सोमवार, 22 मार्च 2021

24/03/2021

२४ मार्च – दिनविशेष

जागतिक क्षयरोग दिन

*२४ मार्च रोजी झालेल्या घटना.*

१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

*२४ मार्च रोजी झालेले जन्म.*

१७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५)

१९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७१)

१९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)

१९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.

१९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.


*२४ मार्च रोजी झालेले मृत्यू.*

१८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)

१८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी१८०७)

१९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)

२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९१३

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें