सोमवार, 12 सितंबर 2022

13/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 13/09/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆२००८- दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे  १३० जण जखमी झाले.
◆२००३ - ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
● १९४८- *ऑपरेशन पोलो*- विलीनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबाद वर चढाई केली.

💥 जन्म :-
●१९६९- शेन वार्न ,ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर
●१९८० - वीरेन रास्किन्हा, भारतीय हॉकी खेळाडू.

💥 मृत्यू :-
●२०१२- रंगनाथ मिश्रा,भारताचे २१ वे सरन्यायाधीश.
●१९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.
●१९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'; राज्य सरकारचा नवा उपक्रम, मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तर ते तीन दिवसांत बुजवले जातील, एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनावरं पॉझिटिव्ह, नाशिक जिल्हा परिषदेकडून 1 लाखाहून अधिक लम्पी स्कीन लसीं उपलब्ध*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *23 सप्टेंबर रोजी आष्टी - नगर रेल्वेचा लोकार्पण सोहळा, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री उपस्थित राहणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस बनण्याच्या मार्गावर आहे', असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *स्पेनच्या कार्लोस अल्कारेजची कमाल, अवघ्या 19 व्या वर्षी युएस ओपनच्या जेतेपदाला गवसणी!*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराह-हर्षलचं पुनरागमन, पंतसह कार्तिकही संघात*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 * 🎯 🚀  *गौरव - गाथा* 🎯 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*
भाग - पाचवा

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई दगडाबाई शेळके यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावे

Video खालील लिंकवर उपलब्ध.

https://youtu.be/Spt57K08xQo

~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢*
 विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Subscribe my Channel*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *चक्रीवादळे का येतात ?* 📙

उन्हाळ्याचे दिवस चालू असतात. भर दुपारी उन्हाचा कडाका अंगाची लाहीलाही करत असतो. जमीन अगदी चटके बसतील, अशी तापलेली व हवा अजिबात पडलेली. झाडाचे तर पानही हलत नाही आणि बघता बघता लांबवर कुठेतरी जमिनीवरची पडलेली पाने वाऱ्याने गोलगोल भिरभिरताना दिसू लागतात. बघता बघता तीच पाने उंचावर उचलली जातात. त्यांच्याबरोबरच धुळीचा लोटही उफाळताना, गरगरताना दिसतो. काही सेकंदातच वाऱ्याची वावटळ आपल्यालाही घेरून टाकते. हेलकावणारी झाडे, वाऱ्याचा सोसाट्याचा आवाज, नाकातोंडात जाणारी धूळमाती यांमुळे सारेच कसे भीषण वाटत असते. ही असते चक्रीवादळाची सुरुवात.
चक्रीवादळ म्हणजे वातावरणातील एखाद्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या काही मैलांच्या परिसरापेक्षा कमी अथवा जास्त झाल्याने दिसून येणारे वातावरणातील बदल. हे बदल फार मोठ्या वेगाने घडतात, त्यात वाऱ्याची फार मोठी ताकद सामावलेली असते. त्या विवक्षित ठिकाणी हवेचा दाब कमी होतो वाह वाढतो. तो चक्रीवादळाचा केंद्रबिंदूच असतो. दाब कमी झाल्यास तेथील हवेची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून वातावरणातील हवेत एक प्रकारचे भोवरे तयार होतात. याउलट दाब वाढला असल्यास त्या पट्टय़ातील हवा दाबामुळे केंद्राकडे खाली दाबली जात असते. याही क्रियेमध्ये वारे वाहणे वेगाने सुरू होते, पण त्यांची तीव्रता खूपच कमी असते. बहुतेक चक्रीवादळांचा केंद्रबिंदू समुद्रावरच सुरू होतो. कसलाही अडथळा वाटेत नसल्याने हे वादळ स्वतःभोवती फिरत वेगाने घोंगावत इकडे तिकडे हेलकावत राहते. पण समुद्री वार्‍यांमुळे हलके हलके जमिनीकडे येऊ लागते. सुरुवातीला जमिनीवरचा मोठा पट्टा त्यामुळे त्याच्या तडाख्यात सापडतो, पण त्याचबरोबर त्याचा वेग हळूहळू कमी होत पसरत जातो व काही काळाने ते संपूनही जाते. समुद्रपातळीपेक्षा जमिनीची वाढलेली उंची, वाटेत येणारे अडथळे व जमिनीवरील बरेचसे स्थिर तापमान यांमुळे या चक्रीवादळांचा वेग मंदावतो.
चक्रीवादळ बहुधा स्वतःबरोबर सोसाटयाचा पाऊसही आणते. खूप मोठ्या आकारमानात हे पसरलेले असल्याने (चारशे ते सहाशे किलोमीटर) या सर्व भागातील निरनिराळे ढग यात ओढले गेलेले असतात. या ढगांचे एकत्रीकरण होताच त्यातील बाष्पही एकत्र येऊन त्यापासून पाऊस पडेल, असे मोठे बाष्पकण तयार होतात. सुरुवातीला प्रचंड वेगाने वाहणारे वारे, धुळीचे वातावरण व नंतरच्या पावसाचे तडाखे ही चक्रीवादळाची खासियतच म्हणायला हवी. चक्रीवादळांचा वेग जमिनीवर पोहोचल्यावर अनेकदा ताशी साठ ते ऐंशी किलोमीटर इतका असतो. समुद्रावरील वेग मोजण्याची पद्धत नाही, पण तो कदाचित यापेक्षाही जास्त असू शकतो.
समुद्रावरील बोटी या वादळात सापडल्यास अनेकदा त्यांचे गंभीर नुकसान होण्याइतका त्यांना तडाखा बसलेला असतो. वादळाचा पट्टा ओलांडण्यास त्यांना एक ते चार दिवस लागत असल्याने तोवर राक्षसी लाटांचे तांडव असहाय्यपणे बघणे एवढेच त्यांच्या हातात असते. अनेकदा या लाटांची उंची तीस ते पस्तीस फुटांपर्यंतही असू शकते. ही वादळे सागरी अपघात व दुर्घटना यांचे एक मुख्य कारण असल्याने या वादळी टापूंची सतत माहिती घेऊन त्याप्रमाणे मार्ग आखणे, बदलणे बोटीच्या कप्तानाने कामच राहते. किनाऱ्यावर जेव्हा ही वादळे येतात, तेव्हा उंच झाडे उन्मळून पडणे, सागरी लाटा खोलवर घुसून त्यामुळे नुकसान होणे, घरांचे पत्रे उडणे या गोष्टी होतात. 
चक्रीवादळांची सूचना हल्ली उपग्रहांमुळे खूपच लवकर मिळू शकते. उपग्रहांमधून या सर्व वादळांचा नेमका प्रवास, हवेतील घडत जाणारे बदल यांचे फोटो मिळतात. या खेरीच एक मोठी विलक्षण पद्धत चक्रीवादळांच्या अभ्यासासाठी गेली २० वर्षे वापरली जात आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीत लष्करी जेट विमानातून संशोधक या चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूकडेच प्रवास सुरू करतात. थेट केंद्रबिंदूचा वेध घेऊन विमान वर न्यावयाचे व त्या दरम्यान विविध शास्त्रीय निरीक्षणे करायची, अशी ही पद्धत आहे. निष्णात वैमानिक व जिवावर उदार झालेले संशोधक यांचा चमू हे काम करतो. या प्रकारात विमान पार वेडेवाकडे होऊन दोन तीन हजार फूट लांबवर एखाद्या खेळण्याप्रमाणे भिरकावलेही गेले आहे. तरीही सुखरूप उतरल्यावर नवीन चक्रीवादळाची सूचना कधी मिळते, इकडेच या चमूचे लक्ष असते.
धाडस व जिज्ञासा यांचा संगम काय करू शकतो, याचे हे एक थरारक उदाहरण आहे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) भारताचे गृहमंत्री कोण आहेत ?

२) ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत ?

३) पाकिस्तानातील सर्वात मोठी नदी कोणती ?

४) पादत्राणांच्या निर्मितीत भारत हा जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

५) पहिले ई - पंचायत सुरू करणारे राज्य कोणते ?

