सोमवार, 22 मार्च 2021

24/03/2021

२४ मार्च – दिनविशेष

जागतिक क्षयरोग दिन

*२४ मार्च रोजी झालेल्या घटना.*

१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नल चे प्रसारण केले.

१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

*२४ मार्च रोजी झालेले जन्म.*

१७७५: तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षीतार यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १८३५)

१९०१: अमेरिकन अॅनिमेटर मिकी माऊस चे सह निर्माते अनब्लॉक आय्व्रेक्स यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९७१)

१९३०: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)

१९५१: अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिल्फिगर यांचा जन्म.

१९८४: भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसूझा यांचा जन्म.


*२४ मार्च रोजी झालेले मृत्यू.*

१८४९: जर्मन रसायनशास्त्रज्ञ योहान वुल्फगँग डोबेरायनर यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १७८०)

१८८२: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी१८०७)

१९०५: फ्रेन्च लेखक ज्यूल्स व्हर्न यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)

२००७: मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी१९१३

रविवार, 21 मार्च 2021

23/03/2021 दिनविशेष

२३ मार्च – दिनविशेष
*जागतिक हवामान दिन*

२३ मार्च रोजी झालेल्या घटना.

१८३९: बोस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ. के. या शब्दाचा पहिला छापील उपयोग झाला.

१८५७: न्यूयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली.

१८६८: कॅलिफोर्निया विद्यापीठाची ओकलंड येथे स्थापना झाली.

१९१९: बेनिटो मुसोलिनी यांनी मिलान इटली मध्ये हुकूमशाही राजकीय चळवळ सुरूकेली.

१९३१: भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.

१९४०: संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत.

१९५६: पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले.

१९८०: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा प्रकाश पदुकोन यांनी पहिले भारतीय म्हणून जिंकली.

१९९८: अभिनेते दिलीपकुमार यांना निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

१९९९: पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविेण्यात आले.

१९९९: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला.

२००१: रशियाचे मिर हे अंतराळ स्थानक पृथ्वीवर कोसळले.

*२३ मार्च रोजी झालेले जन्म.*

१९२९: भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०)

१६९९: अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ जॉन बार्ट्राम यांचा जन्म.

१७४९: फ्रेंच गणितज्ञ पिएर सिमॉन दि लाप्लास यांचा जन्म.

१८८१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म.

१८८१: नोबेल विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हेर्मान स्टॉडिंगर यांचा जन्म.

१८८३: कन्‍नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै तथा राष्ट्रकवी गोविंद पै यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९६३)

१८९३: भारतीय व्यापारी गोपालस्वामी दुराईस्वामी नायडू यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९७४)

१८९८: आसामी कवयित्री आणि लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७७)

१९१०: समाजवादी नेते आणि विख्यात संसदपटू डॉ. राममनोहर लोहिया यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९६७)

१९१२: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंते वर्नर फॉन ब्रॉन यांचा जन्म.

१९१६: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)

१९२३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४३)

१९३१: रशियन बुद्धीबळपटू व्हिक्टर कॉर्चनॉय यांचा जन्म.

१९५३: भारतीय महिला उद्योजक किरण मुजुमदार-शॉ यांचा जन्म.

१९५४: अमेरिकन फॅशन डिझायनर केनेथ कोल प्रॉडक्शन चे स्थापक केनेथ कोल यांचा जन्म.

१९६८: इंग्लिश क्रिकेटपटू माईक अ‍ॅथरटन यांचा जन्म.

१९७६: भारतीय अभिनेत्री, निर्माता आणि राजकारणी स्मृती इराणी यांचा जन्म.

१९८७: अभिनेत्री कंगना रणावत यांचा जन्म.

*२३ मार्च रोजी झालेले मृत्यू.*

१९३१: क्रांतिकारक भगत सिंग यांना फाशी. (जन्म: २८ सप्टेंबर १९०७)

१९३१: क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी. (जन्म: १५ मे १९०७)

१९३१: क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना फाशी. (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)

१९९१: व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानित भारतीय सैनिक प्रकाश सिंग यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९१३)

२००७: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचे निधन.

२००८: मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.

२०११: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२)