शनिवार, 4 मार्च 2023

19/12/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 19/12/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*स्वातंत्र्य दिन - झांझिबार*
*गोवा मुक्ती दिन*

💥 ठळक घडामोडी :-
● १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला. गोवा मुक्ती दिन.
● २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण.

💥 जन्म :-
● १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू.
● १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी.
● १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
● १९५३ - रॉबर्ट अ‍ँड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता.
● १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
● २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *गावोगावच्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, ७१३५ ग्रामपंचायतींसाठी ७४ टक्के मतदान, 20 डिसेंबरला होणार मतमोजणी, निकालाची उत्सुकता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *महाराष्ट्र टाइम्स' ऑनलाईनचे संपादक अभिजीत कांबळे यांना 'मुकुंदराव पाटील' पुरस्कार प्रदान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *लोकायुक्त कायद्याचं बिल मांडणार, भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल : देवेंद्र फडणवीस*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भारताच्या सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा किताब, 21 वर्षानंतर मिळालं हा बहुमान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, तर तीन आठवड्याचं अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *दहावी प्रथम श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळतात 10 हजार रुपये, बिहारमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास योजना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *चितगाव कसोटीतभारताने  बांगलादेशचा 188 धावांनी केला पराभव, भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन गुणतालिकेत बंपर फायदा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••

*Poem- The truth👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/LTZJ6VTn2jM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *शिक्षकांना स्वातंत्र्य हवं*

http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

" एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.
गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले.
अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.
आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत. "
त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग .
संदर्भ : The Habit of Winning

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) १४ वर्षाखालील मुलामुलींना सिगारेट विकत घेण्यावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ?
२) 'विदर्भाचे प्रवेशद्वार' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?
३) संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 'चॅम्पियन ऑफ द अर्थ २०२२' या सर्वोच्च पर्यावरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
४) महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती ?
५) महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा कोणता ?

*उत्तरे :-* १) न्युझीलंड   २) बुलढाणा   ३) डॉ. पूर्णिमा देवी बर्मन, भारत   ४) पंढरपूर   ५) सोलापूर 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    
   
👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर
👤 शंकर जाजेवार, येताळा
👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
.    *"गेले द्यायचे राहून,*
      *तुझे नक्षत्रांचे देणे !*
      *माझ्यापास आता कळ्या,*
      *थोडी  ओली पाने !!"*
*पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.*
*बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.*
       
        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
      *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

 तुमच्या जीवनात दुःख असो अथवा नसो पण तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याच्या छटांना कमी होऊ देऊ नका. कारण तुमच्या एकट्याच्या स्मित हास्याच्या छटाने बाकीच्या लोकांच्या जीवनातले दुःख दूर होण्यास मदत होईल. काही वेळ का होईना तो तुमच्याकडे पाहून त्याच्या जीवनात असणारे दुःख नक्कीच विसरेल. हा तुम्ही दिलेला आनंद तो त्याच्या जीवनात कधीच विसरणार नाही. नाहीतर तुम्हीही रडत राहिले तर त्यांच्या नि तुमच्या जीवनात दुःखच पहायला मिळेल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३
🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *कर्म पूजा*

एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . "
रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय  करणार  ? "
त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . "
परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " 
तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.

*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.*
*'कर्मे ईशू भजावा.'*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें