✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 25/11/2019 वार - सोमवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी*
*आंतरराष्ट्रीय महिलाविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन*
*शाकाहार दिन*
💥 ठळक घडामोडी :-
● २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.
● १९९१-कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळले
💥 जन्म :-
● १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
● १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
● १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी.
● १९५२-इम्रान खान ,पाकिस्तान चे प्रधानमंत्री.
● १९२६- रंगनाथ मिश्रा ,भारताचे २१ सरन्यायाधीश.
💥 मृत्यू :-
● १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
● १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा ; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश,आज होणार उद्या सुनावणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *खाजगी नोकरधारकांसाठी मोठी बातमी, नोकरी गेल्यास सरकार 2 वर्ष उचलणार खर्च, खाजगी नोकरधारकांसाठी मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पुणे : शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्जाची माहिती होण्यासोबतच, तो सुधारण्यासाठी राज्यातील सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन आणि बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया तातडीने अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *कोल्हापूर : विधापरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी शनिवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा रंगमंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा ठरला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचं निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी पराभव करून 2-0 ने मालिका जिंकली, रचले नवे विश्वविक्रम, मायदेशात सलग बारावा कसोटी मालिका विजय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*लघुकथा - भूक*
आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. ...........…..
https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail
कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *तापाने फणफणलेल्या मुलाला पांघरून द्यावे का ?* 📙
एकदा घरी एक व्यक्ती बोलवायला आली. तिच्या मुलाला ताप होता. त्यांच्यासोबत घरी गेलो. पाहतो तो काय घराची दारे खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, भर उन्हाळ्यात घरातील सर्व लोक घामाघूम होऊन मुलाकडे चिंताक्रांत नजरेने पाहत बसले होते. मुलाकडे बघितले तर त्याला कानटोपी स्वेटर घातला होता. अंगावर उबदार शाल घातली होती. मुलगा अंथरुणावर तळमळत होता. गेल्या गेल्या सर्वप्रथम मी आई वडिलांना जवळ बोलावून पंखा लावायला सांगितला. नंतर मुलांचे स्वेटर कानटोपी काढली. शाल काढून टाकली. माठातील गार पाणी आणायला सांगितले. एक स्वच्छ फडके आणले. ते ओले करून मुलाची पाठ, छाती, हात पाय कपाळ वारंवार ओल्या फडक्याने पुसले. नंतर मुलाला पातळसर कपडे घातले. एवढे झाल्यावर आईला थर्मामीटरने मुलाचा ताप पाहायला सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला वीस मिनिटात ताप १०३ वरून १०० पर्यंत खाली उतरला होता. असा प्रसंग तुमच्याही घरात होऊ शकतो!
ताप आल्यावर शरीरात जास्तीची उष्णता निर्माण झालेली असते. ती शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. त्यामुळे अशा मुलाला स्वेटर वा उबदार कपडे घातल्याने ताप कमी होणार नाही. याउलट गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने व पाण्याने पुसल्याने ताप कमी होतो. त्यामुळे ताप आलेल्या मुलाला पांघरूण देखील घालू नये. पंख्यांमुळेही गारवा निर्माण होऊन ताप कमी व्हायला मदत होते. या उपायांमुळे तापामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे ताप हा रोग नाही. ते एक लक्षण आहे. वर सांगितलेल्या उपायाने ताप तात्पुरता उतरेल. पण रोग बरा होणार नाही. त्यासाठी त्या त्या रोगाचा विशिष्ट उपचारच घ्यायला हवा.
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल
- कर्मवीर भाऊराव पाटील
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1) *नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे नियंत्रण कोण करते ?*
राज्य निवडणूक आयोग
2) *महेंद्र व संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रचारासाठी कोणी पाठवले होते ?*
सम्राट अशोक
3) *भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण ?*
पं जवाहरलाल नेहरू
4) *माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ?*
स्वीडन
5) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?*
लॉर्ड कॅनिंग
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
👤विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी
सर्व शिक्षा अभियान, नांदेड
👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद
👤 शिवाजी पाटील कदम
👤 अंकुश बल्लेवार
👤 नरसिंग येनद्रलवार
👤 शिवलिंग गंटोड
👤 महेश मुधोळकर
👤
👤
👤
👤
👤
👤
👤
👤
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.*
*परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*
••● 🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸●••
🔹🔹🔹🔹🔹🔹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*मित्रांनो,*
*राजकारणात कुठला भूकंप होईल* *कुणीच सांगू शकत नाही.*
*अलटी पलटीचा खेळ,पाहिला,*
*महाराष्ट्रा तू आता।*
*हे जगणे अवघड झाले ,*
*सोन्याचा होता धूर, नको त्या बाता।*
*स्वातंत्र्यानंतर 50 वर्षानी कुसुमाग्रज* *यांनी विनवणी केली होती.*
*पन्नाशीची उमर गाठली, अभिवादन मज करू नका।*
*पिंड फुकाचे गिळू नका,*
*गोरगरीबा छळू नका।*
*आज महाराष्ट्राच्या भूमीत घनघोर महाभारत घडतंय.*
*थोडा विचारांचा वारसा---*
*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे.* *लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी* *मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये* *भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे* *संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं* *आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच* *झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं* *हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना* *कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते* *स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.*
*स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.*
*उद्धवा अजब तुझे सरकार*
*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
अज्ञानी राहून अंध:कारमय जीवन जगण्यापेक्षा शिक्षण घेऊन प्रकाशमय जीवन जगणे हे केव्हाही चांगलेच आहे. शिक्षणामुळे जीवनाला जगण्याची नवी दिशा मिळते.आपल्यातला अज्ञानपणा, मनातली भीती नष्ट होऊन नव्या उमेदीने, नवचैतन्याने आपले जीवन योग्य दिशेने जगता येते. तसेच आपल्या मनातल्या आकांक्षांना योग्य आकार देण्यासाठी शिक्षणासारखे आश्रय दुसरे माध्यम नाही.
*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
संवाद....९४२१८३९५९०/
८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*खरी आई*
एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे” असे त्या दोघीही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशांसमोर आणले गेले. त्या दोन्ही बायकांचे म्हणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले खरीआई नक्की कोणती? हे ठरवण खरोखरचे अवघड होते. न्यायाधीशाने खूप विचार केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली. सेवकाला आज्ञा केली, “या मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या.” न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हटले, “नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा. या मुलाला त्या बाई जवळ राहू द्या. मी मुलावर चा माझा हक्क सोडते .” दुसरी आई मात्र काहीही बोलली नाही. न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले. मुलाचे तुकडे होण्याऐवजी हक्क सोडायला जी बाई तयार होती, न्यायाधीशाने ते मूल त्या बाईस दिले. दुसऱ्या बाईला मात्र तुरंग वासाची शिक्षा ठोठावली.
*बोध: सत्याचानेहमी विजय होतो.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें