रविवार, 11 सितंबर 2022

10/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 🎇 दि. 12/09/2022 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆१९९८- डॉ जयंत नारळीकर यांना 'पुण्यभूषण'पुरस्कार प्रदान.
◆ २००५-हॉंगकॉंग मधील disney Land सुरू झाले.
◆२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
◆ १९४८-भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत घुसले.

💥 जन्म :-
●१५७५ - हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
●१९१३ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
● १९१२- फिरोज गांधी, इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी.

💥 मृत्यू :-
● १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
●१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
● १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
● १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *औरंगाबादमध्ये शिक्षकांचा महामोर्चा, भाजप आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात शिक्षक आक्रमक, भत्ते बंद करण्याच्या बंब यांच्या मागणीचा विरोध*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *पुढचे पाच दिवस कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर मराठवाड्यातही पावसाचा अंदाज, राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरुच*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात, महागाईचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर, रोजगारही कमी झाले, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *विठ्ठल मंदिर सरकारमुक्त करण्यासाठी लढा सुरु होणार, डॉ. सुब्रमण्यम स्वामी 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार याचिका*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *अमेरिकेत 25 टक्के स्टार्टअप्सचे बॉस भारतीय, 2028 मध्ये असेल चीनपेक्षा अधिक कार्यक्षम लोकांची संख्या: निर्मला सीतारामन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचं निधन, मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात घेतला अखेरचा श्वास*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *श्रीलंकेनं पाकिस्तानचा 23 धावांनी उडवला धुव्वा; आशिया चषकावर सहाव्यांदा कोरलं नाव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
 * 🎯 🚀  *गौरव - गाथा* 🎯 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम

*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*
भाग - चौथा

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊराव पाटील मतसागर यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावे

Video खालील लिंकवर उपलब्ध.

https://youtu.be/D3EDMTMBjCE

~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢*
 विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*Subscribe my Channel*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *एकच ध्यास ; वाचन विकास*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  📙 *गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ?* 📙

गुरुत्वाकर्षण सर्वत्र असते. गुरुत्वाकर्षणाची ताकद वस्तूमानाप्रमाणे बदलत जाते, पण प्रत्येक गोष्ट स्वतःचे गुरुत्वाकर्षण राखून असते. त्याचा प्रभाव कदाचित लक्षात येईल, जाणवेल किंवा नाही, ही गोष्ट वेगळी. व्यवहारत: प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून असते, हे विधान समजावुन देणे अशक्य आहे. पण जरा वेगळ्या पद्धतीने हे पटू शकते.
चंद्रावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे म्हणून तो तिच्या कक्षेत फिरतो, तर पृथ्वीवर सूर्याचे गुरुत्वाकर्षण प्रभाव ठेवून आहे. सूर्य आपल्या सर्व ग्रहांसह आकाशगंगेत आहे; कारण आकाशगंगेतील सुमारे लाखभर तारे एकमेकांवर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव राखून आहेत. यात आपल्याला गुरुत्वाकर्षण जाणवते, ते फक्त पृथ्वीचे. याचा शोध न्यूटन यांनी लावला, हे ज्ञात आहेच. १६६५ साली वयाच्या केवळ २३ व्या वर्षी झाडाखाली बसलेले असताना सफरचंद खाली का पडते, या विचारातून गुरुत्वाकर्षणाबद्दलचा विचार त्यांनी पुढे मांडला. चालता चालता पाय घसरला, तर आपला तोल जातो. खुर्ची एका मर्यादेपलीकडे कलंडली, तर पडते. याचे कारण म्हणजे प्रत्येक वस्तूचा गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेला गुरुत्वमध्य एका मर्यादेपलीकडे ढळतो आहे, हेच आहे; कारण जणू काही त्या वस्तूचे वजन त्या बिंदूतच एकवटलेले असते. एखाद्या वस्तूच्या उंचीतील ओळंबा जेव्हा तिच्या पायाबाहेर जातो, तेव्हा हे घडते. आकाशगंगाच काय, पण विश्वातील अनेक वस्तू गुरुत्वाकर्षणामुळेच टिकून आहेत. ही प्रत्येक गोष्टीची मध्याकडे ओढ नसती, तर ज्या वस्तूमानाने, कणांनी प्रत्येक ग्रह, तारे बनले आहेत, ते वस्तुमान एकत्रच राहिले नसते. पृथ्वी विलक्षण वेगाने स्वतःभोवती फिरते, पण एवढे अवाढव्य समुद्राचे पाणी मात्र स्वतःच्या जागीच असते. इतकी उंच डोंगरशिखरे स्थिरच राहतात. पृथ्वीचे वातावरणही तिच्या वेगानेच फिरत राहते. याचेच कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण.
वस्तुमान व आकारमानाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाची ताकद बदलते, हे तर प्रत्यक्षच सिद्ध झाले आहे. चंद्रावर गेलेल्यांचे वजन पृथ्वीवरच्यापेक्षा जेमतेम एकषष्ठांशच भरले होते. याउलट, पृथ्वीपेक्षा मोठ्या ग्रहावर जर यदाकदाचित माणूस पोहोचला, तर त्याचे वजन कितीतरी जास्त भरेल. ग्रहाच्या आकारमानाप्रमाणे तेथील वस्तूंचे वजन बदलेल.
अवकाशात केल्यावर गुरुत्वाकर्षणरहीत अवस्थेत आपण असतो, असे अनेक वेळा म्हटले जाते. पृथ्वीभोवती कक्षेत फिरणार्‍या कोणत्याही वस्तूच्या बाबतीत ते खरे आहे. ज्याप्रमाणे उंचावरून पृथ्वीकडे झेपावतानासुद्धा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण जाणवेनासे होते, वर वजनरहित अवस्था आहे, असे वाटत राहते, तशीच ही थोडीफार जाणीव असते. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणता येईल. मायक्रोग्रॅव्हिटीत दैनंदिन व्यवहार किती कठीण असतात, ते अंतराळयानात वावरणाऱ्या अनेकांनी वर्णन केलेले आहेच. अन्न गिळणे, अंघोळ करणे, तोल राखणे, पाय जमिनीवर ठेवणे हेसुद्धा अंतराळात वावरताना अत्यंत कटकटीचे ठरते. अंघोळीसाठी विशिष्ट सूट घालून त्यातून पाणी शोषून घ्यावे लागते, तर अन्न पेस्टच्या स्वरुपात तोंडात कसेबसे गिळावे लागले. पाय तर जमिनीवर कधीच ठरत नाहीत. आणि हे सारे सांभाळत विविध कामे व प्रयोग पार पाडायचे असतातच.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*If you act to be happy, you will be happy.*

*(जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) महाराष्ट्र राज्याचे मुख्य वन्यजीव सरंक्षक कोण आहेत ?

२) पोर्तुगालमध्ये भारतीय पर्यटक महिलेचा उपचाराअभावी मृत्यू होताच तेथील राजीनामा देणाऱ्या आरोग्य मंत्र्याचे नाव काय ?

३) महाराष्ट्रातून 'राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२' मिळविणारे शिक्षक किती व कोणते ?

४) जगात 'मधुमेहची राजधानी' असे कोणत्या देशाला ओळखले जात आहे ?

५) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो ?

*उत्तरे :-* १) सुनील लिमये   २) डॉ. मार्टा टेमिडो   ३) तीन - सोमनाथ वाळके ( बीड ), शशिकांत कुलथे ( बीड ), कविता संघवी ( विलेपार्ले )   ४) भारत   ५) १६ जानेवारी 
        
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  शिवकन्या शशी
●  श्रीपाद चंद्रकांत कुलकर्णी
●  स्वप्नील पुलकंठवार
●  विकास पाटील जाधव
●  साईनाथ बोधूलवार
●  श्याम कांबळे
●  पुंडलिक बिरगले
●  शिवा शिवशेट्टी 
●  साहिल सुगुरवाड
●  केतन जोशी

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.*

*भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.*

              *॥ रामकृष्णहरी ॥*
    🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
          *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  
ज्यांच्याकडे धन,संपत्ती,ऐश्वर्य,नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत,तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही,त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,रक्ताच्या नात्याबरोबरच इतरांसोबत माणुसकीची नाती ही जपतो, इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो, वेळप्रसंगी मदतीचा हातही पुढे करतो आणि त्याला कशाचाही गर्व नाही अशी व्यक्ती या जगात फार श्रीमंत आहे आणि भाग्यवानदेखील आहे.

©व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃   
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *आचार्य विनोबा भावे*

भूदान चळवळीच्‍या काळातील ही गोष्‍ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्‍यांची पदयात्रा सुरु होती. आपल्‍या काही शिष्‍यांसह विनोबाजी मीराजींच्‍या आश्रमात थांबले होते. अल्‍पशा विश्रांतीनंतर त्‍यांची पदयात्रा पुन्‍हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्‍हती. त्‍यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्‍यामुळे त्‍यांना खुर्चीत बसवून नेण्‍यात येत होते. मध्‍ये मध्‍ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्‍हा एक शिष्‍य त्‍यांच्‍याजवळ येऊन म्‍हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्‍हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्‍ही काय करत होता असे त्‍या व्‍यक्तीने विचारले. विनोबाजी म्‍हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्‍ट आली.
              जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध एखादी गोष्‍ट आली जेव्‍हा आपल्‍या मनाविरूद्ध गोष्‍ट घडली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्‍हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्‍यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''

*तात्‍पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्‍याला योग्‍य दिशा देते.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें