शुक्रवार, 30 सितंबर 2022

01/10/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 01/10/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन*
*आंतरराष्ट्रीयवृद्ध व्यक्ती दिन*
*आंतरराष्ट्रीय संगीत दिन*

💥 ठळक घडामोडी :-
◆१८३७-भारतातील पाहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
◆१९५८ - नासाची स्थापना.

💥 जन्म :-
◆१९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.
◆१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.

💥 मृत्यू :-
◆१९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ, केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नाशिक महापालिकेतील गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी आजपासून सेवेत*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'गोष्ट एका पैठणी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अग्निपथ योजनेअंतर्गत 100 पदांसाठी सुमारे अडीच लाख महिलांनी लष्करी पोलिसांच्या (सीएमपी) सैन्य दलात भरतीसाठी नोंदणी केली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/9mamp5qoB9o

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *दृष्टी तशी सृष्टी*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 📙

मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.
आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.
विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे :
डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)
पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)

*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) २०२० चा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ?

२) अलीकडेच मशिदीत पाऊल ठेवणारे किंवा मदरशात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलणारे पहिले संघप्रमुख कोण ठरले आहेत ?

३) आंतररष्ट्रीय व्याघ्रदिन केव्हा साजरा केला जातो ?

४) कठीण कवचाची फळांची नावे सांगा.

५) भारतात पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे ?

*उत्तरे :-* १) आशा पारेख ( ७९ ), प्रसिध्द अभिनेत्री   २) मोहन भागवत, संघप्रमुख, रा. स्व. संघ   ३) २९ जुलै   ४) नारळ, अक्रोड, कवठ, बदाम इत्यादी   ५) मुंबई ते अहमदाबाद

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  डॉ. सौ.सारीका शिंदे, संभाजीनगर.
(श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या)
●  अर्जुन वाकोरे
●  विशाल मस्के
●  निलेश पंतमवार
●  व्यंकट रेड्डी मुडेले
●  गोविंदराव इपकलवार
●  आनंद पेंडकर
●  व्यंकटेश काटकर, विचारवेध
●  गजानन काळे
●  सुभाष टेकाळे
●  श्रीकांत भोसके
●  माधव शिंदे
●  साईनाथ पलीकोंडावार

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील  दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया  आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.*

*बरेचदा आपल्या पुढाकारातून  व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात  पण त्याकरिता मुखवटे उतरवून  माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....*
                
        *" कुछ इस तरह मैने*
       *जिंदगी को आसान कर दिया,*
          *किसी से मांग ली माफी,*
       *किसी को माफ कर दिया !"*

    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
    *श्री संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   
कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे  हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही.
जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते,   परिस्थितीनुसार  कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या  रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल.
खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि  ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *कुत्रा आणि लांडगा*

एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''

तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुरुवार, 29 सितंबर 2022

30/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 30/09/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन*
       

 
💥 ठळक घडामोडी :-
◆ १९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.

💥 जन्म :-
◆ १९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
◆१९६२ - शान, भारतीय संगीतकार.
◆१९८०-मार्टिना हिंगीस , लाँनटेनिस खेळाडू

💥 मृत्यू :-
◆ २००१- माजी रेल्वे मंत्री,नागरी हवाई वाहतूक मंत्री ,कांग्रेसचे नेते माधवराव शिवाजीराव शिंदे (सिंधिया) यांचा विमान अपघातात मृत्यू.
◆ १९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राज्य सरकारचं भेट, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळी बोनस जाहीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताचा कट उधळला,  सुरक्षा दलांकडून प्रत्येक बसची चौकशी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला इयान वादळाचा फटका, २५ लाख नागरिकांचं स्थलांतर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *सीमाभागात मराठी बांधवांवर अन्याय होत असताना अंबाबाई मंदिरात कन्नड भाषेत बोर्ड का? मराठी एकीकरण समितीचा संताप*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *धर्माबाद जि. नांदेड येथे वीज पडून एका शाळकरी मुलींचा मृत्यू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Opposite Words विरुद्धार्थी शब्द👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/HUnNmxyrG7A

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                 *लोभाचे फळ*

https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/29.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *दमा म्हणजे नेमके काय ?* 📙

रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.
दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.
दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.
दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.
दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.
दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*      

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) जगात सर्वाधिक स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता ?

२) दक्षिण आशियातील ब्रेल लिपीतला पहिला शब्दकोष असा मान मिळविलेल्या शब्दकोशाचे नाव काय ?

३) राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ?

४) सिलिकॉन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?

५) जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

*उत्तरे :-* १) भारत   २) हेमकोष, आसामी शब्दकोष   ३) जम्मू काश्मीर   ४) SI   ५) २२ सप्टेंबर

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  प्रमोद रत्नाळीकर
●  अनुराग वानरे
●  निलेश सुंकेवार
●  सतीश दमकोंडवार
●  पोतन्ना डेबेवार
●  देवन भोयर
●  महेश घुगारे
●  विशाल जारे पाटील
●  मन्मथ लिमशेट्टे
●  संतोष भालके

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*आज घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून  जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात*

*पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मधल्या काळात असं काय घडलं ? मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"*

  • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • •
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
      *संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाईल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *काव्यांगण* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
शाळा बंद धोरण

सरकारचं धोरण काही कळत नाही बुवा
सरकारी शाळा बंद करून
खाजगीकरणाला देती हवा

गाव तेथे शाळा असायलाच हवी
लहान लहान चिमुकली लेकरं
कसे जातील दूर गावी ?

लोकसंख्याच्या प्रमाणात
विद्यार्थी संख्या ही असेल कमी
सरकार असे शाळा बंद करून
कसे देईल शिक्षणाची हमी ?

गावोगावच्या शाळा बंद झाली तर
अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतील
डी. एड. पदविका धारक नवीन
शिक्षकांची पदे कसे भरतील ?

शिक्षण हक्क कायदा ठरला फक्त कागदावर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात
गरिबांची मुलं वाऱ्यावर

मायबाप सरकार नका करू असे गैरसोय
गरिबांच्या शिक्षणाची दारावरच करा सोय
दारावरच करा सोय ........

- नासा येवतीकर, विषय शिक्षक,
कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड
9423625769
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃        
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                  *सदाचरण*

फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.

*तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

बुधवार, 28 सितंबर 2022

29/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 29/09/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


💥 ठळक घडामोडी :-
★ १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसऱ्याला (चित्रित) वाळीत टाकले.
★ १९९२ - ब्राझीलचे अध्यक्ष फर्नांडो कोलोर डी मेलो यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला.
★ २०१६ - उरी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर "सर्जिकल स्ट्राइक" केले.

💥 जन्म :-
★ १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
★ १९५१ - मिशेल बाशेलेट, चिले देशाची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.
★ १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू

💥 मृत्यू :-
★ १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
★ २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
★ २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नरेंद्र मोदी सरकारकडून 78 दिवसांचा बोनस मंजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जल्लोषात होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची देशाच्या अॅटर्नी जनरलपदी पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नवी दिल्ली: प्रचंड कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाच्या २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचं नेटवर्क बंद होऊ शकतं.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची २५ हजार रुपये बोनसची मागणी, महापालिकेच्या कर्मचारी  समन्वय समितीच्या बैठकीत मागणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर दिवाळी बोनसबाबत निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पुण्यात वाहतुकीसाठी अडथळा ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरु झालीय. 1 ऑक्टोबरला पूल पाडला जाणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोल्हापूर  महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाचा शुभारंभ, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *नवरात्रीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आलीय..*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Antonyms words विरुद्धार्थी शब्द👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/capZhRn1maI

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         *आधारकार्डचा इतिहास*
सध्या भारतात कोणत्याही कामासाठी एक महत्वाचे डाकूमेंट बनलेले आधार कार्ड कसा जन्म घेतला ..........!

पूर्ण माहिती खालील लिंकवर वाचता येईल.

https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post.html

लेखक - नासा येवतीकर, धर्माबाद
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   📙 *जीपीएस म्हणजे काय ?*  📙

हल्ली पर्यटन करण्याची एक चांगली सवय सर्वसामान्यांना लागलेली आहे. पर्यटनाचा फार मोठा फायदा आपणाला होत असतो. त्या ठिकाणचं राहणीमान, भौगोलिक संपन्नता, सामान्यांचे प्रश्न या निमित्ताने समजण्यास मदत होते. अर्थात तसा दृष्टीकोन ठेवून पर्यटन केले तरच बरं का ! असे पर्यटनाला गेलो तर रस्ते सापडणे किंवा ठिकाण मिळणे काहीवेळा अवघड होते. प्रत्येक वेळी कोणाला तरी पत्ता विचारत राहणं सुद्धा नकोसं वाटतं. पण आता एक नवी प्रणाली आपल्या हातात आलेली आहे. जीपीएस त्याचं नाव. मोबाइलमध्ये असलेल्या या सिस्टीममध्ये नुसतं ठिकाण टाइप केलं किंवा आवाजाच्या माध्यमातून जरी सांगितलं तरी आपणाला त्या ठिकाणी सहीसलामत पोहोचवण्याचं काम ही जीपीएस यंत्रणा करते.
एखाद्या गावाचं किंवा ठिकाणाचं स्थान आपण त्याच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरवू शकतो. पण एव्हरेस्टचं ठिकाण निश्चित करण्यासाठी एवढीच माहिती पुरेशी नाही. कारण लांबी, रुंदी बरोबरच उंचीचीही जोड त्यासाठी आवश्यक आहे. तीन मितीतील म्हणजे थ्री डायमेन्शनमधील माहिती मिळाली तरच आपण कोणत्याही ठिकाणचा पत्ता निश्चित करू शकतो. आता प्रश्न एवढाच उरतो की, या तीन मितींची माहिती मिळवायची कशी ? ती माहिती मिळवायची असेल तर उपग्रहांची मदत घेतली पाहिजे. आणि तेही भूस्थिर उपग्रह. हे उपग्रह जवळपास छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर असतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरत आहे त्याच वेगाने ते पृथ्वीबरोबर फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीच्या दृष्टीने ते स्थिर वाटतात. म्हणूनच त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. कमीत कमी तीन भूस्थिर उपग्रह एकमेकाला एकशे वीस अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने अवकाशात ठेवले तर आपणाला जगातील कोणत्याही ठिकाणची माहिती तरंग लहरींच्या माध्यमातून समजते. तीनपेक्षा जास्त उपग्रह ठेवले तर माहितीची अचूकता वाढू शकते.
दिशादर्शक प्रणाली म्हणजे ठिकाणांची माहिती देणाऱ्या उपग्रहांचा समूह. सध्या सर्वात लोकप्रिय असणारी दिशादर्शक प्रणाली ही अमेरिकेची आहे. तिला जीपीएस म्हणजे 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' म्हणतात. वापरण्यास अत्यंत सोपी असल्यामुळे ती सध्या सर्वमान्य झालेली आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सुद्धा दिशादर्शक प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रशियाची ग्लोनास किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम, युरोपीय समुदायाची गॅलिलिओ, चीनची बेंड्डु, जपानची रक्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम कार्यरत आहेत.
भारताचीही स्वतःची दिशादर्शक प्रणाली आहे. तीचे नाव आहे आयआरएनएसएस (Indian Regional Navigation Satellite System)
ही दिशादर्शक प्रणाली केवळ स्मार्टफोन पुरतीच मर्यादित न राहता तिचे अनेकविध उपयोग आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, मोबाइल फोन यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटक आणि गिर्यारोहकांना दिशादर्शनासाठी, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनींसह दिशा सांगण्याबरोबरच लष्करासाठी ती उपयुक्त असल्यामुळे काहीवेळा धोकासुद्धा संभवतो. भारताच्या या दिशादर्शक प्रणालीचा एकूण खर्च एक हजार चारशे वीस कोटी रुपये आहे. जीपीएसवर सध्या अवलंबून असणाऱ्यांनी आणि विकासाचे फायदे घेणाऱ्यांनी तरी अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. ज्या उपेक्षित घटकांना या विकासाचे फायदे मिळत नाहीत त्यांचा विचार करणं आवश्यक आहे.