*उत्तरे :-* १) अमित शहा   २) लिज ट्रस   ३) सिंधू नदी   ४) पहिला   ५) महाराष्ट्र 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  योगेश वाघ
●  दिपश्री वाणी
●  कबीरदास गंगासागरे
●  नवीन रेड्डी
●  हरीश दादा बल्लाल

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*कळायला लागल्यापासून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने अनेक गोष्टी कराव्या लागतात. वयाचा काही काळ त्यांना संस्कार, संस्कृती या नावाने ओळखले जाते. तर एका विशिष्ट वयानंतर त्याला 'कर्तव्य' ही संज्ञा प्राप्त होते. मग कुटुंबात, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी केले जाणारे काम हेही कर्तव्यात मोडते. 'कामात देव शोधा' हे जीवनाचे खरे तत्वज्ञान मानले पाहिजे. "कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो।" हे ज्याला कळले, तोच पुढे जातो.*

*कामाशी साधली जाणारी एकरूपता, त्यातून दिसणारी तादात्म्यता हाही 'उपासना' मार्गच आहे.* 
         *जो करी कर्म अहेतु निरंतर,*
         *देव तयास मिळो न मिळो रे।*  
*यातून कवीला जे सांगायच आहे, त्याचे चिंतन करूया. त्यासाठी 'मोहाच्या फुलबागा' दूर सारायला हव्यात. त्यासाठी मनाची अवस्था कोती असून चालणार नाही. आकाशाएवढे मन झाले, तरच नव्या पिढीसमोर आदर्श उभे राहतील.  जन्मलेल्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या वेदनेला सामोरे जावे लागते. कुणीही त्यातून सुटत नाही. हे टाळून पुढे जाऊया, मनाचा विकास साधूया....*

   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
       *श्री. संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! !  *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
__    प्राणपक्षी    __

देह तिथे प्राणपक्षी
करी  निरंतर  वास
जाता सोडून  घरटे
थांबे जीवन प्रवास 
     प्रती क्षणी साक्षीदार 
     वास्तवाचे न्यायालय
     सुख दुःखाचे मौलिक 
     होय सर्वोच्च आलय
मृत निसर्ग ब्रम्हांडी
आत्मा अमृत अमोल 
हाती येईना विज्ञाना
सर्व युक्तिशक्ती फोल
     गूढ अदृश्य तो आत्मा
     नाही कळला देवाला
     श्रेय त्यालाच जीवनी
     गात्र पोकळ नावाला
कायारुपी मंदिरात 
आत्मा गर्भित ईश्वर 
योनी चौ-याऐंशी लक्ष 
फिरे जीव दाताश्वर 
     जल बुडबुड्यापरी
     वसे देहाच्या फुग्यात 
     अकस्मात तो उडता
     धड जाते थडग्यात 
रंग रूप ना आकार
परि  अद्वैत  मालक
जन्म मृत्यूचे साधन
होय सृष्टीचा चालक 

पांडुरंग शंकरराव आडबलवाड 
( माध्यमिक शिक्षक)
हु. पानसरे हायस्कूल धर्माबाद.जि.नांदेड 
मो. नं. ९१५८५५१९७५
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        आपल्यामध्ये कमी असलेली बाजू इतरांसमोर कधीही मांडू नका कारण हेच लोक तुमच्यातल्या कमी असलेल्या बाजूचा फायदा उचलून तुम्हाला अजून कमकुवत करायला पाहतात.त्यामुळे आपण अधिक कमकुवत बनत जातो.त्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे याचा शोध घेऊन आपली कमी असलेली बाजू अधिक भक्कम कशी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवे आणि तेही सातत्याने.मग तेच लोक आपला फायदा घेत होते आणि हसत होते आता त्यांना फायदा घेण्याची,हसण्याची संधी मिळणार नाही हे निश्चित.

© व्यंकटेश काटकर,नांदेड
📲 ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
.        *आयुष्यभराची प्रतिष्ठा*

महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी 
वाद घालण्यास सुरुवात केली.
गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म 
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने 
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.
ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
*रुक्मिणीने विचारले..*
*कोणते पाप.?*
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.
*रुक्मिणीने विचारले.*
*मग कर्णाचे काय.?*
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला 
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.

*तात्पर्य :-*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!
*चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें