रविवार, 31 जुलाई 2022
01/08/2022
शुक्रवार, 29 जुलाई 2022
30/07/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 30/07/2022 वार - शनिवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे.
■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले.
■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.
💥 *जन्म* :-
● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.
● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक.
💥 *मृत्यू* :-
● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.
● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *मराठा समाजाला पुन्हा धक्का ! इब्डल्यूएस आरक्षणाचा लाभ देणारा जीआर हायकोर्टाकडून रद्द*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *भारतीय ज्वेलर्सना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू केले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मागितली माफी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते. तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *५ जी स्पेक्ट्रमच्या ९ फ्रीक्वेन्सी बँड्सचा सध्या लिलाव सुरू आहे, तिसऱ्या दिवसअखेर 5-जी स्पेक्ट्रमसाठीची बोली १.४९ लाख कोटींवर पोहोचले...असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *केंद्रीय कॅबिनेटने बीएसएनएल कंपनीला १.६४ लाख कोटी रुपयाच्या पॅकेजला दिली मंजुरी, कंपनी आपल्या नेटवर्क आणि सर्विसला सुधारण्यासाठी या पैशाचा वापर करणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *बर्मिंगहम : भारताच्या शिवा थापाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पाकिस्तानच्या बी. सुलेमानवर ५-० असा दणदणीत विजय साकारला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🚀 काव्यांगण - रोज एक कविता 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.
*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*
सूचना -
◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी
◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे
◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे
◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.
आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संयोजक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙
तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता.
त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते.
पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता.
त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला.
*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) भारतातील पहिला प्रामाणिक हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे ?
२) विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) नीरज चोप्रा या खेळाडूने किती मीटरचा थ्रोसह रौप्यपदक मिळविले ?
३) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथग्रहणवेळी कोणत्या प्रकारची साडी परिधान केली होती ?
४) अलीकडेच कोणत्या देशाने उष्णतेच्या लाटांमुळे रेड अलर्ट जारी केला आहे ?
५) कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
*उत्तरे :-* १) बुरहानपूर, उत्तरप्रदेश २) ८८.१३ मीटर ३) संथाली साडी ४) इंग्लंड ५) २६ जुलै
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● नागनाथ इळेगावे
● कु. नक्षत्रा सब्बनवार
● सचिन गादेवार
● प्रवीण चातरवाड
● विजय कुऱ्हाडे
● प्रियंका घुमडे
● शेख नवाज
● निलेश कोरडे
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.*
*कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाईल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रेमभाव एक चाहिए ,
भेष अनेक बनाय |
चाहे घर में वास कर ,
चाहे बन को जाए ||
अर्थ
मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही.
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..9421839590.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*अनमोल क्षण*
प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.
एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.
'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.
खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुरुवार, 28 जुलाई 2022
29/07/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 29/07/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
◆ १९८७- भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका करारावर सह्या केल्या.
◆ १९८५-मल्याळम लेखक टी. एस. यांना ज्ञानपीठ पुरस्कार.
◆ १९५७- 'इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA) ची स्थापना.
◆ १९४६-टाटा एयरलाइन्सचे 'एयर इंडिया' असे नामकरण करण्यात आले.
💥 *जन्म* :-
● १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
● १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
● १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
💥 *मृत्यू* :-
● २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
● २००९- महाराणी गायत्री देवी ,जयपूरच्या राजमाता
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आता 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बनवा मतदार ओळखपत्र, वर्षातून चार वेळा नोंदवता येणार नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय, पण मतदानाचा अधिकार मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचं नाव, राज्यपालांच्या सूचनेनुसार झालं नामकरण*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *जुलैमध्ये सरासरीपेक्षा 300 मिमी अधिक पावसाची नोंद, खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची 'ईडी' चौकशी; राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही रडारवर
बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलवले आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *भारतीय संघाने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत 3-0 च्या फरकाने मात दिली. यावेळी मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर पहिला-वहिला विजयही मिळवला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✒️ काव्यांगण- रोज एक कविता 🖋️*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*काव्यांगण - रोज एक कविता*
फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.
*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*
सूचना -
◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी
◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे
◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे
◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.
आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ संयोजक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙
मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.
त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती.
वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.
त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे.
अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.
*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) 'वनांचा शेतकरी' ( The farmer of the forest ) कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?
२) विश्व अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) पदक ( रौप्यपदक ) मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ?
३) संथाली भाषेत अभिवादनासाठी कोणता शब्दप्रयोग केला जातो ?
४) भारताचा राष्ट्रप्रमुख कोण असतो ?
५) आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपतीची बिनविरोध निवड झाली आहे ?
*उत्तरे :-* १) धनेश ( Hornbill ) २) नीरज चोप्रा, भालाफेक ३) जोहार ४) राष्ट्रपती ५) एक वेळा, भारताचे सातवे राष्ट्रपती संजय नीलम रेड्डी, १९७७
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● सौ. गीता शिवा वसमतकर
● सुनील कोल्हे
● सुदीप दहीफळे
● दलित सोनकांबळे
● माधव मुस्तापुरे
● संजय पंचलिंग
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*'घराच्या, शहराच्या आणि देशाच्या दुरवस्थेला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून, माझ्यातल्या 'मी' जबाबदार आहे. ' असे बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते. 'मी' हा एवढा मोठा असतो, की त्याचे सहजासहजी समाधान होत नाही. त्याला अहंकाराचा स्पर्श असतो. तो दुखावू नये, म्हणून काळजी घेतली जाते. 'मी हे का करावे','माझा याच्याशी काय संबंध' यासारखे प्रश्न विचारून आपल्यातला 'मी' अनेक सामाजिक कर्तव्यांपासून दूर जातो. एकदा का होईना 'मी'ने 'मी'चे ऐकले, तर व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होईल.*
*वाल्याने 'मी'चा खरा आवाज ऐकला. वाटमारी सोडली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. वाटमारी करणारा वाल्या पुढे भारतीय संस्कृतीचा वाटाड्या बनला. मी कोणाला दोष देणार नाही. माझ्याकडून होईल तेवढे सत्कार्य मी करेन माझ्या हातून चांगले होण्याची शक्यता नसेल, तेंव्हा मी कोणाचे वाईट करणार नाही. यासारखी छोटी छोटी सूत्रे प्रत्येकाने आचरणात आणली, तर समाजस्वास्थ्य सुधारेल. यात शंका नाही. 'मी' चूक करतो म्हणून 'आम्ही' चूक करायला धजावतो. 'मी' सुधारलो तर जग सुधारेल. सकल जीवन समृद्ध करण्यासाठी 'मी'वर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*श्री संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*माणूस हा परिवर्तनशील जीव आहे. त्याच्यावर जेव्हढ्या लवकर परिणाम होईल तेव्हढा कुणावरही होणार नाही. म्हणून फक्त सकारात्मक विचार करावा. त्यातून 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.*
*बाणभट्ट गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतांना त्याला काहीच येत नव्हते, तो अभ्यासात सर्वात मागे असायचा, त्यामुळे एक दिवस तो आत्महत्या करायला निघाला.*
*एका विहिरीजवळ आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की पाण्याची बादली जिथून खाली वर येते तिथे एक चरा म्हणजे खोल जागा तयार झालेली दिसली.चमत्कार झाला--जर दगड साध्या दोराच्या सततच्या घर्षणाने झिजू शकतो तर जिवंत माणूस का नाही? आणि या प्रश्नाने हर्षाच्या राजवटीत बाणभट्ट हा प्रसिध्द कादंबरीकार जन्माला आला.*
*ज्याला त्यावेळचा आणि आजचा समाज विद्वान म्हणून संबोधतो.*
*आपणही जरा विचार करा जर सातत्याने एखादी अशक्य गोष्ट घडू शकते मग आपण प्रयत्न का सोडायचे?*
*शेवटी म्हणतात ना ,प्रयत्ने वाळूचे कण रगडीता ,तेलही गळे*
*अशोक कुमावत*
*( राष्ट्रपती पुरस्कार विजेते )*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
जीवनातले सगळेच प्रश्न सहज मिटतील असे नाही.काही प्रश्न सहज प्रयत्न केल्यावर मिटतात तर काही अथक प्रयत्न करुनही मिटत नाहीत.अशावेळी मनुष्य आपला स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतो आणि आपलं नशिबच तसे आहे आता आपण काय करू शकतो अशा नकारात्मक विचारावर विश्वास ठेवतो.असे केल्याने प्रश्न मिटत नाहीत तर त्या प्रश्नांना ठामपणे समोर उभे राहून मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जे काही आपल्यासमोर संकटं किंवा प्रश्न उभे राहतील त्याला तोंड देऊ आणि समर्थपणे जीवन जगू.असे विचार आणले तर जीवनाचा कोणताही प्रवास आनंदाने करु शकतो.कारण जीवनच संघर्ष आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे.हतबल होऊन किंवा विश्र्वास गमावून चालणार नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*महती आईची*
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,'' स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तिच्या हाती देत ते म्हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला,'' स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्वामी मंद स्मित करत म्हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे. ''
*तात्पर्य :-*
*आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
बुधवार, 27 जुलाई 2022
28/07/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दि. 28/07/2022 वार - गुरूवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
● १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार
💥 *जन्म* :-
★ १९३१ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
★ १९३६ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
★ १९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
★ १९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार
💥 *मृत्यू* :-
◆ ४५० - थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.
◆ १०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.
◆ १७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.
◆ १८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.
◆ १९३४ - लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
◆ १९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, नव्या सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम, अन्यथा उठाव करण्याचा इशारा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राकडून बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड) मर्जरला देखील हिरवा कंदिल देण्यात आला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *पुढचे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज काळ बनून कोसळली, एकूण 28 जणांचा मृत्यू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *अकोल्यात रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी; कॉल 'फेक' असल्याची अकोला पोलिसांची माहिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *अनेक राजकीय नेते, बड्या उद्योजकांना तुरुंगवास घडवणाऱ्या PMLA कायद्याचं आज भवितव्य ठरणार, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*अन्न म्हणजे पूर्णब्रह्म*
अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.........
पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल.
https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙
या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं.
शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं.
जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती.
'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं.
*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*Well beginning is the half done.*
*( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 'जिव्हाळा' कर्जयोजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
२) पश्चिम बंगाल राज्याचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
३) नवनिर्वाचित राष्ट्रपतीला राष्ट्रपतिपदाची शपथ कोण देतात ?
४) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कोणता दिवस 'उज्ज्वला दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?
५) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) बंग विभूषण ३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ४) १ मे ५) एन. व्ही. रमना
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● चंद्रकांत पिलाजी
● दिगंबर जैरमोड
● बालाजी गुट्टे
● अंकुश शिंदे
● बाळू उपलेंचवार
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*माणूस बर्याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय.*
*थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.*
*॥ रामकृष्णहरी ॥*
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाईल- 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*खरे जीवन समजून घ्या.*
*एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.*
*या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,*
*वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.*
*आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।*
*अशोक कुमावत*
*(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*)
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे.
© व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.*
एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
*तात्पर्य :- आजच्या काळात कोणी जर आपल्याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुरुवार, 21 जुलाई 2022
दिनांक 22 जुलै 2022 ( 22/07 )
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 22/07/2022 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*पाय दिन (२२/७ =पाय π)*
💥 ठळक घडामोडी :-
१९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
१९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
१९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
💥 जन्म :-
१९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
१९२३ - मुकेश, पार्श्वगायक.
१९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.
*१९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री*
💥 मृत्यू :-
१९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक.
२००३- उदय हुसेन,कुसे हुसेन ,सद्दाम हुसेनची मुले.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9404277298
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय, यूपीएच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव, राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मिळवला मान*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम निर्बंधमुक्त, यंदा राज्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात, सरकारनं दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *गुजरात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा, 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाची अनुपस्थिती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील निकिता सुशील कमलाकरने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का, लोकेश राहुलला करोना*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...
*लघुकथा - सरपंच*
https://storymirror.com/read/story/marathi/baeglro2/srpnc/detail
वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ कथालेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝
मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.
प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं.
उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.
*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून*
*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
१) कोणत्या पक्ष्याचे घरटे कमळावर असते ?
२) संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत ?
३) जगातील एकमेव गाव कोणते जिथे कधीच पाऊस पडत नाही ?
४) प्लास्टिकची निर्मिती कशापासून केली जाते ?
५) २०२०-२१ चा राज्य सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
*उत्तरे :-* १) कमळपक्षी ( जकाना ) २) अँटोनियो गुटेरेस ३) पासीघाट, अरुणाचल प्रदेश ४) नेपथा / पेट्रोलियम पदार्थ ५) पं. हरिप्रसाद चौरसिया, प्रख्यात बासरीवादक
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
● मा. श्री सुमंत भांगे,
● प्रल्हाद तुमेदवार
● दामोदर साळुंखे
● संजय कदम, पत्रकार, दै. देशोन्नती
● अनुराधा हवेलीकर
● धनराज वाघ
● विश्वनाथ चित्रलवार
● संतोषकुमार दुरगुडे
● पद्माकर मुळे
● अमोल गायकवाड
● अल्ताफ शेख
● श्रीनिवास वाघमारे
● संतोष जाधव
● महेश व्ही. जाधव बिजापूर
● प्रल्हाद तुमेदवार
*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.*
*राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..*
••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••
💥💥💥💥💥💥💥💥💥
संजय नलावडे, चांदीवली, मुंबई
9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
हिन्दू कहें मोहि राम पियारा,
तुर्क कहें रहमाना,
आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए,
मरम न कोउ जाना।
सारांश
महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे.
जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही.
एकनाथ डुमणे, मुखेड
📱 9096714317
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे.कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी.दुसरे असे की,माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो.एखादी कुणीजरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते.त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते.
अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते.एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे,आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात.अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात.अशा माणसांमध्ये स्वार्थ,मतभेद,दुरावा,गर्व,अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत.म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
© व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*चतुर बिरबल*
बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारले
पंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.
पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?
बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.
बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~