गुरुवार, 2 जनवरी 2020

01 जानेवारी 2020 बुधवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 01/01/2020 वार - बुधवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

        *नवीन वर्ष शुभारंभ*


💥 ठळक घडामोडी :-
● १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

💥 जन्म :-
● १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
● १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
● १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
● १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक.
● १९४३ - रघुनाथ माशेलकर .

💥 मृत्यू :-
● १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
● १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागणीसाठी येत्या आठ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज, एक जानेवारी रोजी गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या भागातील कंपन्या सुरू राहणार आहेत,' असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *मेट्रोच्या कामासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *न्यू ईयर सेलिब्रेशननिमित्त माथेरान हाऊसफुल्ल, मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
नववर्षाभिनंदन ! फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        *नवीन वर्ष सुखाचे जावो*

मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता ......

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html     

लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
*आले वर्ष नवे*
----------------------
सरले सरले
वर्ष हे हो जुने
स्वागत करूया
आले हे वर्ष नवे...

पाहू स्वप्ने नवी
करू संकल्प नवे
प्रयत्न करूया
देई यश वर्ष नवे...

गोड सदा बोलावे
वाईट ना बोलावे
मनापासून हेच
नवं वर्षात करावे
--------------------------------
-अरुण वि.देशपांडे-पुणे.
9850177342
-----------------------------------
*सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

जेव्हा एखादा मार्ग तुम्ही निवडता तेव्हा तो तुम्ही शेवट पर्यंत चालला पाहीजे.  व्यक्तीगत कारणासाठी त्यापासून दूर जाऊ नये.

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती ?*
       जिलेबी

2)  *भारतातून चहाची आयात सर्वाधिक कोणता देश करतो ?*
        इंग्लंड

3)  *शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले ?*
         स्वामी विवेकानंद

4)  *ब्रह्मपुत्रा नदी बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?*
        जमुना

5)  *जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?*
        एंजल

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 अनिकेत भारती, नांदेड
👤 सुरेश सावंत, साहित्यिक, नांदेड
👤 दिलीप धामणे, साहित्यिक, हिंगोली
👤 संजय नलावडे, साहित्यिक, मुंबई
👤 पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक, नांदेड
👤 पेंडम पवन, नवीपेट, तेलंगणा
👤 शिवराज पा. गाडीवान, पत्रकार, धर्माबाद
👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी
👤 उमेश कोकुलवार

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌼 🌼 *_हार्दिक शुभेच्छा !!!_* 🌼 🌼

*'धूर' जसा वातावरणात 'प्रदूषण' करतो तसे 'शब्द'ही जगण्यात प्रदूषण करतात. तेव्हा निरोगी मनाच्या, निरोगी शब्दांच्या शोधात रहाणे, त्यांचा सहवास मिळविणे यात वेळ घालविणे आधिक चांगले. अशावेळी 'चुगलखोर' शब्दांना मूठमाती देणे आधिक चांगले.*

*आज 31 डिसेंबरला नववर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना एकच मॅसेज पाठवत आहे... 'मी जर तुमच्याविषयी काही वाईट बोललो असं जर तुम्हाला कुणी सांगितलं, तर मनात ठेवू नका. माझ्याशी 'संवाद' साधा. मला तुमच्याशी 'मैत्री' हवी आहे. शब्दांमुळे आपल्यात अंतर नको......'*

       🌟  *_Good Bye -  2017_*  🌟
🌟💥 *_WELCOME - 2018_*💥🌟
  *_नववर्ष मैत्रीपूर्ण, आनंददायी जावो !!!_*
     *_मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!_* 💐
     
    *_--संजय नलावडे आणि परिवार_*
   💥💥💥💥💥💥💥💥💥
         📱 9167937040
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*आज 2020 मध्ये आपण पदार्पण करीत आहोत.*
*या  संपूर्ण  एका  वर्षासाठी  आजपासून  नवीन  संकल्प  करा. ते  डायरीत  लिहून  ठेवा.  मित्र  परिवारात  जाहीर  करा.  वारंवार  ते  संकल्प  आठवा*

       *काही  संकल्प*

१)  प्रथम  स्वतः वर  प्रेम  करा.
२)  वडिलधा-यांना  मान  द्या.
३)  बचत  करायला  शिका.
४)  निरोगी  राहण्यासाठी  प्रयत्न  करा.
५)  चांगला  मित्र  परिवार  वाढवा.
६)  व्यसनांपासून  दूर  रहा.
७)  भक्तीमार्ग  अवलंबा.
८)  समाजसेवा  करा.
९)  आपल्या  मागे  आपली  आठवण  काढणारी  माणसे  आहेत,  याची  सदैव  जाणीव  ठेवा.
१०)  सल्ला  घेऊनच  प्रत्येक  काम  करा.
११)  आजच्या  तरूण  पणावरच  उद्याचे 
वृद्धत्व  अवलंबून  आहे.  हे  विसरू  नका.
१२)  मागा  म्हणजे  मिळेल,  आणि  शोधा  म्हणजे  सापडेल.  या  प्रमाणे  वागल्यास  पुढेच  जाल.
१३)  यशोगाथांचे  वाचन  करा.
१४)  नैसर्गिक  जीवन  जगा.
१५)  आयुष्य  फार  लहान  आहे.  प्रत्येक  क्षणाचा  आनंद  घ्या.

आदर्श जीवन जगण्यासाठी
जरुर वाचा..
💎1) चूक झाली तर मान्य करा.
💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
💎3) चांगल्या कामाची स्तुती करा.
💎4) आभार मानायला विसरू नका.
💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
💎6) सतत हसतमुख रहा.
💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
💎11) कृती पुर्व विचार करा.
💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
💎15) नेहमी सत्याची कास धरा.
💎16) इतरांना चांगली वागणूक द्या.
💎17) सुखाचा गुणाकार व
दुखाचा भागाकार करा.
💎18) विचार करून बोला.
💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*संकलन -:* *अशोक लक्ष्मण कुमावत.*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
🙏 *निवास* :-समर्थ,त्रिकोणी बंगला, अमृतधाम, पंचवटी, नासिक
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की,आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही.तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार.पण तुमच्या मनाचा थोडाजरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
                *एकीचे बळ*

एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे
एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.
वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे
पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते.

तात्पर्यः एकीचे बळ फार मोलाचे असते.

*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~

03 जानेवारी 2019 शुक्रवार

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~
 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣
            ( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
         ( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
📅 दि. 03/01/2020 वार - शुक्रवार
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
     *ऑक्युपेशन थेरपी दिन*
*सावित्रीबाई फुलेजयंती* *बालिका दिन*



💥 ठळक घडामोडी :-
● १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
● १९५२ - स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
● १९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.

💥 जन्म :-
● १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
● १८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.
● १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
● १९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
● १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.

💥 मृत्यू :-
●१९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.
● १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
● १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
● १९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.
● २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
● २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
● २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
● २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9604481084
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
1⃣ *पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिनी आयोजित संचलन समारंभात बोलत होते*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, रोटेशन पद्धत असल्यानं प्रस्ताव नाकारल्याचं स्पष्टीकरण,  तर विरोधकांच्या राज्यांना डावलल्याचा सुप्रिया सुळे यांचा आरोप, केंद्र सरकार राजकारण करत असल्याची संजय राऊत यांची टीका *
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *14 एप्रिल 2022 पर्यंत  इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार, स्मारक स्थळाला  भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बीडमध्ये सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांचा मतदानाचा अधिकार उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नाकारला, बीड झेडपीच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सस्पेन्स वाढला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *विदर्भ आणि मराठवाड्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, ज्वारी, गहू, कापसाचं मोठं नुकसान, दुष्काळ, अतिवृष्टीनंतर अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी देशोधडीला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ **आज ठाकरे सरकार मंत्रिमंडळाचे खातेवाटप होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीत गृहमंत्रिपद नको म्हणणारेच जास्त : शरद पवार यांचे प्रतिपादन**
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच कडून ज्ञानदीप 2020 ई विशेषांकाचे राज्याध्यक्ष श्री नटराज मोरे, साहित्यिक तथा कवी श्री व्यंकटेश चौधरी आणि जिल्हाध्यक्ष श्री रमेश मुनेश्वर यांच्या हस्ते झाले ऑनलाईन प्रकाशन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रासंगिक लेख

             *मी सावित्री बोलतेय*


नमस्कार .....

मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले, माझा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला. मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता. पण माझे पती महात्मा फुले यांनी मला शिकविले आणि घडविले. पुण्यात भिडेच्या वाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली. पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. तेंव्हा ज्योतिबानी मला याठिकाणी शिकविण्यासाठी.............


वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.


http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post.html            


लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक नासा येवतीकर
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
               *सावित्रीबाई*

पहिल्या शिक्षिका आहेत सावित्रीबाई,
त्या आहेत आम्हा सर्वांच्या आई...

सावित्रीबाईंनी काढली मुलींसाठी शाळा,
मुलींनाही लागला मग शाळेचा लळा..

सावित्रीबाईंना अनेकांनी दुखावले,
तरीही त्यांनी मुलींना मात्र शिकवले...

सावित्रीबाईंचे आडनाव होते फुले,
त्यांना आवडायची शाळेतली मुले...

महात्मा जोतिबा फुले होते त्यांचे पती,
त्यांना वाटायची नाही कोणती भीती...

मी त्यांच्या कार्याला करते सलाम,
सावित्रीबाईंना कोटी कोटी प्रणाम..

-● अक्षदा नामदेव उंडे
    वर्ग-चौथा
जि.प.प्रा.शाळा रायपूर
ता.सेलू जि.परभणी

*सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो.
~ वपु काळे | इतर

*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

1)  *'बालिका दिन' केव्हा साजरा केला जातो ?*
        3 जानेवारी

2)  *'बालिका दिन' कोणत्या वर्षांपासून साजरा केला जातो ?*
        1995

3)  *'क्रांतीज्योती' म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?*
        सावित्रीबाई फुले

4)  *सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?*
       3 जाने.1831 ( नायगाव, सातारा )

5)  *महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ?*
         सावित्रीबाई फुले

*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   
  
👤 ज्ञानेश्वर विजागत, सहशिक्षक, सोलापूर
👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद
👤 रतन बहिर, भीर, महाराष्ट्र
👤 शुभांगी परळकर, नांदेड
👤 माधव पवार, पत्रकार, नायगाव
👤 संदीप जाधव, देगलूर
👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती
👤 वीरेंद्र डोंगरे

*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*उतारवयात शारिरीक कष्टाची कामं कमी करावीत; परंतु आपला अनुभव, कौशल्य तुम्हाला जिथे वापरता येईल, अशी कामं शोधावी. पैशासाठी, पोटासाठी संसारासाठी करावी लागणारी कामं सोडून अन्य पद्धतीने समाजजीवनात भाग घ्यावा.  यामुळं जीवनात काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळतं. तोच-तोच पणातुन येणारा कंटाळा कमी वहायला लागतो. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर , दररोज नव्या पाटीवर सुरूवात केली तर दररोजच तुम्ही नव्यानं जन्माला आला आणि जगला असं होईल. माझे अनेक वयानं ज्येष्ठ मित्र आहेत. नोकरीत असेपर्यंत ते साठीपर्यंत ठणठणीत असतात; पण निवृत्त झाल्यावर एक-दोन वर्षातच  १५-२० वर्षांनी वृद्ध झाल्यासारखे  दिसतात.*

*माणसानं स्वत:ला मोडीत काढणं ही मानसिक प्रक्रिया सगळ्यात वाईट आहे. यामुळेच हे असं होतं. मी कुचकामी झालो, हे एकदा मनाला स्वत: सांगितलं की माणूस म्हातारा व्हायला लागतो. त्यामुळे सर्वांना सांगणे आहे की, 'द मोमेंट यू रिटायर, यू मस्ट री-टायर.' म्हणजे तुम्ही तुमचे टायर बदलून पुन्हा नव्या जोमाने नव्या कामाला लागलं पाहिजे. आतापर्यंत जे काम करत होता ते जमत नसेल तर, तुम्हाला जमू शकेल असं काम शोधा आणि काम करत रहा. काम करत राहिल्यानेच माणसं सक्षम रहातात. माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीने स्वत:च्या अमृत महोत्सवात बोलताना सांगितले की, 'मी ज्येष्ठ झालोय, म्हातारा नाही. आणि तरूण पिढीच्या खांद्याचा आधार घेऊन त्यांच्याशी बौद्धिक स्पर्धा करीतच राहणार आहे. 'माझ्यासाठी हाच 'कर्मसिद्धांत'आहे. आजच्या नवीन वर्षात आपणही कर्मसिद्धांताचा हाच 'संकल्प' करू या.*

              *॥ रामकृष्णहरी ॥*
⚡💥⚡💥⚡💥⚡💥⚡
       *संजय नलावडे, मुंबई*
     *मोबाइल  - 9167937040*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
       🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

*मित्रांनो*
*आत्महत्येचा कड्यावर ती उभी होती,*
*कित्येक स्वप्नांचा अपेक्षाभंग करून तिने प्रत्येक श्वासातून दिनदलितांच्या मुलींना शिक्षणाची कवाडे खुली* *करून दिली.त्यांचे* *जीवन फुलविले.त्या सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी* *मानाचा मुजरा करतो.*
*पुन्हा या सावित्रीच्या रूपाने एखादा पुरुष या वारश्याला आधुनिक फुलेंच्या रूपाने आज बघितला तर* *नवल वाटणारच.*
*हो हा आधुनिक भगीरथ म्हणजे अधिक कदम हो अधिक कदमच.*
*आयुष्यात एखादं वादळ आलं की*
*सर्वकाही बिघडून जाते असे* *म्हणतात....!*
*पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी*
*आयुष्यात एखाद्या वादळाचं येण गरजेच असतं....*   
*आरोग्य, शिक्षण, अनाथांचे पुनर्वसन आणि महिला सक्षमीकरण...हे* *वरकरणी सरकारी* *भासणारे प्रकल्प, परंतु* *प्रत्यक्षात काश्मिरातील काश्मीर व्हॅली येथील एका स्वयंसेवी संस्थेचा हा* *अजेंडा.हा ध्येयवेडा* *हाती झेंडा घेऊन आजही* *मरणाच्या खाईतून* *मार्गक्रमण करत आहे.*
  *राज्यशास्त्राचा अभ्यास करणारा १९ वर्षांचा पुण्यातला s.p. कॉलेजचा* *एक तरुण* *काश्मीरमधली खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे जातो काय, तिथल्या* *अनाथ मुलांची परवड पाहून व्यथित होतो काय* *आणि तिथेच राहून या उद्ध्वस्त मुलांचे आयुष्य सावरण्यासाठी 'बसेरा* *ए तबस्सुम' अर्थात आनंद* *निवास उभारतो काय, हे* *सगळेच अनाकलनीय. तेथील* *दहशतवाद्यांचा दररोज सामना करत अनाथ मुलींचा सांभाळ म्हणजे जणू* *मृत्यूशी लपंडाव खेळण्यासारखेच. काश्मीरचा* *निसर्गरम्य प्रदेश भारताला हवा आहे, पण तेथील लोकांचे काय? ते* *देशवासीयांना आपलेसे वाटतात का, या प्रश्नाने अधिक कदमला* *भंडावून सोडले आणि त्याने काश्मिरात राहून अनाथ* *मुलांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. अधिक हा मूळचा श्रीगोंदा* *येथील एका शेतकरी कुटुंबातला. घरची परिस्थिती बेताची. १९९०च्या* *दशकात* *काश्मीरखोऱ्यात अस्थिरता शिगेला होती. त्याच सुमारास अधिक पुण्यात* *महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्यावेळी त्याच्या* *मित्रांमध्ये काश्मिरातील पंडित आणि मुस्लिमांचा समावेश* *होता. त्यांच्यातील वादांमुळे अधिकने काश्मीरमध्ये जाऊन वास्तव समजून* *घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबरोबरच आर्थिक* *प्रगतीची बंद कवाडे, भ्रष्टाचार आणि सरकारी अनास्था* *यामुळे काश्मिरातील अनाथ मुलांचे भवितव्य अंधारमय राहणार याची* *जाणीव त्याला झाली.येथील 14 ते 15 वर्षाचे मूल जेव्हा मानवी* *बॉम्ब बनून जनतेचे चिंधडे उडवीत,हे पाहून त्याचे मन* *हेलावून गेले. ही* *परिस्थिती बदलण्याच्या तळमळीतून 'बॉर्डरलेस र्वल्ड फाउंडेशन'चा जन्म* *झाला.*
*जातीभेदाच्या भिंती उखडून अनेक संकटांचा सामना करत 22 वर्षांपासून* *अविरत संघर्ष करीत आज त्याने 250 अनाथ मुलींचा* *आश्रम सजविला. त्या अनेक* *जिल्ह्यात उच्च शिक्षण घेत आहे.* *अतिरेक्यांच्या तावडीतून अनेक वेळा प्राण वाचवुन सुद्धा तो* *मागे फिरला नाही.आज येथील* *लोकांचा शहेनशहा बनलेल्या* *अधिक कदमला मानाचा* *मुजरा.*

*अशोक कुमावत*
( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)*
📱 9881856327
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••

बोलणारी आणि बोलण्याप्रमाणे कृती करणारी व्यक्ती ही अतिशय संवेदनशील आणि कर्तव्यतत्पर समजली जाते. अशा व्यक्ती फार कमी प्रमाणात पहायला मिळतात. अशा व्यक्तींच्या सहवासात राहिले तर आपल्यातील आळशीपणा आणि कामामध्ये टाळाटाळ करण्याच्या वृत्तीला लगाम घातल्या जाऊन आपल्यामध्ये सुप्त असलेल्या क्रियाशिलतेला अधिक प्राधान्य मिळते व जीवनात चांगले जीवन जगण्यासाठी योग्य दिशा मिळते.


© व्यंकटेश काटकर नांदेड.
संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.
🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄🌸🎄

•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
            *स्त्री स्वतःच पूर्णरुप !*

   ज्या रात्री गौतम बुद्धांनी घर
आणि पत्नीला सोडले, त्याच रात्री त्यांना पुत्रप्राप्ती झाली.
    पुत्रप्राप्तीचा आनंद असतानाही पतीने घर सोडल्याची बातमी जेव्हा तिला समजली तेव्हा ती उध्वस्त झाली. पण तिने कुणाकडे ही तक्रार केली नाही. आणि जग ज्याच्याकडे अभिमानाने पाहिल, अशा पद्धतीने मुलाला वाढविण्याचे तिने ठरवले. सोडून गेलेल्या पतीला विसरून तिने नवे आयुष्य सुरु करावे,असे तिला सर्वांनी सुचवले. दुसरे लग्न करण्याची गळ घातली, तिने त्यास नकार दिला.
    आणि एका सुंदर सकाळी.........
ते परत आले आणि तिच्या समोर उभे राहिले.
     तिने शांतपणे त्यांना विचारले, "आता तुम्हाला लोक 'बुद्ध 'म्हणून ओळखतात ना?"
      त्यांनी ही तितक्याच शांत
पणे उत्तर दिले, "होय, मी देखील तसे ऐकले आहे. "
    तिने पुढे विचारले, "त्याचा अर्थ काय?"
   "जगण्याचा अर्थ कळला आहे, अशी व्यक्ती !"तेम्हणाले.
     ती किंचितशी हसली आणि मग शांत बसली.
   काही वेळाने ती म्हणाली,
"आपण दोघेही काहीतरी नवे
शिकलो आहोत, असे मला वाटते. तुम्ही जे शिकला आहात, त्यातून हे जग सम्रुद्ध
होईल पण मी जे शिकले आहे, ते
फारसे जगापुढे येणारच नाही."
    बुद्धांनी तिला विचारले, "तू काय धडा शिकलीस ?"
    तिचे डोळे चमकले. डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.
   "तो धडा म्हणजे धैर्य! स्त्रीला उभी रहाण्यासाठी कुणाचीही गरज लागत नाही. तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असते. ती न डगमगता कोणत्याही परिस्थितीतून खंबीरपणे मार्ग काढू शकते. "
   
यशोधरेतील 'स्त्री'ला मनापासून नमस्कार !
  
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱 9403046894
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. 
•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~