*- नितीन शिंदे*
*'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून*      

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
         
१) भारताचे परराष्ट्र मंत्री/विदेश मंत्री ( Foreign minister ) कोण आहेत ?

२) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची ( Lion ) जोडी कोणत्या ठिकाणाहून येणार आहे ?

३) प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जन्म कोठे झाला ?

४) जिवंत असेपर्यंत वाढ होणारे सजीव कोणते ?

५) अनेक बिया असलेली फळे सांगा.

*उत्तरे :-* १) एस. जयशंकर   २) सक्करबाग उद्यान, जुनागढ, गुजरात   ३) कानपूर, उत्तरप्रदेश ( २५ डिसेंबर १९६३ )   ४) वनस्पती   ५) सीताफळ, फणस, टरबूज, पेरू इत्यादी

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
●  प्रथमेश नागोराव येवतीकर
●  राजेश सामला
●  संदेश जाधव
●  महेश राखेवार
●  गणेश पेटेकर
●  मारोती वाघमारे
●  अजय मिसाळे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.*
*माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?*

     ••☆‼ *रामकृष्णहरी*  ‼☆••
     🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
     *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई*
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना  वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत  नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.       
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
           *सकारत्मक दृष्टिकोन*

एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले.  मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध."
"महाराज, पण दोरी नाहीये न"
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.

सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?"
"पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "
पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा"
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!
पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या) गावी जाणार कसे ?
तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल !! आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~

मंगलवार, 27 सितंबर 2022

28/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/09/2022 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
जागतिक कर्णबधीर दिन
Green Consumer Day

💥 जन्म :-
◆१९८२- अभिनव बिंद्रा,ओलीम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.
◆१९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. 
◆१९८२- रणबीर कपूर,अभिनेता.
◆१९४७- शेख हसीना ,बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान.

💥 मृत्यू :-
●२०१२-ब्रजेश मिश्रा ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.
●१९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. 
●१८९५-लुई पाश्चर,फ्रेंच सूक्ष्मशास्त्रज्ञ.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाचं 'डार्ट मिशन', लघुग्रहावर धडकलं अंतराळयान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मध्ये रेल्वेचा मुख्य अभियंता लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात, एक लाखाची लाच घेताना अटक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेची बस पलटी झाली. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नागपुरातील साडेचारशे मराठी शाळांवर संकट, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा होणार समायोजित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका, केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवला जाणार पहिला सामना.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*The Loin and the Mouse👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/LUHDSa-9ZIM

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
               *लता मंगेशकर*
                 
  स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताची गान कोकिळा असे ही म्हटले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. 06 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. लता दीदींना विनम्र अभिवादन ....!        
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

                   *गुगल*
माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलचा काल वाढदिवस. इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.
आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. जरी गुगल कंपनीची  ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले. २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस सत्तावीस  सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनी ७ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. 
'गुगल' ही गणिती संज्ञा आहे. एकावर शंभर शून्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणितज्ज्ञाने ही संकल्पना शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव 'गुगल' ठेवण्यात आले. आजकाल गुगल सर्च इंजिन इतके प्रचंड लोकप्रिय झालेले आहे की 'to google' असे क्रियापदच इंग्रजीत तयार झालेले आहे. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे.  १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'अर्धी भाकरी खा पण मुलांना शिकवा' असे नेहमी आपल्या कीर्तनात कोण म्हणत असत ?

२) चायना नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन ( CNSA ) या चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ पर्यटनासाठी काय तयार करण्याचे ठरविले आहे ?

३) यंदा ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या गुजराती चित्रपटाचे नाव काय ?

४) एक बी असलेली फळे कोणती ?

५) शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात ?

*उत्तरे :-* १) संत गाडगेबाबा   २) अवकाशयान   ३) छेलो शो ( इंग्रजीत - द लास्ट शो )   ४) आंबा, आवळा, बोर, खजूर इत्यादी   ५) अटलांटिक महासागर 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे
●  प्रशांत राऊतखेडकर
●  सचिन बावणे
●  साईनाथ कानगुलवार

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.*

*हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!*

    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
      *श्री.  संजय नलावडे, मुंबई*
    *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

     प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *खरे अपयश*

एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"
यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"
रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"
यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव 
*(Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"
हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"
यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या  चुकीच्या निर्णयांमुळे !!"

*तात्पर्य*
*आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं.*

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

सोमवार, 26 सितंबर 2022

24/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
 🎇 दि. 24/09/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष . 🎇 * 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

💥 ठळक घडामोडी :-
◆१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
◆ १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
◆ २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.

💥 जन्म :-
●१९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.
●१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.

💥 मृत्यू :-
★ १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
★१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
★२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *नाशिक मनपाचे निवारा केद्रांत 200 हून अधिक बेघरांना 'सहारा', बँक खात्यांसह आधारकार्डही मिळणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
 3⃣ *लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ होणार, कारण.....अन्न मंत्रालयानं दिली सविस्तर माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा, राज्यभरात जल्लोष, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात वाटले पेढे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून केला पराभव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने Road Safety World Series मध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*Who I am?ओळखा पाहू मी कोण?👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/7S5TNtg2gos

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती - 
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *मतदार जागृती आवश्यक* 
        
https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙

घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.
ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.
खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.
ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.
ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.

*'सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*        

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*“ जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते. ”*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'पक्षी जगतातील अभियंता' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?

२) नुकतेच टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या महान टेनिसपटूचे नाव काय आहे ?

३) जगात सध्या गेंड्याची संख्या किती आहे ?

४) भारताची सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?

५) 'राष्ट्रीय बालिका दिवस' केव्हा साजरा केला जातो ?

*उत्तरे :-* १) सुगरण/बया   २) रॉजर फेडरर, स्वित्झरलंड   ३) २९ हजार   ४) वंदे भारत   ५) २४ जानेवारी 

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  डॉ. तोफिख खान पठाण
●  सारंग दलाल, नांदेड
●  राजू यादव, हैद्राबाद
●  ओमसेठ गंजेवार, धर्माबाद
●  विरेश भगवान भंडारे
●  सतीश आरेवाड
●  रोहित शिंदे
●  अरविंद ठक्करवाड
●  राजेश गाजुलवाड
●  दिग्विजय अभिजित राजूरकर
●  प्रथम सुनील नामेवार
●  अक्षत मनोज तानुरकर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.*

*उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.*

             *॥ रामकृष्णहरी  ॥*
☘☘☘☘☘☘☘☘☘
        *श्री. संजय नलावडे, मुंबई*
       *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *काव्यांगण* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

शाळा कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीचे
    *......... गेट-टूगेदर ........*

कॉलेज मधील मित्र-मैत्रिणी
भेटत आहेत कित्येक वर्षांनी
मनात दाटल्या जुन्या आठवणी
ओठावर तेच जुनेच गाणी

आनंदाचे ते दिवस मंतरलेले
एकमेकांत जीव गुंतलेले
एकमेकांपासून विभक्त होतांना
नयनात किती अश्रू दाटलेले

संसाराच्या या रहाटगाड्यात
विसरून गेलो मी स्वतःला 
आज पुन्हा या गाठी भेटीने
अर्थ मिळाला माझ्या जीवनाला

गेले ते दिवस सरला तो काळ
पुन्हा असा आनंद मिळणे नाही
आयुष्याचे काय खरे असते ?
जीवनात भेट होईल की नाही

शालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींचे
गेट टूगेदर व्हावे एकदा तरी
कोण सुखात कोण आहे दुःखात
याची माहिती ही मिळेल खरीखुरी

- नासा येवतीकर, धर्माबाद
- 9423625769
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

                  ज्यांच्याकडे धन, संपत्ती, ऐश्वर्य, नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत, तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही, त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,त्याला कशाचाही गर्व नाही अशी माणसे या जगात फार श्रीमंत आहेत आणि भाग्यवानदेखील आहेत.

© व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃         
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
             *मोठीच त्याची सावली*

सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला,
'' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला.
''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?''
''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. 

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

26/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

~~~~~~~~~~~~~~~~~~~

 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣

            ( फ्रेश शालेय परिपाठ )

🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

         ( रविवार आणि सुट्टी वगळून )

~~~~~~~~~~~~~~~~~~~

🎇 दि. 26/09/2022 वार - सोमवार

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


💥 ठळक घडामोडी :-

◆२००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.


💥 जन्म :-

★१९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.

★१९३१ - विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.

★ १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.


💥 मृत्यू :-

◆१९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.

◆१९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक.

◆ १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक.

◆ १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.

◆२००२ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.


*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*

📱  9604481084

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1⃣ *चंदीगडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव 'शहीद भगतसिंह विमानतळ'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

2⃣ *संस्कृत भाषेसाठी 'ध्रुवा' महोत्सव, मुलुंडच्या वझे महाविद्यालयात महोत्सव संपन्न*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

 3⃣ *राजस्थानमध्ये 82 गेहलोत समर्थक आमदार राजीनामा देण्याची शक्यता, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करायला विरोध ?*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

4⃣ *14,000 कोटींची एफडी, 14 टन सोनं आणि 85 हजार कोटींची मालमत्ता; तिरूपती बालाजी मंदिराची संपत्ती जाहीर*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

5⃣ *दोन वर्षांमध्ये देशभरात 5G चं जाळं उभारण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

6⃣ *मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली, 40 पेक्षा जास्त घरांना तडे*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

7⃣ *ऑस़्ट्रेलिया विरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा टी20 सामना टीम इंडियाने 6 विकेट राखून जिंकला आहे.*

•••••••••••••••••••••••••••••••••••••

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*

📱 9960358300

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️

  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••


*1 to 50 Numbers reading एक ते पन्नास वाचन👇*


*व्हिडीओ-लिंक👇*


https://youtu.be/Y122rRA-cyQ 


~~~~~~~~~~~~~~~~~~~

🎥 व्हिडीओ निर्मिती - 

     *सारिका आचमे, नांदेड*

📱9960217083

~~~~~~~~~~~~~~~~~~~

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

  *सुपरस्टार अमिताभ बच्चन*


https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_25.html


लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात

~~~~~~~~~~~~~~~~~~~

✍ स्तंभलेखक 

*नासा येवतीकर, धर्माबाद*

9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

📙 *डासांमुळे होणारे आजार* 📙


मलेरिया, हत्तीरोग, चिकुनगुनिया, डेंग्यू या चार आजारांच्या प्रसारासाठी डासांच्या विविध जाती कारणीभूत ठरतात. यांतील प्रत्येक आजाराने जगाच्या पाठीवर, भारतातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.

आपण चारही आजारांची थोडक्यात ओळख करून घेणे आवश्यक ठरते; कारण भारतात कुठेही गेलात, तरी डास तुमच्या भोवती गुणगुणतच असतात, चावत असतात.

सर रोनाल्ड रॉस या जन्माने भारतीय डॉक्टरचा मलेरियाच्या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. उत्तर प्रदेशातील अल्मोरा गावी १३ मे १८५८ रोजी त्यांचा जन्म झाला. ब्रिटनमध्ये १८७९ मध्ये वैद्यकीय पदवी घेऊन भारतीय लष्करात डॉक्टर म्हणून ते दाखल झाले. मलेरियाला कारणीभूत झालेले परजीवी सूक्ष्मजीव फ्रेंच शास्त्रज्ञ लाव्हरेन यांनी १८८० मध्ये शोधले होते. पण त्यांची वाढ, प्रसार व मलेरियासंदर्भातील डासांचे जीवनचक्र यांबद्दल रॉस यांनी सतत संशोधन चालू ठेवले. अॅनाफिलीस जातीच्या डासाच्या मादीच्या जठराच्या वळ्यांमध्ये हे परजीवी दबा धरून वाढतात व तिच्या चाव्यातून मानवी शरीरात त्यांचा प्रवेश होतो, हे निरीक्षण हैदराबादजवळच्या बेगमपेठ येथील प्रयोगशाळेत त्यांनी १८९७ साली नोंदवले. १९०२ साली त्यांना याबद्दलचे नोबेल पारितोषिक दिले गेले.

मलेरियामध्ये रात्रीच्या वेळी थंडी वाजून येते व दिवसा ताप उतरतो, पण अशक्तपणा येतो. यामुळे हीव म्हणजे थंडी आणणारा ताप म्हणून हिवताप या नावाने तो प्रसिद्ध आहे. परजीवींची वाढ लाल रक्तपेशीत होते व त्यांचे विघटन झाल्याने रक्तक्षय होतो, हा मलेरियाचा एक उपद्रव, क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.

स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

यांपैकी चिकनगुनिया या आजाराची सुरुवात आफ्रिकेमध्ये टांझानियात १९५२ साली झाली. कोलकात्यामध्ये १९६३ साली पहिली लागण झाल्याची नोंद आहे. केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसात नंतर याने अधूनमधून तोंड वर काढले. सुमारे ४३००० लोकांना त्यावेळी चिकनगुनियाने पछाडले होते. महाराष्ट्रात प्रथम मराठवाडा, विदर्भ येथे व नंतर अनेक ठिकाणी गेल्या ३ वर्षांत चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत. याचा अर्थ या डासांनी आता महाराष्ट्रातही ठाण मांडले आहे. चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो. शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. घराघरांतून धडधाकट माणसे सांधे आखडल्यामुळे काम करू शकत नाहीत, हे दृश्य या आजाराने धुमाकूळ घातलेल्या अनेक गावांमध्ये दिसून येते. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.

डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्‍या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. त्यात अडथळा येऊन विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो. रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.

हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. एक ते दोन सेंटीमीटर एवढी त्यांची वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. अतिसूक्ष्मापासून पूर्ण वाढीपर्यंत दोन आठवड्यांत यांची प्रगती होते. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात; पण हत्तीसारखा जाड पाय झाल्यास हालचाल, काम करणे अवघड होते. पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्‍या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते. हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध वापरले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.

डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल माहिती घेतल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की डास चावण्यापासून प्रतिबंधक हाच एक उपाय सध्यातरी आपल्या हातात आहे. डास मारण्यासाठी वापरली जाणारी औषधे पचवुन त्यांच्या नव्या प्रजाती सतत तयार होत गेल्या आहेत. डीडीटी तर त्यांनी कधीच पचवले आहे. साचलेल्या पाण्यावर तेलाचा तवंग सोडून डासांच्या अळ्यांना प्राणवायू मिळू न देता त्यांचा नायनाट हा प्रकार छोटय़ा जलाशयात केला जातो. परमॅथ्रिनसारखी द्रव्ये, अन्य रसायने यांचा वापर केला जातोच. त्यामुळे डास आपल्यापासून दूर राहतात. मॉस्किटो रिपेलंट म्हणजे डासांना सहन न होणारी तीव्र वासाची द्रव्ये हवेत फवारणे वा त्वचेवर लावणे हाही एक उपाय आहे. मच्छरदाणी, लांब हातापायांचे कपडे हाही उपाय केला जातो.

मात्र आजही गरीब असो वा श्रीमंत, झोपडीत राहणारा असो वा उंच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणाऱा या सर्वांनाच डासांनी नकोसे करून सोडलेले आहे. त्यांच्यामुळे फैलावणारे आजार आज सर्वांनाच सारखे त्रास देत आहेत. नजीकच्या भविष्यात उष्ण कटिबंधातील सर्व माणसांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे, हे निश्चित.


*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*           


*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


*" कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात "*


*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*

📱 9403593764

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

१) 'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा...' ही प्रसिद्ध कविता कोणी लिहिली ?


२) अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर ९ सप्टेंबर २०२२ ला घेण्यात आलेल्या चाचणीत 'वंदे भारत' ने ताशी १०० किमीचा वेग घेण्यासाठी किती वेळ लागला ?


३) 'स्वच्छता दिवस' केव्हा साजरा केला जातो ?


४) नैसर्गिक संख्यांच्या संचात शून्य मिळवल्यास मिळणाऱ्या संख्यांचा संच कोणता ?


५) वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये ४ पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे ?


*उत्तरे :-* १) बहिणाबाई चौधरी   २) ५२ सेकंद   ३) ०२ ऑक्टोबर   ४) पूर्ण संख्या   ५) बजरंग पुनिया 


*संकलन :- जैपाल ठाकूर*

जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया

📱9765943144

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


●  सुनील आलूरकर

●  अभिषेक संजय कदम

●  विश्वनाथ होले

●  सोनाजी बनकर

●  विक्की खटके

●  विक्रम रिक्कल

●  श्री दासरवार

●  अजय मिसाळे


*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*

     

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


*माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक  बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात  होतो. तसंच माणसाचं झालंय.*


*थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला.  ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला  आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.* 


              *॥ रामकृष्णहरी ॥*

   🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

      *श्री. संजय नलावडे, मुंबई*

      *मोबाइल  - 9167937040*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••


माणसाने शिस्त आणि प्रेम या दोन गोष्टींना मर्यादितच ठेवायला हवे.कारण त्यांचा उपयोग जास्त प्रमाणात केला तर नात्यात दुरावा किंवा विरोध निर्माण होतो आणि वर्तनात सभ्यतेचा अतिरेक निर्माण होऊन आपण इतरांपेक्षा काहीतरी मुर्खपणा करत आहोत हे इतरांच्या लक्षात येते.म्हणून ह्या दोन गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहूनच जीवन जगायला शिकले पाहिजे.


© व्यंकटेश काटकर, नांदेड

संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.

🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁        

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

             *अहंकार नसावा.*


एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी  दगडाचा शोध घेत होता.तो रस्त्याने जात असतांना त्याला मोठे दोन  दगड दिसले ,आणि  मुर्तीकाराने ठरविले की या दगडाच्या छान सुबक दोन मुर्त्या तयार कराव्या.

दगडाचे निरीक्षण करून मुर्तीकाराने कशी मूर्ती तयार करावी याबाबत मनात आराखडा तयार केला.आणि दोन्ही दगडाला सांगितले की, मी तुमच्यापासून छान मूर्ती तयार करणार आहे तेव्हा तुम्ही मला साथ द्यावी.छन्नी हातोडा घेऊन मूर्तिकार दगडाला आकार देत असतांना पहिला दगड म्हणाला मला त्रास होतो, माझ्यावर घाव करू नका. तेव्हा मुर्तीकाराने दगडाला समजविले की, मी हळूहळू घाव देणार तू तुझ्यातील कडकपणा कमी कर. थोडा नरम  हो म्हणजे मला घाव घालायला त्रास होणार नाही व तुला पण जास्त त्रास होणार नाही.पहिला  दगड स्वतःतील अहंपणा सोडायला तयार नव्हता.मुर्तीकाराने दुसऱ्या दगडाला  समजविले दुसरा दगडाने स्वतःमधील कठीणपणा कमी करून नरमपणा घेतला व काही दिवसातच अतिउत्तम , सुंदर अशी राधाकृष्णची मूर्ती  मुर्तीकाराने तयार केली.

मूर्तीची स्थापना झाली  तेव्हा बाजूला पडलेला कडक मोठा दगड बघून त्याचा उपयोग लोकांनी  नारळ फोडण्यासाठी केला.

मुर्तीकाराचे ज्या दगडाने ऐकले त्या दगडाची मूर्तीत रूपांतर झाले व  सर्व लोक भक्तिभावाने पूजा करायला लागले. कुंकूम तिलक लावून हारापर्ण करतात, छान वस्त्र परिधान करतात आणि ज्या दगडाने स्वतःचा अहंकार सोडला नाही , मुर्तीकाराचे ऐकले नाही त्या दगडाला  जीवनभर नारळाचे घाव सहन करावे लागते.पूजा करणारे लोक  अंगावर पाय देऊन   राधाकृष्णच्या मूर्तीची  पूजा करायला जातात. त्यावेळी  अहंकारी दगडाला खूप दुःख झाले पण वेळ गेलेली होती.


*तात्पर्यः अहंकारपणाने वागल्यास स्वतःचेच नुकसान होते म्हणून अहंकार अंगी नसावा.*


*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*

जि.प.प्रा.शा. गोजेगाव

ता.हदगाव, जि. नांदेड

http://www.pramilasenkude.blogspot.in

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*

📱 9423625769

