✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 22 डिसेंबर 2022
💠 वार - गुरुवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥घडामोडी
● १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली
● १९५३ - राज्य पुनर्रचनेसाठी भारतात उच्चाधिकार समिती स्थापन. यातून पुढे भाषावार प्रांतरचना झाली.
💥जन्म
● १६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू. खालसा संस्थापक, शिखांचे १० वे गुरू
● १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
💥मृत्यू
● १९४५ - श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट
● १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष
● १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
● २००२ - दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *GDP मध्ये वस्त्रोद्योगाचं सात टक्के योगदान, मंत्री दर्शना जरदोश यांची माहिती, या क्षेत्रात साडेचार कोटी रोजगार निर्माण होण्याचा अंदाज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *भारतात ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट BF.7 ची एन्ट्री, ज्यांना कोरोनाची लस मिळाली आहे. त्यांनाही या व्हेरियंटची लागण होण्याचा धोका अधिक आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *मणिपूरमध्ये विद्यार्थिनींच्या शाळेची बस पलटली, दहा जणांचा मृत्यू तर 40हून अधिक जखमी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *अखेर भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस, नागपुरात 12 मोर्चे निघणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *कानडी सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचं 'चलो कोल्हापूर', 26 डिसेंबरला कोल्हापुरात धरणे आंदोलन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*माळेगाव यात्रा*
माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणाऱ्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे.
माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.
माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.
भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.
माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संकलन
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*प्रयत्नांची पाऊले पडले की, यशाचे ठिकाण गाठायला वेळ लागत नाही.*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) सर्वाधिक घनदाट जंगले कोणत्या देशात आहेत ?
२) भारतातील पहिल्या सर्कसचे नाव काय होते ?
३) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ मध्ये अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा किती फरकाने पराभव केला ?
४) 'मिठागराचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?
५) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते ?
*उत्तरे :-* १) रशिया २) ग्रँड इंडियन सर्कस ३) ४ - २ ने ४) रायगड ५) टोकियो, जपान
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 अमोल पाटील
👤 अजय गवळी
👤 दिलीप डोम्पलवार
👤 अनिल यादव
👤 सौ. राजश्री भुसेवार, नांदेड
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*'पक्व' फळापरी 'मी'पण ज्यांचे सहजपणाने गळाले हो, जीवन त्यांना कळले हो' असे कवि बा.भ.बोरकरांनी म्हटले आहे. अर्थात, स्वत:चाच त्याग करणे , स्वत:चा विसर पडू देणे ही बाब भल्याभल्यांना जमलेली नाही. ज्यांना हे जमले त्या संत ज्ञानेश्वरांनी 'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' म्हणत संपूर्ण विश्वासाठीच पसायदान मागितले. स्वत:ला विसरून भक्ती करणारे तुकाराम संतश्रेष्ठ झाले. याच यादीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य मानतुंग. राजेच्छा अव्हेरल्याची शिक्षा म्हणून त्यांना साखळदंडांनी बांधण्यात आले आणि बंदिस्त खोलीत ढकलण्यात आले. जैनांचे प्रथम तिर्थकर आदिनाथांचे स्मरण त्यांनी या बंदिवासात केले. त्यांच्या मुखातून एकाहून एक सुंदर अशा ४८ गाथा आपोआप बाहेर पडल्या. आश्चर्य म्हणजे प्रत्येक गाथेबरोबर एकेक बेडी गळून पडली. ४८ गाथा पूर्ण होताच सर्व ४८ बेड्याही गळून पडल्या आणि ते मुक्त झाले, अशी आख्यायिका आहे.*
*सर्व मानवजातीत लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षीत असे मानवनिर्मित भेद आहेत. या सर्वातील धागा म्हणजे प्रत्येकजण कशाला तरी बांधला गेला आहे. श्रीमंत श्रीमंतीला, गरीब गरीबीला. आहे त्या स्थितीतून बाहेर पडण्याची धडपड प्रत्येकजण करतो आहे. सुटकेचे मार्ग अनेक आहेत. मात्र ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि मानतुंगाचार्य यांनी अवलंबलेले मार्ग सर्वश्रेष्ठ आहेत आणि कालातीतही. स्वतः दु:ख भोगून त्यांनी जगाला सुखाचा मार्ग दाखविला आहे. स्वतः ला बुद्धिहीन संबोधून मानतुंगाचार्यांनी स्वत:कडे लहानपण घेतले. या प्रकारची मनोवस्था स्वत:च्या विकासासाठी खूप महत्त्वाची ठरते.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
चंदन आणि संत यामध्ये खूप काही साम्य आहे.ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात राहिलो तर चंदनाचा सुगंध आपल्या अंगाभोवती असल्याचे किंवा अंगाला येत असल्याचे जाणवते व आपणच चंदन झालो आहोत असे वाटायला लागते.चंदन जेव्हा सहानेवर पाणी टाकून घासायला लागतो तेव्हा ते स्वत: झिजायला लागते आणि त्याचा गंध सर्वत्र दरवळायला लागते. चंदनाचा गुण जसा आहे तसाच संतांचाही आहे.संतांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्या जीवनातले सारे दुर्गूण नष्ट होण्यास मदत होते तर त्यांचा सहवास आपल्याला चंदनासारखा नेहमी हवासा वाटायला लागतो.संत हे स्वत: जगाच्या कल्याणासाठी अविरत आपला देह झिजवतात ते स्वत:साठी जगत नाहीत तर आपल्या ईश्वराप्रती प्रेम निर्माण व्हावे,आपण सन्मार्गाला लागावे,आपण मानवतेच्या दृष्टीने आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म घडावे.आपल्यातला खरा माणूस जागा व्हावा.आपला जन्म इतरांच्या काही चांगल्या कारणी लागावा यासाठी नेहमी सांगत असतात झिजवत असतात.चंदन आणि संत हे दोघेही तितकेच मानवाच्या जीवनात महत्वाचे आहेत.म्हणून चंदन आणि संत यांच्यात साम्य आहे आणि यांचा सहवास नित्य राहिला तर नक्कीच आपले कल्याण होईल.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*रुपयांची गोष्ट*
एका शेठजींचा मुलगा, अज्जू खूप आळशी होता. घरात गडगंज संपत्ती आणि एकुलता एक म्हणून लाडका. काम त्याला कधी करावे लागलेच नाही. असे करत करत तो एकवीस वर्षांचा झाला.
शेठजींना लागली काळजी. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? दुसर्याच दिवशी त्यांनी मुलाला बोलावले बाहेर पडायला सांगितले. पैसा कमवून आणलं तर जेवायला मिळेल ही अट ठेवली.
अज्जूला काहीच कळेना. त्याने बहिणीकडून एक रूपया मागितला. आणि दिला जाऊन शेठजींना. पण तो त्यांनी विहीरीत फेकला. दुसर्या दिवशी पुन्हा हीच अट ठेवली. आता अज्जू आईकडे गेला. तोही पैसा वडिलांनी फेकला. आता मात्र आला तिसरा दिवस. अज्जू दिवसभर काम शोधत फिरला. पण काम काही मिळेना. हताश होऊन गेला. काहीच सुचेना. पोटात लागले कावळे कोकलायला. शेवटी स्टेशनवर एक माणूस हमालाची वाट पहात असलेला दिसला.
हे पाहताक्षणीच अज्जू धावत सुटला आणि बॅग त्याने डोक्यावर उचलून त्याच्या घरी पोहचवली. एवढे करेपर्यंत घामाघुम झाला. पण त्या माणसाने अज्जूच्या हातावर टेकवले फक्त आठ आणे. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवताच त्यांनी ते विहिरीत फेकले. वडिलांच्या या कृतीने अज्जू संतापला. म्हणाला, बाबा तुम्हाला जाणीव नाही की ते आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली. शेठजी हसत हसत म्हणाले, हेच मला हवे होते. आज तुला खर्या कष्टाची किंमत कळली.
तात्पर्य: स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई असते. त्याची किंमत ही कष्ट घेतले की मगच कळते.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें