौदलाचं बळ वाढणार, आयएनएस खंदेरी पाणबुडीचा ताफ्यात समावेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *लता मंगेशकरांच्या स्वरांकीत भावमुद्रांच्या खास पुस्तकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते प्रकाशन, उषा मंगेशकर आणि राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलारांची उपस्थिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
या बुलेटीनची audio clip ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.
https://sharechat.com/post/wnbj8KW
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
               *लता मंगेशकर*
                
  स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज (२८सप्टेंबर) 90वा वाढदिवस. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताची गान कोकिळाअसे ही म्हटले जातेलता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा         
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

                   *गुगल*
माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलचा काल वाढदिवस. इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.
आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. जरी गुगल कंपनीची  ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले. २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस सत्तावीस  सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनी ७ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती.
'गुगल' ही गणिती संज्ञा आहे. एकावर शंभर शून्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणितज्ज्ञाने ही संकल्पना शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव 'गुगल' ठेवण्यात आले. आजकाल गुगल सर्च इंजिन इतके प्रचंड लोकप्रिय झालेले आहे की 'to google' असे क्रियापदच इंग्रजीत तयार झालेले आहे. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे.  १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?*
       ग्रीनलँड

2)  *जर्मनी या देशाची राजधानी कोणती ?*
       बर्लिन

3)  *राष्ट्रध्वजावरील कोणता रंग शांतीचे प्रतीक आहे ?*
        पांढरा

4)  *राष्ट्रध्वजावरील अशोकचक्रात किती आरे आहेत ?*
        24 आरे

5)  *भारतीय चलनी नोटांवर किती भाषांचा उल्लेख आहे ?*
       15

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे
●  प्रशांत राऊतखेडकर
●  सचिन बावणे
●  साईनाथ कानगुलवार

*29 सप्टेंबर 2019 रविवार*

●  प्रथमेश नागोराव येवतीकर
●  राजेश सामला
●  संदेश जाधव
●  महेश राखेवार
●  गणेश पेटेकर
●  मारोती वाघमारे
●  अजय मिसाळे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.*

*हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!*

    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
      *श्री.  संजय नलावडे, मुंबई*
    *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 
*मित्रांनो,*
*एक फिल्मी गीत ऐकलं की डोक्यात सणक निघायची। वाटायचं एव्हढा* *अलौकिक जन्म* *मिळाला तो काय रडायला* *मिळाला का?*
*ते अस,*
" *दुनिया बनाने वाले ,काहेको दुनिया बनाई। तुने काहेको दुनिया बनाई।"*
*मग लक्षात आलं।की अरे हा-- तुम्ही हारलात  किंवा अपयशी झालात तर* *जवळचे सुद्धा लांब रहाण्याचा प्रयत्न करतात.जवळचा* *असूनही* *चुलत-चुलत वगैरे सांगतात.*
*पण या उलट तुम्ही कुठल्याही क्षेत्रात* *उत्तुंग शिखर गाठा. मग* *कमाल बघा---अहो नाती नसतांना* *_सुध्दा संबंध जोडला_* *जातो,आहो माझा खूप* *क्लोज नातेवाईक आहे,मित्र* *आहे असं सांगितलं* *जातं.*
*दुनियाच अशी आहे दोस्तो,तुम्ही  गुणवान असलात की सगळे मूग* *गिळून बसणार। अन थोडका चुकीचं घडूद्या किंवा व्यंग सापडुदया की मुका सुद्धा* *बोलायला लागतो.*
*म्हणून जगून घ्या, जग दोनही बाजू तपासत आणि त्यांच्या प्रमाणे विचार* *करत*
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *खरे अपयश*

एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"
यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"
रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"
यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव
*(Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"
हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"
यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या  चुकीच्या निर्णयांमुळे !!"

*तात्पर्य*
*आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~