~~~~~~~~~~~~~~~~~~~

*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या

फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

~~~~~~~~~~~~~~~~~~~

27/09/2022

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 27/09/2022 वार - मंगळवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *जागतिक प्रवासी दिन*
           
💥 ठळक घडामोडी :-
◆२००२ - मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात.

💥 जन्म :-
◆१९०७ - भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
◆ १९७४ - पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
◆ १९८१ - लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू :-
◆१९७२ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
◆२००८ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी पोलीस भरती होणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *अंबाबाई मंदिरातील पेड ई पासला कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. न्यायालयाने ई पास परवानगी नाकारताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही सबुरीचा सल्ला दिला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यासाठी रवाना, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *चुकीची माहिती पसरवणाऱ्या 10 यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकराची कारवाई, 45 व्हिडीओही ब्लॉक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मुंबईत रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ एक ऑक्टोबरपासून, टॅक्सीच्या किमान भाड्यात तीन रुपयांनी तर रिक्षाच्या भाड्यात दोन रुपयांनी होणार वाढ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *इटलीला पहिल्या महिला पंतप्रधान मिळणार, जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या फ्रेटेली डी'इटालिया पक्षाचा इटलीच्या सार्वत्रिक निवडणुकीत झाला विजय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्सवामुळे मंदिर परिसरातील दुकाने गजबजून गेले असून फुल, प्रसाद साहित्याने फुलली आहेत.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
  *🖥️  संस्कारमोती चॅनल 💻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••

*51 to 100 Numbers reading एकावन्न ते शंभर वाचन👇*

*व्हिडीओ-लिंक👇*

https://youtu.be/IRuuET_9ikc

~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
     *सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       *जसे चारित्र्य तसे जीवन*
https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/38.html

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  👁 *आपल्या डोळ्याचे कार्य नेमके कसे चालते ?* 👁

डोळ्यांनी आपण जग बघतो तर जग आपल्या डोळ्यांतून आपल्या मनाचा थांग घेण्याचा प्रयत्न करीत असते. डोळे मनातील भाव कवचितच लपवू शकतात.
पृष्ठवंशीय प्राण्यांच्या डोळ्यांची रचना बरीचशी सारखी असते. याउलट कीटक जाती, काही जलचर यांचे डोळे त्यांच्या देहाच्या मानाने खूपच मोठे व वेगळ्या प्रकारचे असतात. वेगळेपणाचा मुख्य भाग म्हणजे त्यांचा डोळा हा 'डोळा' नसून अनेक संवेदनाक्षम मज्जातंतूंची ती एक सलग जाळीच असते. त्यामुळे कीटकांच्या डोळ्यांना 'कंपाऊंड आइज' असेही म्हटले जाते.
माणसाला रंगदृष्टी असून रंगज्ञान उत्तम असते. अन्य प्राण्यांच्या बाबतीत याची नक्की कल्पना आपल्याला नाही. रंगांच्या असंख्य छटा तात्काळ ओळखता येणे व जेमतेम एक दशांश मिलिमीटर एवढ्या लहान बिंदूला वेगळे वा सुटे पाहता येणे ही मानवी डोळ्यांची वैशिष्टय़े म्हणता येईल.
मानवी डोळ्याच्या शास्त्रीय वर्णनापेक्षा त्याची प्रमुख वैशिष्टे जर बघितली तर डोळ्याला मेंदूखालोखाल संरक्षण दिले आहे, असे लक्षात येते. जोराचा पाऊस, तीव्र ऊन, धुळीचे वादळ या सर्वांपासून अंगभूत संरक्षण डोळा मिळवतो. सतत नकळत होणारी पापण्यांची उघडझाप, डोळ्यांच्या बाहुल्या प्रकाशाच्या तिरपीनुसार आपसूक कमी जास्त होणे व डोळ्यांत जाणारी धूळ सतत अश्रूंच्या मदतीने धुतली जाऊन ते स्वच्छ राहणे या क्रिया इतक्या नकळत सहज घडत असतात की, त्या सांगितल्यावरच लक्षात येतात. यावरूनच आपण नेहमी उद्गारतो, 'डोळ्याची पापणी लवण्याच्या आत अमुक एक गोष्ट घडली'.
काॅर्नियातुन म्हणजे बुबुळावरील पारदर्शक आवरणातून प्रकाशकिरण यातून डोळ्यात प्रवेश करतात. त्यांच्या तीव्रतेनुसार डोळ्याची बाहुली लहान मोठी होऊन मग ते डोळ्याच्या भिंगातून आतील भागात जातात. डोळ्याच्या आतील पोकळीत रंगहीन पारदर्शक तैलद्रव भरलेला असतो. मागील बाजूला असलेला पडदा व दृष्टीपटल यावर भिंगातून आलेल्या किरणांची प्रतिमा पडते. हा पडदा दोन प्रकारच्या पेशींनी बनलेला असतो. सुमारे बारा कोटी रॉड्स व साठ लाख कोन्स यांनी एका डोळ्याचा रेटिना बनतो. डोळ्याच्या आतील किमान ७२ टक्के भाग पडद्याने व्यापलेला असतो व मेंदूशी या भागाचा ऑप्टिक नर्व्हतर्फे संबंध जोडला जातो. राॅड्सवर कमी प्रकाशात करड्या, काळ्या, पांढऱ्या रंगाचा परिणाम होतो; तर कोन्सवर हिरव्या, लाल व निळा रंगछटांचा परिणाम होतो. रॉडसना दंडगोल व कोन्सना शंक्वाकृती पेशी असेही संबोधले जाते. पण डोळ्यांच्या संदर्भात व्यवहारात कॉर्निया, रेटिना, रॉड, कोन व लेन्स हे शब्दच जास्त परिचित आहेत. उदा. कॉर्नियाचे रोपण, रेटिनाची डिटॅचमेंट, डोळ्यांत लेन्स बसवणे इत्यादी.
रेटिनाकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश हे 'कोडेड' स्वरूपात जातात. या कोडबद्दल अद्याप पुरेसे स्पष्टीकरण उपलब्ध नाही. ते झाल्यास अंध माणसास डोळ्यांशिवाय सुद्धा पाहता येईल, अशी एक शक्यतस शास्त्रज्ञ वर्तवतात. डोळ्याकडून येणाऱ्या संदेशांचे वाचन मेंदूतील मागील बाजूच्या भागात होते. डोक्यावर मागील बाजूला जोरात टप्पल मारल्यास प्रथम डोळ्यांसमोर काजवे चमकतात ते यामुळेच.
दोन डोळय़ांमुळे लांबचे व जवळचे अंतर वा खोली याचा नेमका अंदाज आपल्याला येतो. ज्यावेळी डोळ्यांच्या भिंगातून रेटिनावर पडणारी प्रतिमा अलीकडे वा पलीकडे पडते, त्यावेळी चष्म्याची जोड देऊन दुरुस्ती करावी लागते. डोळ्याची लेन्स अपारदर्शक झाली, तर त्यालाच 'मोतीबिंदू' असे म्हणतात. यावेळी ही लेन्स काढुन कृत्रिम लेन्स बसवली जाते. बुबुळाच्या पुढचा पारदर्शक पडदा म्हणजे कार्निया 'अ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वा अन्य काही कारणांनी अपारदर्शक बनला, तर नवीन कॉर्नियाचे रोपण करता येते. दृष्टीदान म्हणजे मृत माणसाचा कॉर्निया मृत्यूनंतर लगेच काढून हे रोपण केले जाते.
जगाच्या पाठीवरील माणसांचे डोळे वेगवेगळे भासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डोळ्यांच्या बाहुल्यांचे रंग. या रंगछटांचे खेळच डोळ्यांकडचे आपले लक्ष खिळवून ठेवतात. घारे, निळे, करडे, तांबूस, काळे, पिंगट असे रंग माणसाच्या नजरेची आठवण देत राहतात.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*       

*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*" छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगरानेनाही तर छोट्या दगडाने ठेच लागते "*

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) लम्पी हा जनावरांना होणारा कोणत्या प्रकारचा चर्मरोग आहे ?

२) आंतररष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो ?

३) पेशींच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस काय म्हणतात ?

४) रंगीत फुले येणाऱ्या वनस्पतींचे नाव सांगा.

५) राजू श्रीवास्तव कोण होते ?

*उत्तरे :-* १) संसर्गजन्य रोग   २) २७ सप्टेंबर   ३) कर्करोग   ४) गुलाब, जास्वंद, झेंडू, सूर्यफूल इत्यादी   ५) प्रख्यात विनोदी कलाकार

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

●  सद्दाम दावणगीरकर
●  नरेश केशववार
●  अजित कड
●  डॉ. प्रतिभा जाधव
●  अनिल आर्य माकणे
●  गोविंद कदम
●  डॉ. उमेश पांचाळ
●  राजू बेंबडे

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
    
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*परिस्थिती कितीही कठीण असली तरी तोंड लपवून, मस्तक झुकवून जगू नका. दु:खांचे युग आले तरी हसतमुख राहून जगा. प्रसंग कितीही वाईट असला तरी हिंमतीने सामोरं जाता आलं पाहिजे....*
        *न मुंह छुपाके जियो*
        *और न सर झुकाके जियो...*
        *गमोंका दौर भी आये*
        *तो मुस्कुरा के जियो...*
*ढगांनी झाकले गेले तरी तारे नष्ट होत नाहीत. संकटांच्या अंधाररात्री ह्रदयाचे दिप उजळून जगा. जीवनातील कुठला क्षण मृत्यूची ठेव म्हणून आरक्षित झाला आहे हे कोणीही जाणू शकत नाही, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा. मानवी जीवन अखंड प्रवाही असून ते कोणत्याही टप्प्यावर कायमचे थांबू शकत नाही. म्हणून प्रत्येक मुक्कामानंतर पुढे पुढे जातच जीवन जगलं पाहिजे....!*
        *ये जिंदगी किसी मंजिल पे*
        *रूक नही सकती.....*
        *हर एक मकाम के आगे*
        *कदम बढा के जियो...*.
      
    ••●‼ *रामकृष्णहरी*  ‼●••
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
       *श्री. संजय नलावडे, मुंबई*
      *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन  निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.

© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *लोभाची शिक्षा*

एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. ब्राह्मण अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीस

तात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~